Soldering and Welding
सोल्डरिंग आणि वेल्डिंग
गरजेनुसार खूपदा वेगवेगळ्या धातूंचे, संमिश्रांचे भाग जोडावे लागतात, तर काही वेळेला हे भाग कापावेही लागतात. धातूंचे भाग जोडण्यासाठी सोल्डिरग आणि वेिल्डग या प्रक्रियांचा वापर होतो. सोल्डिरगमध्ये धातूंच्या पट्टय़ांना सांधण्यासाठी वेगळ्या धातूचा किंवा संमिश्राचा वापर सोल्डिरग वायरच्या स्वरूपात होतो. सोल्डिरग वायरच्या संमिश्राचा वितळणांक हा ज्या धातूंना सांधणार आहे त्यांच्यापेक्षा कमी असावं लागतं. सोल्डिरग वायर म्हणून बहुतेकदा कथिल (टिन) आणि शिसं (लेड) यांचं संमिश्र वापरलं जातं. यामध्ये कथिलाचं प्रमाण ५पासून ७० टक्क्यांपर्यंत वेगवेगळं असू शकतं. संमिश्रातील कथिलाचं प्रमाण वाढवल्यास संमिश्राची तन्यता वाढते व त्याचं रोपण करणं सोपं जातं. खरं तर शिसं या धातूचा वितळणांक ३२७.५ अंश सेल्सिअस आहे तर कथिलाचा वितळणांक २३१.९ अंश सेल्सिअस आहे. पण जर संमिश्रातील कथिल/ शिसं यांचं प्रमाण ६०/४० असल्यास संमिश्राचा वितळणांक १८३ अंश सेल्सिअस इतका कमी आहे. शिसं शरीरात गेल्यास आरोग्यावर घातक परिणाम होतात, म्हणून शिसंविरहित सोल्डिरग वायरचा वापर होऊ लागला आहे.
वेिल्डग या प्रक्रियेतसुद्धा धातूंचे किंवा वेगवेगळ्या संमिश्रांचे भाग जोडले किंवा कापलेही जातात. या प्रक्रियेत वेगवेगळे भाग जोडताना ते वितळवून गरज पडल्यास दाबाचा वापर करून जोडतात. धातूंचे भाग जोडताना ते वितळविण्यासाठी उच्च तापमान मिळविण्यासाठी उच्च विद्युतदाब किंवा वायू इंधन वापरतात. वायू इंधन म्हणून अॅसिटिलीन वायूचा वापर करतात. अॅसिटिलीनशिवाय इतरही वायू इंधनं उपलब्ध आहेत.
वेिल्डगच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक 'ऑक्सिअॅसिटिलीन वेिल्डग आणि कटिंग' ही होय. यात अॅसिटिलीन हे वायू इंधन म्हणून वापरतात. तशी ही जुनी पद्धत आहे, पण अजूनही वापरात आहे. अॅसिटिलीन हे हायड्रोकार्बन असून अल्कीन गटातील रसायन आहे. अॅसिटिलीनचं ऑक्सिजनच्या सान्निध्यात ज्वलन होताना ज्योतीचं तापमान हे ३३०० अंश सेल्सिअस असून कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोजन वायू आणि उष्णता निर्माण होते. यानंतर कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन वायू ऑक्सिजनबरोबर संयोग पावतात व कार्बन डायऑक्साइड, उष्णता आणि पाण्याची वाफ निर्माण होते. गरजेनुसार खूपदा वेगवेगळ्या धातूंचे, संमिश्रांचे भाग जोडावे लागतात, तर काही वेळेला हे भाग कापावेही लागतात. धातूंचे भाग जोडण्यासाठी सोल्डिरग आणि वेिल्डग या प्रक्रियांचा वापर होतो. सोल्डिरगमध्ये धातूंच्या पट्टय़ांना सांधण्यासाठी वेगळ्या धातूचा किंवा संमिश्राचा वापर सोल्डिरग वायरच्या स्वरूपात होतो. सोल्डिरग वायरच्या संमिश्राचा वितळणांक हा ज्या धातूंना सांधणार आहे त्यांच्यापेक्षा कमी असावं लागतं. सोल्डिरग वायर म्हणून बहुतेकदा कथिल (टिन) आणि शिसं (लेड) यांचं संमिश्र वापरलं जातं. यामध्ये कथिलाचं प्रमाण ५पासून ७० टक्क्यांपर्यंत वेगवेगळं असू शकतं. संमिश्रातील कथिलाचं प्रमाण वाढवल्यास संमिश्राची तन्यता वाढते व त्याचं रोपण करणं सोपं जातं. खरं तर शिसं या धातूचा वितळणांक ३२७.५ अंश सेल्सिअस आहे तर कथिलाचा वितळणांक २३१.९ अंश सेल्सिअस आहे. पण जर संमिश्रातील कथिल/ शिसं यांचं प्रमाण ६०/४० असल्यास संमिश्राचा वितळणांक १८३ अंश सेल्सिअस इतका कमी आहे. शिसं शरीरात गेल्यास आरोग्यावर घातक परिणाम होतात, म्हणून शिसंविरहित सोल्डिरग वायरचा वापर होऊ लागला आहे.
वेिल्डग या प्रक्रियेतसुद्धा धातूंचे किंवा वेगवेगळ्या संमिश्रांचे भाग जोडले किंवा कापलेही जातात. या प्रक्रियेत वेगवेगळे भाग जोडताना ते वितळवून गरज पडल्यास दाबाचा वापर करून जोडतात. धातूंचे भाग जोडताना ते वितळविण्यासाठी उच्च तापमान मिळविण्यासाठी उच्च विद्युतदाब किंवा वायू इंधन वापरतात. वायू इंधन म्हणून अॅसिटिलीन वायूचा वापर करतात. अॅसिटिलीनशिवाय इतरही वायू इंधनं उपलब्ध आहेत.
वेिल्डगच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक 'ऑक्सिअॅसिटिलीन वेिल्डग आणि कटिंग' ही होय. यात अॅसिटिलीन हे वायू इंधन म्हणून वापरतात. तशी ही जुनी पद्धत आहे, पण अजूनही वापरात आहे. अॅसिटिलीन हे हायड्रोकार्बन असून अल्कीन गटातील रसायन आहे. अॅसिटिलीनचं ऑक्सिजनच्या सान्निध्यात ज्वलन होताना ज्योतीचं तापमान हे ३३०० अंश सेल्सिअस असून कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोजन वायू आणि उष्णता निर्माण होते. यानंतर कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन वायू ऑक्सिजनबरोबर संयोग पावतात व कार्बन डायऑक्साइड, उष्णता आणि पाण्याची वाफ निर्माण होते.
No comments:
Post a Comment