Somebody called so Indian Spy could not kill Don Dawood Ibrahim
ज्याप्रमाणे अमेरिकेने कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारले होते तशाच प्रकारे मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमला ठार मारण्याची संधी भारताकडे चालून आली होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला हे मिशन रद्द करण्यात आल्याने १९९३च्या मुंबई बॉम्बब्लास्ट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आजही पाकिस्तानात मोकळेपणे फिरत आहे.
भारतीय गुप्तचर संघटना मागील २० वर्षांपासून दाऊदच्या मागावर असून त्याला ठार करण्यासाठी गुप्त ऑपरेशन अंतर्गत एक स्पेशल कमांडो पथक पाकिस्तानात धाडण्यात आले होते. मात्र अनेकवेळा प्रयत्न करुनही दाऊद भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला नाही. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार दाऊदला पाकिस्तानातच संपवण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी योजना आखली होती.
या गुप्त मिशनबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, दाऊदला संपवण्यासाठी भारतीय गुप्तचर संघटना रॉने (रिसर्च अॅण्ड अलटिकल विंग) नऊ एजन्टला मिशनवर धाडले होते. त्यांना सुदान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांचा पासपोर्ट देण्यात आला होता. या टीमला 'सुपर बॉइज' असे गुप्त नाव ठेवण्यात आले होते. या ऑपरेशनसाठी रॉला इस्राइलच्या मोसादकडून मदत मिळत होती.
असा होता प्लॅन
दाऊद अनेक वर्षापासून कराचीमध्येच वास्तव्याला आहे. तो रोज त्याच्या क्लिप्टन रोडवरील घरातून डिफेन्स हाऊसिंग सोसायटीकडे जात असे. याचदरम्यान दाऊदला संपवण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार 'सुपर बॉइज'ने या मार्गावर असलेल्या दर्ग्याजवळ दाऊदला शूट करण्याचे निश्चित करण्यात आले होते. नियोजीत प्लॅननुसार १३ सप्टेंबर २०१३च्या दिवशी हे नऊ कमांडोज दर्ग्याजवळ पोजिशन घेऊन बसले होते. दाऊद कसा दिसतो, याबद्दल सर्व कमांडोजला पूर्ण माहिती असल्याने शिकार चुकण्याचा प्रश्नच नव्हता. काही क्षणातच दाऊदची गाडी दर्ग्यासमोर येणार तेवढ्यातच मुख्य कमांडोला फोनवरुन गोळी न चालवण्याचे आदेश आले आणि सगळा प्लॅन फसला. दाऊद समोरून गेला पण त्याचा 'गेम' मात्र होऊ शकला नाही. दरम्यान, हा कॉल कुणी आणि का केला होता, याबद्दल माहिती देण्यास संबंधित सुत्रांनी नकार दिला.
No comments:
Post a Comment