Thursday, February 12, 2015

'केबीसी'मध्ये पाच करोड जिंकणाऱ्या 'सुशील'चा झाला रंक!

'केबीसी'मध्ये पाच करोड जिंकणाऱ्या 'सुशील'चा झाला रंक!

'केबीसी'मध्ये पाच करोड जिंकणाऱ्या 'सुशील'चा झाला रंक!
नवी दिल्ली : छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात पहिल्यांदाच पाच करोड रुपये जिंकणारा सुशील कुमार कौतुकाचा विषय ठरला होता. पण, आता मात्र सुशीलकुमारकडे पाच करोडपैंकी दीडकीही उरलेली नाही.
२०११ साली करोडपती बनलेल्या सुशीलकुमारकडे सध्या ना काम आहे,  ना त्याच्याकडे 'केबीसी'मध्ये जिंकलेले पाच करोड रुपये...
बिहारमध्ये मोतिहारीमध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या  सुशीलकुमारनं बीग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात तब्बल पाच करोड रुपये जिंकले होते. टॅक्स आणि इतर कर वजा होऊन त्याच्या हातात ३.६ करोड रुपयांची राशी पडली होती.
पण, सुशीलकुमारच्या म्हणण्यानुसार आता त्याच्याकडे यातील गरजेपुरतेही पैसे उरलेले नाहीत. या जिंकलेल्या पैशांपैकी त्यानं काही पैसे आपलं जुनं घर बांधण्यासाठी खर्च केले आणि काही भावांच्या बिझनेसमध्ये गुंतवले.
काही पैसे बँकेत जमा आहेत, याच पैशांवर मिळणाऱ्या व्याजावर सध्या सुशीलच्या घराच खर्च भागतोय. परंतु, ही रक्कम आपल्या गरजेपेक्षाही कमी असल्याचं सुशीलकुमार म्हणतोय.
दिल्लीला जाऊन आयएएस ऑफिसर बनण्यासाठी कोचिंग क्लास सुशीलला जॉईन करायचा होता. पण, त्याचं हे स्वप्नही आता स्वप्नापूरतंच मर्यादित राहिलंय.
'कौन बनेगा करोडपती'नंतर 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सुशीलकुमार झळकला होता.

No comments:

Post a Comment

Mental Health Awareness in India

Mental Health Awareness in India Mental health is an essential aspect of overall well-being, but it remains a sensitive and often sti...