‘कॅण्डी क्रश सागा Candy crush saga’ गेममुळे तरुणाला करावी लागणार शस्त्रक्रिया
कॅलिफोर्निया: ‘कॅण्डी क्रश सागा’ या गेमने तरुणाईला अक्षरश: वेड लावले आहे. कारण की, प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये हा गेम असतोच, वेळ मिळाला की हा गेम खेळणं हा जणू काही छंदच झाला आहे. मात्र, कॅण्डी क्रश खेळण्याची सवय तुमच्या बोटांना फारच धोकादायक ठरु शकते. या अशाच सवयीमुळे 29 वर्षीय तरुणाला आपल्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.कॅलिफोर्नियातील 29 वर्षीय तरुणाला कॅण्डी क्रश खेळण्याची जणू काही नशाच झाली होती. सतत गेम खेळत राहिल्याने त्याच्या अंगठ्यातील एक पेशी तुटली. हा तरुण सहा ते आठ आठवडे नियमितपणे कॅण्डी क्रश खेळत होता. मात्र, ज्यावेळेस त्याचा अंगठा काम करेनासा झाला त्यावेळेस त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली.
त्यानंतर डॉक्टरांनी अंगठ्याचे निदान करीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. ज्या डॉक्टारांनी त्याच्यावर उपचार केले त्यांचेय म्हणणे आहे की, व्हिडिओ गेममुळे बोटांमधील पेशींवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे त्या सुन्न होतात. सतत गेम्स खेळण्यामुळे अनेकदा हे दुखणं जाणवत देखील नाही.
संशोधनकर्त्यांच्या मते, गेम्स खेळणं हे एखाद्या नशेप्रमाणे आहे. तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटले गेल्यास शारीरिक दुखणं विसरुन जातात. तर डॉक्टरांच्या मते, दिवसामध्ये, अर्ध्या तासापेक्षा जास्तवेळ स्मार्टफोनवर गेम्स खेळणं हे हानिकारक ठरु शकतं.
कॅण्डी क्रशचे चाहते जगभरात आहे. भारतात देखील याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. सुरुवातील हा गेम फेसबुकवर लाँच करण्यात आला होता. मात्र, याची वाढती लोकप्रियता पाहता त्याला स्मार्टफोनसाठीही लाँच करण्यात आले.
No comments:
Post a Comment