Saturday, August 19, 2017

August 19, 2017

how does acupuncture work to relieve pain?

सन १९७८. शांघायमधील एका युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील गोष्ट. न्यूयॉर्क हॉस्पिटल, कॉर्नेल मेडिकल सेंटर, तसेच मेमोरियल स्लोन-कॅटरिंग कॅन्सर सेंटर येथे कार्यरत असणारे क्लिनिकल मेडिसीन व काार्डियॉलॉजी विषयाचे प्रोफेसर आणि त्यांचे काही डॉक्टर मित्र विशेष निमंत्रित म्हणून शांघायमधील या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये २८ वर्षांच्या एका तरुणावर होणाऱ्या हृदयाच्या एका झडपेची शस्त्रक्रिया बघण्याकरिता म्हणून उपस्थित होते. रुग्णस्त्रीला एका व्हिलचेअरवरून ऑपरेशन थिएटरमध्ये आणले जाते. ऑपरेशनच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिला तयार केले जाते आणि प्रमुख हृदयशस्त्रविशारद स्कालपेल चालवून तिची छाती उघडणार तोच प्रो. डॉ. रोझेनफेल्ड आश्चर्याने विचारतात, ‘डॉक्टर अ‍ॅनेस्थेशियाचे काय?’ चिनी डॉक्टर तिच्या कानाकडे बोट दाखवून दर्शवितात तिला सुझोक या पद्धतीचे अ‍ॅक्युपंक्चर करून अ‍ॅनेस्थेशिया दिला गेला आहे. पुढच्या साधारण ३० मि.मध्ये शस्त्रक्रिया पूर्ण होऊन रुग्ण हसतहसत व्हिलचेअरवरून बाहेर जातो. डॉ. इझाडोर रोझेनफेल्डसारख्या अ‍ॅलोपाथीच्या निष्णात डॉक्टरना आलेला हा अनुभव त्यापूर्वी काही व त्यानंतर अनेकांनी घेतला आणि पारंपरिक चिनी वैद्यकाकडे जगाचे लक्ष वेधले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विशेषत: अमेरिकी अध्यक्ष निक्सन यांच्या चीन भेटीनंतर पाश्चात्त्य जगाचे याबाबतीतले औत्सुक्य वाढीस लागले असे दिसून येते.
अ‍ॅलोपथी, अ‍ॅक्युपंक्चर, अ‍ॅक्युप्रेशर, आयुर्वेद, होमिओपथी, कीरोप्रॅक्टिक ऑस्टोओपथी, निसर्गोपचार, योगोपचार, मसाज, वनौषधी, रंगोपचार, पुष्पोपचार, सुगंधोपचार, जलोपचार, चुंबकोपचार, हिप्नॉसिस, क्रिस्टलथेरपी अशा सुमारे ८४ उपचार पद्धती आज जगात प्रचलित आहेत. त्यापैकी काहींना जागतिक आरोग्य संघटनेने विशिष्ट मर्यादेत मान्यता दिली आहे. यात अ‍ॅलोपथी अथवा आधुनिक वैद्यक हा प्रमुख प्रवाह असल्याने इतरांना पर्यायी अथवा Alternate  किंवा Complementary Medicine या नावाने संबोधण्यात येते. यातील काही वैद्यकपद्धती उदा. अ‍ॅक्युपंक्चर, सुगंधोपचार, होमिओपथी या ‘ऊजा’ अधिष्ठान असलेल्या (Energybased) तर अ‍ॅलोपथी, बाराक्षार, आयुर्वेद या बऱ्याचशा ‘द्रव्य’ अधिष्ठान असलेल्या (Matter Based) अशा गणल्या जातात. या दोन्ही प्रकारात बरेचसे सैद्धान्तिक फरक असल्याने, आजाराच्या व उपचारांच्या त्यांच्या त्यांच्या संकल्पनेतही खूप फरक आढळतो.
