Wednesday, February 11, 2015

Which dress is good for my short height?

प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स
 
मी तेवीस वर्षांची आहे. पेशाने कण्टेण्ट रायटर असून मुंबईत राहते. माझी उंची ४ फूट १० इंच, वजन ३५ किलो आहे. वर्ण गोरा आहे. थोडक्यात, मी किरकोळ बांध्याची लहानखुरी मुलगी आहे. लवकरच माझं लग्न होणार आहे. तेव्हा स्मार्ट, स्टायलिश दिसण्यासाठी ड्रेसिंग आणि स्टायिलग टिप्स मिळू शकतील का? मला वनपीस ड्रेसेस फारसे आवडत नाहीत. माझ्या लहानखुऱ्या बांध्याला साजेशी कुठली स्टाइल आहे?
स्वतेजा

हाय स्वतेजा,
एकूण वर्णनावरून तू लहानशी, नाजूकशी, गोरीपान मुलगी असावीस असं वाटतं. तू खूप लकी आहेस. कारण तुझ्या लहानखुऱ्या बांध्यामुळे तुला इतर स्त्रीवर्गाप्रमाणे वय चोरायची गरजच पडत नाही. तू म्हणतेस तुला वनपीस ड्रेसेस फारसे आवडत नाहीत. हरकत नाही. तजेलदार पिवळा किंवा कोरल रंगछटेचे ब्लाऊज टॉप्स आणि खाली निळी किंवा काळी जीन्स असे कपडे ऑफिसमध्ये छान दिसतील. ऑफिसनंतरच्या मीटिंग्ससाठीही चालू शकतील. त्यातूनही ब्लाऊजवर जर काही बारीकसं नक्षीकाम किंवा मण्यांचं वर्क केलं असेल तर लुकमध्ये वेगळीच मजा येईल. याशिवाय नेहमीच्या जीन्स आणि टी-शर्टवर तुला रंगीत कार्डिगन (स्वेटरसारखे दिसणारे वजनाला हलके जॅकेट) वापरता येईल. एक लक्षात ठेव, तुझ्या ड्रेसमधील वरचा भाग म्हणजे टी-शर्ट, टॉप, जाकीट, कुर्ती, शर्ट नेहमी उंचीला कमी असायला हवे (जास्तीत जास्त कमरेपर्यंतच्या उंचीचे), तसंच शक्य झाल्यास ड्रेसचा वरचा भाग व खालचा भाग या दोन्हींचे रंग परस्पर विरुद्ध असले पाहिजेत. यामुळे उंची जास्त असल्याचा भास निर्माण होतो. ड्रेसेसच्या बाह्य़ांबद्दल बोलायचं तर स्लीव्हलेस पॅटर्नही तुला छान दिसतील आणि स्मार्ट लुकही देतील.
तुला ऑफिसमध्ये विशिष्ट ड्रेसकोडचं बंधन नसल्याने इट्स ग्रेट! तू वेगवेगळ्या प्रकारची जॅकेट्स घालू शकतेस. त्यामुळे तुला काम करताना उबदारही वाटेल. कामाच्या ठिकाणी तुला फॅशनेबल दिसायचं असेल तर बॉम्बर जॅकेट ट्राय कर. हे उंचीला कमी असणारं जॅकेट असून याच्या पुढची बाजू झिपने उघडबंद करता येते. हे जॅकेट कमरेला आणि मनगटाच्या ठिकाणी इलास्टिकच्या साहाय्याने घट्ट बसते. अशी जाकिटं एकाच रंगात असतात किंवा िपट्रेडही असतात. जीन्सवर िपट्रेड जॅकेट चांगलं दिसेल. या कपडय़ांवर पायात पम्प्स किंवा उंच टाचांचे शूज स्टिलेटोज घातले की तू झालीस डिनर पार्टीसाठी तयार. तुझ्या बाबतीत, पादत्राणाबद्दल सांगायचं तर उंच टाचांचे शूज, सँडल तू घालू शकतेस, फक्त पादत्राणांच्या टाचा (हील्स) अतिउंच नसाव्यात; अन्यथा ते तुझ्या लुकला शोभून दिसणार नाहीत. खरं तर स्कर्ट, टॉप असे कपडेही तुला घालता येतील. नेहमीच्या जीन्स-टीशर्टपेक्षा हटके असे हे कपडे तुला टिपिकल गर्ली लुक देतील यात शंकाच नको.
आता केसांबद्दल बोलू या. तुझे केस लांब आहेत की आखूड, याबद्दल तू काही सांगितलेलं नाहीस. इट्स ओके.. तू केसांचे बन्स किंवा वेणी असे प्रकार करू शकशील. यामागे हेतू हा की, बघणाऱ्या लोकांचं लक्ष तुझ्या कपडय़ांकडे वेधलं जाईल.
तर स्वतेजा, तुझ्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि स्मार्ट लुकसाठी मनापासून शुभेच्छा!!
मलाइका अरोरा खान

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...