Saturday, August 2, 2014

Benefits of Spirulina

शरीरासाठी पोषक घटकांचा खजिना स्पिरुलिना - Benefits of Spirulina

आर.टी.. कार्यालयात काम करणारी एक व्यक्ती माझ्यासमोर रेल्वेत बसली होती. प्रवास सुरु असतानाच मला नांदेडमधून माझ्या एका पेशंटचा फोन आला. आमचे बोलणे समोर बसलेली ही व्यक्ती लक्षपूर्वक ऐकत होती. बोलणे संपल्यावर त्या व्यक्तीने स्वतःचा परिचय करुन दिला आणि मला विचारले, ‘‘ तुम्ही डॉक्टर आहात का ?’’ मी उत्तर दिले, नाही... मी निसर्गोपचार सल्लागार आहे.’’ माझ्या उत्तराने त्यांची जिज्ञासा जागी झाली आणि त्यांनी आपले शारीरिक त्रास मला सांगायला सुरुवात केली. त्यांचे सुमारे अर्धातास ऐकून घेतल्यावर माझ्या लक्षात आले की, त्यांना काहीही झालेले नाही. शरीराची दैनंदिन गरज भागविण्यासाठी आणि शरीराची होणारी झीज भरुन काढण्यासाठी जे घटक शरीरात दररोज गेले पाहिजेत ते त्यांना पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना सतत थकल्यासारखे वाटणे, उत्साह नसणे, वजन वाढणे, पोट साफ न होणे, साथीच्या रोगांची तात्काळ लागण होणे, जडत्व आल्यासारखे वाटणे, सारखे झोपून रहावे असे वाटणे, वारंवार पित्त होणे अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कामावर आणि करिअरवर झाला आहे. त्यातच भरीस भर म्हणून आधुनिक वैद्यक शास्त्राच्या तज्ज्ञांनी त्यांना करावयास लावलेल्या एक्स रे पासून एम.आर.आय. पर्यंतच्या अनेक तपासण्या आणि घ्यायला लावलेली औषधे याच्या खर्चामुळे ते पार वैतागून गेले होते. इतके करुनही त्यांना बरे वाटत नव्हतेच हा भाग वेगळाच! !
 मी त्यांना स्पिरुलिनाच्या कॅप्सूल्स दिल्या. सकाळी आणि रात्री जेवणानंतर एक एक कॅप्सूल घेण्यास सांगितले. माझा मोबाईल नंबर दिला आणि सांगितले कॅप्सूल्स घ्यायला लागल्यापासून पंधरा दिवसांनी मला फोन करा आणि तुमची प्रगती सांगा. सोळाव्या दिवशी रात्री साडे दहा वाजता त्यांचा फोन आला. खूप उत्साहात ते बोलत होते. ‘‘ आनंदराव, चमत्कार झालाय ! ! आज मी माझ्या गावापासून शंभर किलोमीटरवर असलेल्या गावात आर.टी.. कॅम्पला गेलो होतो. दिवसभरात दोनशे गाड्या पासिंग केल्यात. आत्ता परत आलोय पण, अजून फ्रेश आहे. अजिबात थकवा वाटत नाही. बाकीचे सगळे त्रासही कमी झालेत. तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही साहेब ! ! तुम्ही आता आमचे फॅमिली मेंबर आहात, कधीही आमच्या गावी, घरी हक्काने या ! !’’ मी धन्यवाद म्हणून फोन बंद केला आणि मला खूप समाधान वाटले.
 काय आहे स्पिरुलिना ?
 स्पिरुलिना ही निळ्या हिरव्या रंगाची आणि अनेक शाखा असणारी फोटोसिंथेटिक पाणवनस्पती आहे. प्रामुख्याने ही वनस्पती समुद्रात आढळते. शेवाळ्यासारखी असणारी ही वनस्पती तिच्या नागमोडी आकारामुळे स्पिरुलिनाया नावाने ओळखली जाते. मेक्सिको आणि मध्य आफ्रिकेतील लोक ही वनस्पती अगदी नैसर्गिक स्वरुपातही खातात. शास्त्रज्ञांना स्पिरुलिनातील पोषक तत्वांचा शोध सन १९६० मध्ये लागला. त्यानंतर स्पिरुलिना पृथ्वीवरील सर्वात शक्तीवर्धक प्रोबायोटिक पूरक अन्न म्हणून जगभरात वापरण्यात येवू लागले. आज जगभरातून लाखो लोक याचा पूरक अन्न म्हणून बिनधास्तपणे वापर करत असतात. इतकेच नव्हे तर सन १९७४ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने सर्वात चांगले शक्तीवर्धक पूरक अन्न म्हणून स्पिरुलिनाचे समर्थन केले आहे. सन १९८१ मध्ये फूड ऍण्ड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशननेही स्पिरुलिनाचा गौरव केला आहे. सन १९८३ मध्ये पश्चिम जर्मनीच्या इंटरनॅशनल फूड एक्स्पोजर या संस्थेनेही स्पिरुलिनाचे समर्थन केले आहे.
 स्पिरुलिनातून काय मिळते ?
 उत्तम जीवन, शक्तीशाली आणि सुदृढ शरीर यासाठी स्पिरुलिना हा आदर्श पूरक आहार आहे हे त्यातून मिळणारे घटक पाहिले की लगेच लक्षात येईल. रोज सकाळी एक आणि रात्री एक याप्रमाणे सलग सहा दिवस स्पिरुलिनाच्या बारा कॅप्सूल्स पोटात गेल्या (साधारण ६००० मिलीग्रॅम) तर शरीराला खालीलप्रमाणे पोषक घटक मिळतात.