प्राणीमित्रांच्या उत्पत्तीबरोबरच विविध विकारांची वा रोगांची उत्पत्ती झाली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही आणि या व्याधी-विकारांवर मात करण्याकरिता मानवाने केलेल्या अखंड परिश्रम व सतत अभ्यासातून अनेकविध उपचारपद्धती निर्माण होणेही स्वाभाविकच होते. काळाच्या ओघात यापैकी काही नष्ट झाल्या, काही नवीन निर्माण झाल्या, काहींचे नव्याने पुनरुज्जीवन झाले. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने एखाद्यात एखादी उपचारपद्धती लागू पडते तर दुसऱ्यास तिचा काडीचाही फायदा होत नाही. उपचारपद्धतींच्या या गलबत्यात सर्वसामान्य रुग्ण भांबावून न गेला तरच नवल! कित्येक वेळा रुग्णाला आपल्याला झालेल्या व्याधीकरिता नेमकी कोणती उपचारपद्धती अवलंबावी तेच कळत नाही व त्यामुळे तो विविध उपचारपद्धती ‘स्वीच ऑन- स्वीच ऑफ’ करीत राहतो व त्यामुळे तोही गोंधळतो व डॉक्टरांचाही गोंधळ वाढत राहतो. यावर उपाय म्हणजे- रुग्णशिक्षण आणि डॉक्टरांनी विविध उपचारपद्धती माहिती करून घेणे व त्या त्या रुग्णाकरिता सर्वोत्तम उपचारपद्धती निवडून त्या त्या तज्ज्ञांकरवी त्याला मार्गदर्शन व त्याच्यावर उपचार करणे! यातूनच काही संशोधक, र्सवकष वैद्यकाकडे (Holistic Medicine) वळू लागले आहेत व ती कदाचित वैद्यकशास्त्राची नवी दिशा असू शकेल! उपरोक्त विविध उपचारपद्धतींपैकी अ‍ॅलोपथीच्या खालोखाल जगभरात प्रचलित असलेली उपचारपद्धती म्हणजे पारंपरिक चिनी वैद्यक. भारतीय आयुर्वेदाप्रमाणेच हजारो वर्षांच्या कालावधीत (Traditional Chinese Medicine) चा विकास झाला. अ‍ॅक्युपंक्चर (सुयांच्या साहाय्याने शरीरात काही विशिष्ट बिंदूंवर टोचणे), मॉक्सिबश्चन (मॉक्सा नावाची वनस्पती उपरनिर्दिष्ट बिंदूवर जाळणे), वनौषधी, मसाज, आहार आणि व्यायाम (ताईची पद्धत) ही या पारंपरिक चिनी वैद्यकाची काही प्रमुख अंगे या सर्व अंगांचा जोर हा रोगोपचारांपेक्षा रोगप्रतिबंधनावर आहे ही मुद्दाम लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट. या सर्व प्रकारातही सर्वाधिक लोकप्रिय अंग म्हणजे अ‍ॅक्युपंक्चर (आणि अ‍ॅक्युप्रेशर!)
उपरोल्लेखित डॉ. इसाडोर रोझेनफेल्ड आपल्या एका लेखात रुग्णांना एक महत्त्वाचा सल्ला देतात. ते म्हणतात सर्वसाधारण शस्त्रक्रियांकरिता नेहमीच्या ‘मूल’ तंत्राचाच वापर करा; पण विशिष्ट कारणाशिवायच तुमची पाठ सतत दुखत असेल किंवा शरीरात कोठे ना कोठे वेदना असेल (विशिष्ट कारण नसताना), तुम्हाला दीर्घकालिक अस्थमा वा संग्रहणी असेल, दारू-तंबाखू वा ड्रग्जच्या विळख्यातून सुटावयाचे असेल, कॅन्सरवरील केमोथेरपीनंतर प्रचंड मळमळ होत असेल, शरीराचा एखादा भाग बधीर होत असेल तर अ‍ॅक्युपंक्चरचा जरूर विचार करा. एखाद्या तज्ज्ञाकडून त्याविषयी मार्गदर्शन घ्या. अर्थात हे सर्व सारासार विचार करून व विवेकाचा अवलंब करूनच!  

