Wednesday, February 11, 2015

Sweet Sixteen



प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास  वाचकांसाठी.
मी पुण्यात राहणारी मुलगी असून अकरावीत शिकत आहे. माझी उंची ५ फूट ६ इंच व बांधा सडपातळ असून, वर्ण गव्हाळ, केस तपकिरी काळे आणि लांब आहेत. माझ्या नेहमीच्या लूकमध्ये फारसा बदल न करता रोजच्यासाठी किंवा पार्टी लूकसाठी योग्य अशा काही ड्रेसिंग, स्टायिलग आणि मेकअप टिप्स मिळू शकतील का?  - मेघना
हाय मेघना,  
एकंदरीत वर्णनावरून तुझी पर्सनॅलिटी, कोणत्याही vn19फॅशन आणि स्टायिलगसाठी अगदी योग्य आहे असं दिसतं, त्यातही इतक्या लहान वयातच तू स्वतच्या लूकबद्दल जागरूक आहेस, इट्स व्हेरी गूड. तू पुण्यासारख्या मोठय़ा आणि उत्तम हवामान असलेल्या ठिकाणी राहते आहेस, तेव्हा हिवाळा, उन्हाळा कोणत्याही मौसमात वेगवेगळ्या, भरपूर स्टाईल्स करायला काहीच हरकत नाही. सध्या पुण्यात छान थंडी असेल, तेव्हा टी शर्ट वर जाकीट किंवा फुल स्लीव्हज टी शर्ट वर हाफ स्लीव्हज वूलन स्वेट शर्ट असे लेअरिंग ऑप्शन्स, स्टायिलगसाठी वापरता येतील. या शिवाय प्लेन जीन्स वर पिंट्रेड स्कार्फ (गळ्याभोवती गुंडाळण्याचा स्कार्फ कॉटन, लिनन, सिल्क किंवा लोकरीमध्येही हल्ली मिळतो.) फार छान दिसेल. हा स्कार्फ गळ्याभोवती वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळून, दरवेळी तुला वेगळी स्टाईल करता येईल. तुझ्यासाठी फुलाफुलांचे पिंट्रेड बॉम्बर जॅकेट हाही उत्तम पर्याय आहे. (बॉम्बर जॅकेट म्हणजे आखूड लांबीचे पुढे झिप असलेले जाकीट).
तुझी उत्तम उंची आणि गव्हाळ वर्ण लक्षात घेता, किरमिजी गुलाबी किंवा पोवळ्यासारख्या लाल रंगातले कपडे तुला सूट करतील. तेव्हा रंगीत जीन्स आणि बेसिक ग्रे (करडा) किंवा पांढरा टॉप हे ड्रेसिंग बेस्ट. या साध्या वाटणाऱ्या ड्रेसवर तू काळ्या रंगातील हील्स असलेली पादत्राणं वापरून स्वतचा लूक स्मार्ट आणि स्टायलिश बनवू शकतेस.
vn20तू स्लिम आहेस तेव्हा तुला वेगवेगळे ड्रेसप्रकार वापरून पाहायला काहीच हरकत नाही. बॉडीकॉन ड्रेस (बॉडी फिटिंग) प्रकारही तुझ्या सडपातळ बांध्याला खुलून दिसेल. या प्रकारात आपला बांधा अधिक सुडौल भासतो. जर पुरेशा आत्मविश्वासाने असे ड्रेस घालू शकलीस तर, बघणाऱ्या व्यक्तीचे लक्ष तू नक्कीच वेधून घेशील.
कपडय़ांच्या बरोबरीने, योग्य प्रकारची पादत्राणे घालणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कॉलेजमध्ये कुल आणि स्मार्ट दिसायचे असेल तर वेजेस (तळपायाचा मागील भाग उंचावला जाईल असे उंच टाचांचे शूज किंवा सँडल) हा पादत्राणांचा प्रकार वापरता येईल. नाईट पार्टीत चमकायचे असेल तर शायिनग नेकपीस, ब्रेसलेट, इअरिंग किंवा चमकदार रिंग यापकी एखादी एक्सेसरी ट्राय करता येईल.
आता मेकअप बद्दल बोलायचं झालं तर सध्याच्या तुझ्या कोवळ्या वयात, निसर्गतच  त्वचा तेजस्वी आणि चमकदार दिसते, त्वचेची ही चमक राखायची असेल तर खूप थंडीत, कडक उन्हाळ्यापासून तिची काळजी घ्यायला हवी. नियमित स्वच्छता बाळगून चेहऱ्याच्या आणि पूर्ण शरीराच्या त्वचेची निगा राखायला हवी. सकस आणि ताजं अन्न, पुरेसं पाणी रोजच्या आहारात हवं. त्यामुळे तुझी त्वचा निरोगी आणि नितळ दिसायला मदत होईल, कोवळीक टिकून राहील. या शिवाय पार्टीसाठी किंवा एरवी वापरायची सौंदर्यप्रसाधनं उत्तम दर्जाची असणं, तसंच त्या उत्पादनांची एक्सपायरी डेट तपासून घेणं गरजेचं आहे. त्यांचा त्वचेवरील वापरही अत्यल्प प्रमाणात होणं महत्त्वाचं आहे. तेव्हा माय डिअर, गेट रेडी टू लूक चाìमग, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याकडून खूप, खूप शुभेच्छा.
मलाइका अरोरा खान

No comments:

Post a Comment

10-Step Korean Skincare Routine for Beginners in Hindi

  शुरुआती के लिए 10-स्टेप कोरियन स्किनकेयर रूटीन: चमकदार त्वचा का राज Korean Skincare Routine कोरियन स्किनकेयर रूटीन ने पूरी दुनिया में अपनी...