महाराष्ट्र राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या
इयत्ता दहावीच्या SSC Exam result परीक्षेचा निकाल आज (१७ जून) दुपारी एक वाजता ऑनलाइन
जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मात्र २६ जूनला मिळणार आहेत.
यंदा १७,२८, ३६८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.
दहावीचा निकाल मोबाइल फोनवरही उपलब्ध होणार आहे. बीएसएनएल मोबाइलधारकांना
५७७६६ या क्रमांकावर MHSSC असा एसएमएस पाठवून निकाल पाहता येईल. महाराष्ट्र
ज्ञान महामंडळातर्फे (एमकेसीएल) एमएस-सीआयटी केंद्रांवर विद्यार्थ्यांना
ऑनलाइन निकाल विनामूल्य पाहता येईल. या केंद्रांवर निकालाची प्रिंट आउटही
मिळणार आहे.
No comments:
Post a Comment