* इतिहास
मंगोलियाच्या अंतर्भागात झालेल्या उत्खननामध्ये सापडलेल्या दगडी सुयांमुळे हे शास्त्र अतिप्राचीन असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘नी जिंग’ या पीतसम्राटाने सुमारे २,२०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या वैद्यकविषयक ग्रंथात अ‍ॅक्युपंक्चरचा उल्लेख आहे. ‘पीएन चुह’ नावाच्या अ‍ॅक्युपंक्चरतज्ज्ञाने बेशुद्धावस्थेतील राजकुमाराला या उपचारपद्धतीचा वापर करून शुद्धीत आणल्यानंतर हे शास्त्र झपाटय़ाने लोकप्रिय झाले, असे इतिहास सांगतो. आजतर जागतिक आरोग्य संघटनेनेही या शास्त्रास, (विविध विकारांवर) पर्यायी उपचारपद्धती म्हणून मान्यता दिली आहे.
* शास्त्रीय बैठक
सर्वसाधारणपणे बहुतांश उपचारपद्धती या द्रव्य पायाभूत (Matter Based) असतात तर अ‍ॅक्युपंक्चर व अ‍ॅक्युप्रेशर ही पद्धती ऊर्जा पायाभूत (Energy Based) आहे. आपल्या शरीरात चैतन्य निर्माण करणारी प्राणशक्ती ही शरीरात काही विशिष्ट मार्गानी (Meridians) वाहते. या वहनात अडथळा निर्माण झाला तर ते ते अवयव आजारी होतात व हे वहन पूर्ववत होताच त्या त्या अवयवांचे कार्य परत नीट होते. विशिष्ट बिंदूवर सुया टोचणे वा दाब देणे (अ‍ॅक्युपंक्चर वा अ‍ॅक्युप्रेशर) यामुळे हे बिंदू उत्तेजित वा बधीर होतात व त्यामुळे प्राणशक्तीच्या वहनात बदल होतो. असे प्राणशक्ती वहनाचे १४ प्रमुख मार्ग असून, त्यावर सुमारे ५०० प्रमुख बिंदू (यातही कान व पायाचे तळवे यावर अधिक) असतात असे हे शास्त्र मानते.
*  आधुनिक दृष्टिकोन
आधुनिक शास्त्राच्या मतानुसार हे मार्ग दाखविता येत नाहीत; परंतु त्यांच्या परिणामांचे मात्र मोजमाप करता येते. उदा.- रोगनिवारण, अवयवांच्या कार्यात सुधारणा, शरीरात ‘एन्डॉर्फिन्स’ या प्रकारची वाढलेली पातळी इ. चिनी पारंपरिक वैद्यकानुसार अनेकविध रोगांत या तंत्राचा वापर करता येत असला तरी आधुनिक वैद्यकाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, वेदनाशमन, भूल (Anaesthesia) सांध्यांचे व स्नायूंचे विकार रोगप्रतिकार शक्ती वाढविणे इ.करिता या शास्त्राचा परिणामकारक वापर करता येतो. अर्थात अ‍ॅक्युपंक्चर वा अ‍ॅक्युप्रेशर शिकणे व आत्मसात करणे हे वाटते तितके सहजसाध्य नाही.
*  अभ्यास
अ‍ॅक्युपंक्चर वा अ‍ॅक्युप्रेशरशास्त्र पूर्णपणे आत्मसात करण्याकरिता चिनी तत्त्वज्ञानाचा व चिनी वैद्यकाचा अभ्यास जरुरीचा आहे. त्यातही खालील काही तत्त्वांचा अभ्यास नितांत आवश्यक समजावा.
’ टाओ (TAO) ’ यीन व यँग ’ आठ तत्त्वे- यीन / यँग, गरम / थंड, आत / बाहेर, कमी / अधिक ’ तीन खजिने- ची, शेन आणि जिंग ’ पाच मूलतत्त्वे- पृथ्वी, आप, तेज, धातू, लाकूड.
वरील सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केल्यानंतर अ‍ॅक्युपंक्चर / अ‍ॅक्युप्रेशर हे एक महत्त्वाचे पर्यायी वैद्यकशास्त्र आहे हे वाचकांनी जाणलेच असेल. (अर्थात त्याच्या मर्यादा जाणूनच!)