 ) बीटाकॅरेटिन ः ५६ ग्लास गाईचे दूध प्याल्यावर अथवा ५५० सफरचंद खाल्ल्यावर जितके बीटाकॅरेटिन मिळेल तितके  आणि गाजरापेक्षा २५ पट अधिक
 ) व्हिटॅमिन बी १ ः हिरव्या मिरच्या २० खाल्ल्यावर जितके मिळेल इतके
 ) व्हिटॅमिन बी २ ः ४२० द्राक्षे अथवा ४७ स्ट्रॉबेरीज खाल्ल्यावर जितके मिळेल इतके.
 ) व्हिटॅमिन बी ३ ः आठ लिंबू खाल्ल्यावर जितके मिळते तितके
 ) व्हिटॅमिन बी ६ ः ९० ग्रॅम ब्रेडपासून जितके मिळते तितके
 ) व्हिटॅमिन बी १२ ः २४० ग्रॅम पनीर पासून जितके मिळते तेवढे
 ) व्हिटॅमिन ई ः चिकनचे सहा तुकडे खाल्ल्यावर जितके मिळेल तितके. पालेभाज्यांपेक्षा ३ टक्के अधिक
 ) प्रोटिन्स ः पालेभाज्यांपेक्षा ६० टक्के अधिक, दुधापेक्षा १४ टक्के अधिक, अंड्यापेक्षा ६ टक्के अधिक तर कडधान्यापेक्षा ३ टक्के अधिक
 ) जैविक लोह घटक ः पालेभाज्यांपेक्षा पाच ते आठ पट अधिक
 ) क्लोरोफिल ः अल्फा अल्फापेक्षा ५ ते ३० पट अधिक
 याशिवाय स्पिरुलिनामध्ये २९ टक्के फॅटी ऍसिड असते. त्यामुळे शरीरातील घातक कोलेस्ट्रॉल हटवले जाते, चरबी वितळवून शरीराबाहेर टाकली जाते आणि हृदयाचे रक्षण होते.
 स्पिरुलिना कोणत्या आजारात फायदेशीर आहे ?
 विविध शरीरोपयोगी घटकांनी परिपूर्ण असणारे हे स्पिरुलिना शरीरातील पौष्टिक घटकांची कमतरता भरुन काढते. शरीराची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. फुफ्फुसांना अधिकप्रमाणात प्राणवायू मिळावा यासाठी काम करते. पेशींना बळकट बनविते. शरीराची चयापचय क्रिया सुधारते. रक्ताभिसरण वाढवते. सर्वसाधारण आजार आणि जुने आजार यावर काम करते. ऍनेमिया, हृदयाशी संबंधीत आजार, अकाली येणारे वृध्दत्व, लठ्ठपणा, अल्सर, मानसिक ताण, पचनसंस्थेचे विविध आजार, दीर्घकाळापासूनचा संधीवात, डोळ्याच्या आणि केसांच्या समस्या, स्मृतीभ्रंश अशा आजारात तर स्पिरुलिना खूपच छान फायदा देते. त्याचबरोबर कॅन्सर आणि एचआयव्ही सारख्या पेशींशी संबंधित आजारातही स्पिरुलिना प्रभावीपणे काम करते. स्पिरुलिना शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढते आणि विषारी पदार्थांच्या आघातापासून मूत्रपिंडाचे (किडनी) रक्षण करते. उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि वाढत्या वयासोबत येणारे आजार यासाठी तर स्पिरुलिना संजीवनीच म्हणावी लागेल.
 स्पिरुलिना हे समृध्द शक्ती, कमी कॅलरीज आणि सहज पचणारे पूरक अन्न आहे. म्हणूनतर नासाया अंतराळ संशोधन संस्थेने त्याचा वापर आणि गौरव केला आहे. गेल्या साडेतीन लक्ष वर्षांपासून लहरी निसर्ग, सततचे प्रदूषण अशा नेक उलथा पालथींशी टक्कर देत स्पिरुलिना आपले नैसर्गिक गुणधर्म जसेच्या तसे टिकवून आहे, हा निसर्गाचा अजब चमत्कारच म्हणावा लागेल. स्पिरुलिना स्वस्त आणि सामान्य माणसाला परवडेल असे आहे. १०० कॅप्सूल्स साधारण ३६० रुपयांना मिळतात. रोज दोन कॅप्सूल्स घ्यायच्या असल्याने एका व्यक्तीला साधारण एक महिना वीस दिवस जातात. म्हणजे दिवसाचा खर्च सात रुपये वीस पैसे आहे. आपला रोजचा चहाचा खर्च यापेक्षा नक्कीच जादा असतो आणि त्याचा शरीराला फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक होतो. त्याही पुढे जाऊन विचार करायचा तर निरोगी राहण्यासाठी रोजचा सात रुपये खर्च हा आजारी पडल्यावर होणार्या दवाखान्याच्या खर्चापेक्षा नक्कीच कमी आहे, नाही का ? स्पिरुलिना आजारी असलेल्यांनी तर घ्यावेच पण ज्यांना कसलाही आजार नाही अशा निरोगींनीही कायमपणे रोगमुक्त राहण्यासाठी अवश्य घ्यावे. याबाबत अधिक माहिती अथवा अतिशय उत्तम प्रतिच्या स्पिरुलिना कॅप्सूल्स हव्या असतील तर माझ्याशी जरुर संपर्क साधावा. मी उपलब्ध करुन देईन.
 आनंद कुलकर्णी , निसर्गोपचार सल्लागार, जयसिंगपूर (जि. कोल्हापूर), मोबाईल - ७७४४९६४५५०

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...