acupuncture
acupuncture meaning
acupuncture benefits
acupuncture history
acupuncture wiki
acupuncture for back pain
acupuncture points
acupuncture reviews
acupuncture side effects
acupuncture benefits
acupuncture benefits and risks
how does acupuncture work to relieve pain?
acupuncture treatment for back pain
acupuncture benefits for anxiety
pros and cons of acupuncture
benefits of acupuncture for fertility
acupuncture benefits for weight loss
is acupuncture painful
August 19, 2017

Metamorphic Therapy

ही पद्धत डॉक्टरमहाशयांनी अनेक इच्छुकांना शिकविली; पण आधुनिक वैद्यकाचे सर्व उपासक मात्र त्याने स्तंभित झाले व त्यांनी तिकडे चक्क पाठ फिरविली.‘आपले डोके आकाशात असले तरी पाय मात्र जमिनीवरच असावेत’ असा एक वाक्प्रचार आपल्याकडे रूढ आहे. याचा अर्थ, आपली कल्पनाशक्ती अवकाशात विहरत असली तरी वास्तवाचे भान मुळीच सुटता कामा नये.
पण या वाक्प्रचाराच्या लाक्षणिक अर्थाने समाधानी न होता कोणी शब्दश: अर्थ अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर?
ब्रिटिश निसर्गोपचार तज्ज्ञ आणि रिफ्लेक्सॉलॉजिस्ट रॉबर्ट जॉन (Robert st. John) याने मनोविकलांग मुलांवर (रिफ्लेक्सॉलॉजीने) उपचार करता करता अशाच एका नव्या उपचार पद्धतीला जन्म दिला; या उपचार पद्धतीचे बारसे त्याने सुरुवातीस ‘प्रसूतीपूर्व उपचारपद्धती’ (Prenatal Therapy) असे केले. पण या उपचारपद्धतीमुळे केवळ रोगनिवारणच होणे वा काही शारीरिक बदलांपुरतीच ती मर्यादित राहते असे नव्हे तर त्यामुळे माणसाच्या एकंदर व्यक्तिमत्त्वात, स्वभावात व र्सवकष आरोग्यातच बदल होतो, अशी त्याची धारणा झाली व म्हणून रुपांतर करणारी उपचारपद्धती (Metamorphic Therapy) असे तिथे नामरुपांतर त्याने पुढे केले.
काय आहे मेटामॉर्फिक तंत्र?
एका अर्थाने ही उपचारपद्धती नसून ते आपल्या एकंदर आरोग्यात बदल घडवून आणणारे तंत्र आहे असा हे तंत्र वापरणाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे शरीरांतर्गत जीवनउर्जा कळ दाबल्यासारखी कार्यान्वित होते व त्यामुळे रोगनिवारण तर होतेच; पण आरोग्याच्या आणखी उच्चस्तरावर आपण पूर्ण विकसित होण्यास मदत होते असा या उपचारकांचा दावा आहे.
आपले पाय आपल्या पूर्ण अस्तित्वाचे निर्देशक आहेत असेही मंडळी मानतात. पाय खऱ्या अर्थाने जमिनीवर असतात म्हणजे आपल्या मूलस्रोताशी त्यांचा कायम संपर्क असतो व त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टींशी म्हणजे ‘बदल व हालचाल’ त्यांचा प्रत्यक्ष सबंध असतो व त्यामुळे पायांवर (म्हणजे पायाच्या तळव्यांवर) उपचार म्हणजे संपूर्ण शरीर-मनावर उपचार अशी या तंत्राचा अवलंब करणाऱ्यांची धारणा आहे.
पायाच्या तळव्याचे विविध भाग शरीराच्या विविध भागांचे निर्देशक आहेत. (याबाबतीत त्यांचे रिफ्लेक्सॉलॉजी ना अ‍ॅक्युप्रेशरच्या एका तंत्राशी साधम्र्य आहे) एवढेच नव्हे तर हे विविध भाग विविध मनोवृत्ती व भावनांशीही निगडीत आहेत, असेही मंडळी मानतात. याही पुढे जाऊन आपण गर्भावस्थेत असताना ज्या आपल्या शारीरिक, मानसिक व भावनिक ठेवणीचा पाया घातला जातो तो कालखंड (४० ते ४२ आठवडे), पायाच्या तळव्यांच्या आतल्या बाजूस म्हणजे अंगठय़ाचे मूळ ते घोटा या प्रदेशात, ४० ते ४२ बिंदूच्या माध्यमातून निर्देशित केला जातो असे ही मंडळी मानतात. साहजिकच या भागावर काम केल्यास (स्पर्श, दाब, उत्तेजना इ. माध्यमातून) न केवळ शरीराच्या वा मनाच्या विविध वृत्तींवर सकारात्मक परिणाम घडविता येतो तर गर्भावस्थेत निर्माण झालेले नकारात्मक पॅटर्न बदलून ते सकारात्मकही करता येतात असा या मंडळींचा दावा आहे.
रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये पायाच्या तळव्यांवरील दुखरे भाग (जेथे त्यांच्या सिद्धांताप्रमाणे जैवउर्जेचा प्रवाह खंडीत झालेला असतो ते भाग) शोधून त्यावर दाब देऊन उपचार केले जातात तर या तंत्रात तेथे प्रत्यक्ष दाब न देता त्यांच्या अस्तित्वाची केवळ दखल घेतली जाते व जीवनउर्जेचा प्रवाह उत्तेजित झाल्यावर या दुखऱ्या बिंदूंची आपोआप काळजी घेतली जाईल असे मानण्यात येते. म्हणूनच बऱ्याच वेळा या मंडळींना उपचारक न म्हणता ‘उत्प्रेरक’ (catalyst) असे संबोधण्यात येते.
प्रत्यक्ष उपचार कसे देतात? यात ‘उत्प्रेरक’ रुग्णाजवळ बसून त्याच्या पायाच्या तळव्यांना (विशेषत्त्वाने आतील बाजूस) हलका; पण तालबद्ध असा स्पर्श करतो. अशा प्रकारच्या साधारण २० मि.च्या उपचारांनंतर तो रुग्णाचा हाताच्या तळव्यांना तसेच मस्तकाच्या मध्यभागी तसेच तळाशी (मान व मस्तक यांच्या सांध्यापाशी) व कानाच्या मागील बाजूसही १० ते १५ मि. स्पर्श करतो. असे उपचार काही आठवडे वा काही महिनेही करावे लागतात.
अन्य अनेक शारीरिक विकारांबरोबरच शैक्षणिक समस्याग्रस्त मुलांवर तसेच स्वमग्न मुलांवर (Autistic children) याचा चांगला उपयोग होतो असे हे उपचारक म्हणतात.

कर्करोगग्रस्त रुग्ण तपासल्यानंतर त्यांच्यामध्येही बेंबीच्या वर असाच बद्द आवाज येताना त्यांना आढळला.
आधुनिक दृष्टीकोन काय सांगतो? संपूर्ण वस्तूचा ‘Hologram’ तंत्राने फोटो काढला व त्याचा एखादा तुकडाही पुन्हा विकसित केला तर त्यातून ती वस्तू पुन्हा पूर्णपणे दृश्यमान होते. याच पद्धतीने संपूर्ण- शरीर व मन- पायाच्या वा हाताच्या तळव्यावर वा बाह्यकर्णावर निर्देशित होते काय? आजच्या घटकेला तरी आधुनिक विज्ञान वा वैद्यक असे मानत नाही. (पण पारंपरिक चीनी वैद्यकात तशी धारणा आहे!) व त्यामुळे Metamorphic Technique आजच्या घटकेला तरी ‘गूढ’च राहते. यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे असे वाटते!
याहून अधिक ‘गूढ’ व वादग्रस्त तंत्र म्हणजे रेडिऑनिक्स (Radionics)! त्याविषयी थोडे.
इतिहास : अमेरिकन न्यूरॉलॉजिस्ट डॉ. अल्बर्ट अब्राम्स (Dr. Albert Abroms) यांना एका कर्करोगग्रस्त रुग्णाचे पोट तपासून पाहताना, नेहमीच्या पोटाच्या पोकळ आवाजाऐवजी बद्द आवाज आढळला. बरे तेथे (म्हणजे बेंबीच्या वर) कोणतीही गाठ वा अन्य काही विकृतीही आठवली नाही. अन्य कर्करोगग्रस्त रुग्ण तपासल्यानंतर त्यांच्यामध्येही बेंबीच्या वर असाच बद्द आवाज येताना त्यांना आढळला. कर्करोगाव्यतिरिक्त अन्य व्याधी वा विकारांनीग्रस्त रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना पोटाच्या विविध भागात (विविध रोगांनुसार) अशा प्रकारचाच बद्द आवाज येताना आढळला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पूर्ण निरोगी माणसानेसुद्धा हातात एखादी रोगग्रस्त उती (Tissue) धरली, तर त्याच्याही पोटावरच्या आघात-तपासाने (Percvssion) असाच बद्द आवाज येताना त्यांना आढळला. या सर्व निरीक्षणांमधून त्यांनी एक निष्कर्ष काढला (सन १९२०) व तो म्हणजे, रोग हा मूलत: पेशीं नाशाशी संबंधित नसून, शरीरातील इलेक्ट्रॉन्सचे संतुलन बिघडल्याने निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्जनाशी (Radionics) संबंधित आहे. पुढे पोटाच्या एकाच क्षेत्रात विविध रोगांची किरणोत्सर्जन क्षेत्रे एकमेकामध्ये मिसळू लागली. तेव्हा ती वेगवेगळी लक्षात येण्याकरिता त्यांनी एक यंत्र तयार केले त्याचे नाव बायोडायनॅमोमीटर! (Biodynamometer). याच यंत्राला पुढे ‘अ‍ॅब्रामचा ब्लॅक बॉक्स’ असे संबोधण्यात येऊ लागले.
पुढे डॉ. अ‍ॅब्रामनी असेही दाखवून दिले की रुग्णाचे निदान करताना, प्रत्यक्ष रुग्ण समोर नसला तरीही चालू शकते तर त्याऐवजी रुग्णाची एखादी उती (रक्ताचा नमुना किंवा केस) बायोडायनॅमोमीटरला जोडलेल्या एखाद्या भांडय़ात डायनामायझ्र (Dynamiser) ठेवून तो बायोडायनॅमोमीटर एखाद्या निरोगी व्यक्तीला जोडून त्याचे पोट तपासूनही त्या रुग्णाचे निदान करता येते! ही पद्धत डॉक्टरमहाशयांनी अनेक इच्छुकांना शिकविली; पण आधुनिक वैद्यकाचे सर्व उपासक मात्र त्याने स्तंभित झाले व त्यांनी तिकडे चक्क पाठ फिरविली. पुढे अमेरिकन कायरोप्रॅक्टर रुथ ड्राऊनने केवळ निदानाकरिताच नव्हे तर उपचारांकरिताही (रुग्ण समोर नसला तरी वरील पद्धतीने त्याच्या उतीसमोर ठेवून!) या पद्धतीचा अवलंब केला. पण पुढे तिच्यावर वैद्यकीय फसवणुकीचा दावा दाखल केला गेला व त्यात तिला तुरुंगवासही झाला. ब्रिटनमध्ये मात्र जॉर्ज डि ला वॉर नावाच्या इंजिनियरने यावर बरेच संशोधन केले. सन १९२४ मध्ये ‘रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन’ने रेडिऑनिक्स या उपरोल्लेखित उपचार पद्धतीच्या परिणामकारकतेची वर्षभर कसून चौकशी केली व त्यात त्यांना या पद्धतीचा उपयोग दिसून आला. मात्र ‘रेडिऑनिक्स’ नेमके काय व कसे साधते ते काही आजही सांगता येत नाही.
आज अमेरिकेत या उपचारद्धतीला कायदेशीर अधिष्ठान नाही. ब्रिटनमध्ये ती चालते. प्रत्यक्ष रुग्ण समोर नसला तरी त्याची एखादी उती (रक्ताचा थेंब, नखाचा तुकडा किंवा केस इ.) समोर साक्षी (witness) ठेवून, विविध यंत्रांच्या साहाय्याने त्यातील उर्जेतील बिघाड शोधला जातो व नंतर दूरस्थ पद्धतीने रुग्णावर उपचार करताना, उर्जेतील हा बिघाड नाहीसा करून संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो. अ‍ॅलर्जी, दमा, सांधेदुखी अशा विविध व्याधी विकारांवर या पद्धतीने उपाय करता येतात असे या पद्धतीचा अवलंब करणारे उपचारक दावा करतात. अर्थात आजही आधुनिक वैद्यकाला रेडिऑनिक्सचे हे सिद्धान्त पचनी पडणे कठीणच!
मानवातील, किंबहुना सजीवातीलच, ‘चेतना’ हा नेहमीच गुंतागुंतीचा (व म्हणूनच गूढ!) विषय मानला गेला आहे. ही चेतना शरीरात नेमकी कोठून उद्भवते, ती शरीरात कशी ‘खेळते’, ती मोजता येते का, निरोगी स्थितीत व रोगावस्थेत तिची पातळी वेगवेगळी असते का, बाह्य यंत्रांनी ही ऊर्जा मोजून, शरीरांतर्गत रोगाचे नेमके निदान करता येते का व बाह्ययंत्रांनी त्या उर्जेचे परत संतुलन साधता येते का, हे व असे अनेक प्रश्न आज तरी (बऱ्याच प्रमाणात) अनुत्तरीत आहेत असे म्हणावयास हरकत नाही. भविष्यात काय आहे कोणास ठाऊक?

Metamorphic Therapy
metamorphic technique testimonials
metamorphic technique youtube
metamorphic technique practitioners
benefits of metamorphic technique
metamorphic technique training
metamorphic technique courses
metamorphic technique london
metamorphic technique for babies
August 19, 2017

what is reiki and how does it work

सर्वसाधारणपणे उपचार म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर गोळ्या, औषधे, शल्यक्रिया, मसाज, लेप, व्यायाम, आहार-विहाराची पथ्ये, किरणोपचार, मानसोपचार, समुपदेशन या व अशा काही ठोस गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण कोणी नुसते आपले हात हातात घेऊन किंवा स्पर्श करून किंवा शरीराभोवती काही हातवारे करून आपल्याला बरे करतो म्हणाला तर आपल्याला निश्चितच चमत्कारीक वाटेल. वरवर विचित्र व चमत्कारीक भासणाऱ्या, आधुनिक वैद्यकाची निश्चित शास्त्रीय बैठक शोधू पाहणाऱ्या अशा काही चिकित्सा व उपचारपद्धतींचा गट म्हणजे उर्जावैद्यक?
आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधू पाहणाऱ्या सर्व शास्त्रांनी, तत्त्वज्ञानांनी, विज्ञानाने व वैद्यकाने एक गोष्ट निश्चितपणे मान्य केली आहे व ती म्हणजे सजीव व निर्जिव किंवा चेतन व अचेतन यामधील निश्चित फरक म्हणजे चेतना, चैतन्य किंवा उर्जा! वेगवेगळ्या शास्त्रात तिचे नामानिधान बदलते. उदा. आधुनिक विज्ञान व वैद्यकात ‘ऊर्जा’ (Energy), जुन्या वैद्यकात ‘जीवनशक्ती’ (Lifeforce), योगशास्त्रात ‘प्राणशक्ती’, चीनी वैद्यकात 'chi', होमिओपथीत 'Vital Force' इ. इ. परंतु मूळ वैचारिक बैठक सारखी आहे. या उर्जेमुळे अचेतन, चेतन होते व मृत्यूसमयी या चेतनातून उर्जा नाहीशी होते व ते परत अचेतन होते. चेतनाची अवस्था बिघडली, असंतुलन झाले की, आपण ‘रोग’ झाला असे म्हणतो. हा ‘रोग’ नाहीसा करण्याकरिता सर्वसाधारण पारंपरिक वा आधुनिक वैद्यकपद्धतीवर उल्लेखिल्याप्रमाणे काहीतरी हास्य व ठोस (Tangible) अशा पद्धती वापरतात, थोडक्यात बहुतांशी वेळा त्यातील ‘अचेतन’ वा ‘द्रव्य’ (Matter) भागावर उपचार करतात व त्यातून ‘चेतन’ दुरुस्त होईल अशी अपेक्षा ठेवतात. ‘उर्जा’ वैद्यक या ‘चेतना’तील उर्जेवर उपचार करण्याचा दावा करतात व त्यातून ‘चेतन’ दुरुस्त होतो, रोगनिवारण होते असे म्हणतात.
उर्जावैद्यकापुढची आजची मोठी समस्या म्हणजे या उर्जेचे ठोस स्वरूप दाखविणे, ‘रोगट’स्थितीत या उर्जेच्या पातळीत वा रचनेत बदल होतो असे सिद्ध करणे व उपचारपद्धतीनी ही पातळी व रचना ठीक होते व रोग नाहीसा होतो हे सिद्ध करणे आणि हे सर्व आधुनिक विज्ञानाचे निकष लावून! आजच्या घटकेला तरी या सर्व गोष्टी ‘धूसर’ आहेत; पण ‘धूसर’ आहेत म्हणून त्या ‘नाहीत’ असे म्हणणे म्हणजे वैचारिक काठिण्य होय. योगशास्त्रात ‘प्राण’शक्ती गृहीत धरून; चीनी वैद्यकात ही जीवन उर्जा,‘ची’ शरीरातून विविध मार्गानी प्रवाहित होते (Meridians) व त्यात अडथळा आल्यास विविध रोगांची निर्मिती होते हे गृहित धरून त्यावर दाब देऊन (Acupressure), सुया टोचून (Acupressure) वा मॉक्सा वनस्पती जाळून (Moxibustion) हा खंडीत प्रवाह ठीक करून; किर्लिऊन फोटोग्राफीने शरीराभोवतालच्या आभेचे (Aura) चित्रण करून, रोगामुळे त्यात होणारे बदल जाणून घेऊन त्यानुसार उपचार केले जातात; शरीराचे विद्युतचुंबकीय पातळीवरील अस्तित्व मान्य करून, रोगस्थितीत त्यात बदल होतात व ते काही विशिष्ट उपचारांनी ठीक होतात असे गृहित धरून तशी उपचारपद्धती वापरली जाते; हे सर्व उर्जावैद्यकाचे विविध आयाम होत. विविध उर्जावैद्यक (Energy Medicine) उपचारपद्धतींचे या लेखात आपण विहंगावलोकन करणार असून पुढे त्यातील काही प्रसिद्ध उपचारपद्धती खोलात जाऊन पाहणार आहोत.
उर्जा वैद्यकाच्या विविध पद्धती :
या सर्व उपचार पद्धतींप्रमाणे प्रमुख सूत्र म्हणजे शरीरात जीवनउर्जा खेळती असते, तिचे असंतुलन झाले की, रोग निर्मिती होते, या उर्जेचे परत संतुलन साधले की आरोग्यप्राप्ती होते. हे संतुलन साधण्याकरिता स्पर्शाचा वापर करणाऱ्या Touch Technique किंवा न करणाऱ्या Nontouch Technique किंवा Absentia अशा दोन प्रमुख गटात या पद्धतींची विभागणी केली जाते. वेगवेगळ्या पद्धती उर्जेच्या वेगवेगळ्या आयामांवर लक्ष केंद्रीत करताना दिसतात. उदा. आभा (Aura), चक्र (Chakra), मेरिडियन यंत्रणा (Meridian System), जीवनउर्जाक्षेत्र (Human Energy Field) इ. या विविध उपचारपद्धती खालीलप्रमाणे-
१. रेकी (Reiki)- रे म्हणजे वैश्विक, की म्हणजे जीवनउर्जा. आपली जीवन उर्जा ही वैश्विक उर्जेचाच एक भाग असून, बिघडलेली जीवनउर्जा ठीक करण्याकरिता वैश्विक उर्जा वापरली जाते ती उपचारकाच्या माध्यमातून. यात स्पर्श (Touch) किंवा विनास्पर्श (Distant Reiki) अशा दोन्ही पद्धती असून, जपानमधील डॉ. मिकाओ उसुई यांनी ही पद्धत प्रथम प्रचलित केली.
२. मेरिडिअन टॅपिंग (Meridian Tapping)- नकारात्मक भावनांनी शरीरातील जीवनउर्जेच्या प्रवाहात निर्माण होणारे अडथळे यात दूर केले जातात. त्याकरिता एखादी नकारात्मक भावना. उदात. क्रोध, द्वेष, मत्सर, वैफल्यग्रस्तता इ. घेऊन त्यावर लक्ष केंद्रीत करून ती घालविण्याचा तसेच तिच्या जागी एखादी सकारात्मक भावना, उदा. प्रेम, आशा, कणव इ. स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.
३. अ‍ॅक्युपंक्चर- याविषयी पूर्वी एका लेखात सविस्तर माहित दिली आहेच.
४. कोलाईम्नि (Koloimni)- यात शरीराच्या विद्युतचुंबकीय क्षेत्रावर, स्पर्श न करता काम केले जाते. शरीराच्या बाहेर अर्धा ते एक इंचावर या पद्धतीत छोटे छोटे धक्के 'strokes' दिले जातात. या पद्धतीला ‘इथेरीक मसाज’ (Etheric Massage) असेही म्हणतात.
५. ‘शारीरसंवाद’ पद्धत (Body Talk Therapy)- आपल्या शरीराजवळ स्वत:ला बरे करण्याचे शहाणपण व सामथ्र्य आहे. या मूलभूत तत्त्वावर ही पद्धत आधारित आहे. चेतास्नायू आधारित जैवप्रतिज्ञापन तंत्राप्रमाणे हे तंत्र वापरले जाते. यात उपचारक शरीरातील बिघडलेली उर्जाचक्रे (Energy Circuits) शोधतो व त्यावर उपचार करतो.
६. प्राणिक हिलिंग (Pranic Heling)- यात उपचारक प्रथम रुग्णाची आभा किंवा उर्जाक्षेत्र तपासतो, त्यात कोठे अडथळा आहे ते जाणून घेतो व नंतर आपल्या हाताच्या तळव्यातील उर्जाचक्राच्या माध्यमातून, जीवनउर्जा, रुग्णामधील बिघडलेल्या भागात संक्रमित करतो; या प्रकारे तेथे साफसफाई होऊन तो भाग पुन्हा चैतन्यमय होतो, असे हे शास्त्र मानते.
७. मॅट्रिक्स एनर्जेटिक्स (Matrix Energetics)- यात स्पर्शाने प्रथम समस्याप्रधान भाग शोधला जातो व नंतर स्पर्श आणि बरे करण्याचा उद्देश एकत्रित करून हे परिवर्तनीय उपचार 'Transformational Healing' केले जातात.
८. टाँग रेन थेरपी (Tong Ren Therapy)- ही एक दूरस्थ उपचारपद्धती असून यात रुग्ण निर्देशक अशी एक ‘अ‍ॅक्युपंक्चर डॉल’ असते व उपचारक तिच्यावर लक्ष केंद्रित करून रुग्णोपचार करतो.
९. अमाडय़ूस (Ama Deus)- स्पर्श तसेच विनास्पर्श अशा विविध तंत्रांचा अवलंब करून यात द्विस्तरीय पद्धतीने उपचार केले जातात. अध्यात्मिक उन्नतीकरिता व ‘भान’ आणण्याकरिता प्रामुख्याने या उपचारपद्धतीचा वापर केला जातो.
१०. ह्यूना (HUNA)- हवाई भाषेत याचा अर्थ ‘रहस्य’ असा होतो. आपल्या शरीरात स्वत:ला बरे करणारे असे एक उच्चस्तरीय वैश्विक शहाणपण आहे. या मूलभत तत्त्वावर ही पद्धत आधारित असून, मानसिक शक्तींच्या साहाय्याने या पद्धतीत ‘शरीरांतर्गत शहाणपणाशी’ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो.
११. क्वांटम टच् (Quantum Touch)- यात स्पर्श, श्वसन नियंत्रण तसेच ‘शारीरभान आणणारे ध्यान’ या तिन्ही गोष्टींचा वापर केला जातो. याला ibrational Touch Therapy  असेही संबोधण्यात येते.
१२. चिऑस एनर्जी हिलिंग (Chios Energy Healing)- स्टीव्ह बॅरेटने लोकप्रिय केलेल्या या पद्धतीत उर्जा चक्रांची ताकद वाढविणे, त्यांचे संतुलन साधणे, सातस्तरांवर उपचार इ. गोष्टींचा अंतर्भाव होतो.
१३. जोहरी हिलिंग (Johrei Healing)- हे एक जपानी तंत्र असून यात नकारात्मक स्थिती घालविण्याचा प्रयत्न केला जातो.
१४. लाँजेविटॉलॉजी (Longevitology)- चीनी फिजिशियन लोन झिआँग व अन्य काही जणांनी हे तंत्र विकसित केले असून यात उर्जाचक्रांचे संतुलन साधण्यावर भर दिला जातो.
या सर्व उपचारपद्धतींना आधुनिक वा पारंपरिक वैद्यकाची मान्यता मिळावयास आणखी काही वर्षे तरी जातील, असे आजच्या स्थितीवरून वाटते.

reiki healing
what is reiki healing used for
what is reiki and how does it work
reiki healing near me
how to do reiki
what is reiki good for
reiki benefits
reiki emotional healing

reiki healing symbols
August 19, 2017

Hypnotherapy

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये मायामि येथे राहणारे, प्रख्यात खेल विश्वविद्यालय वैद्यकीय शिक्षण घेतलेले, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ब्रायन वेस यांचे त्यांच्या कॅथरीन नावाच्या रुग्ण स्त्रीवर आधारित `Many Lives many masters'  नावाचे पुस्तक सन १९९८ मध्ये प्रकाशित झाले आणि त्याने अमेरिकेतच नव्हे तर जगभर खळबळ उडवून दिली. या महिलेवर तिच्या भीती, नाहक चिंता इ. लक्षणांवर डॉक्टर, संमोहनाच्या माध्यमातून उपचार करीत होते. ते करीत असताना, तिचे प्रतिगमन (Regression) होऊन ती तिच्या अगदी लहानपणीच्या व त्याहीपुढे जाऊन, पूर्वजन्मीच्या (व केवळ एकाच नव्हे तर अनेक!) आठवणी सांगू लागली व त्यातच तिच्या या जन्मातील मानसिक लक्षणांची बीजे होती व त्यावर उपचार करताच, ही लक्षणे दूर झाली असा दावा डॉक्टरांनी केला. त्यानंतर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजतागायत त्यांनी सुमारे ४००० रुग्णांचे या पद्धतीने विश्लेषण करून त्यावर उपचार केले आहेत. या विषयावर डॉक्टरांनी आतापर्यंत सात पुस्तके लिहिली असून, अमेरिकेतील अनेक सुप्रसिद्ध टेलिव्हिजन शोजमध्ये उदा. ऑपराह, लॅरिकिंग लाइव्ह, २०/२० इ. डॉक्टरांच्या असंख्य मुलाखती झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर सुप्रसिद्ध कोलंबियन गायक, शाकिरा हिने आपल्या  `No Creo'   या गाण्यात चक्क त्यांचा उल्लेखही केला आहे. अर्थात डॉक्टरांचे हे स्पष्टीकरण सगळ्यांच्याच पचनी पडले आहे, असे नव्हे. वैद्यकीय क्षेत्रात तर त्याला नकारघंटाच अधिक आहे. कै. डॉ. इयान स्टिव्हनसन यांच्या मते तर संशोधनामुळे प्रतिगमन होऊन, अशा तऱ्हेने (तथाकथित) पूर्वजन्मातील आपली विविध व्यक्तिमत्त्वे दिसणे आणि स्वप्नस्थितिंतील विविध कल्पनाचित्रे यात काहीच फरक नाही व म्हणून त्याला फारसे महत्त्व नाही. एकंदरीत या पुस्तकाच्या निमित्ताने ‘संमोहन’ हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एवढे निश्चित!
इतिहास - डॉ. जेम्स ब्रैद या स्कॉटिश शल्यविशारदाने १८४२ मध्ये प्रथम संमोहनाची कल्पना जगासमोर मांडली व Hypnosis  हा शब्द रूढ केला. सन १८४३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या  `Neurypnology' नावाच्या पुस्तकात त्याने संमोहनाचे वर्णन, शारीरिक शिथिलतेच्या पाश्र्वभूमीवर मानसिक अतिएकाग्रता असे केले व संमोहन ही एक प्रकारची चेतानिद्रा आहे असे म्हटले. यात संमोहित व्यक्ती ही शारीरिकदृष्टय़ा पूर्ण शिथिल असते; पण निद्रिस्त नसते आणि जरी सर्वसाधारण व्यवधान कमी झाले असले (‘म्हणजे चेतानिद्रा’) तरी एखाद्या विशिष्ट कल्पनेवर मन अतिकेंद्रित असते व त्या कल्पनेशी निगडित सूचनाबरहुकूम  (Suqqestion)शरीर हालचाली करू शकते. या अवस्थेतील विद्युत मस्तिष्कालेख (E. E. G.  अथवा इलेक्ट्रोएन्केफॅलोग्राम) हा निद्रिस्तावस्थेतील मस्तिष्कालेखापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो हे येथे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे! यामुळेच पुढे डॉ. ब्रैद यांनी १८५५ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या `The phusiology of Fascination' या पुस्तकात आपलाच चेतानिद्रेचा सिद्धान्त खोडून हिप्नॉसिस म्हणजे शारीरिक शिथिलीकरणाच्या पाश्र्वभूमीवर एक कल्पनावाद (Monoideism) असा सिद्धांत मांडला व आज या क्षेत्रात बहुतांशी तीच कल्पना ग्राह्य धरली जाते.
डॉ. जेम्स ब्रैद यांनी आपला हा सिद्धांत काहीसा जर्मन ऑस्ट्रियन डॉक्टर ‘फ्रँझ अ‍ॅन्टन मेस्मेर’ यांच्या सिद्धांतांवर आधारित असल्याचे म्हटले होते.  प्रत्येकाच्या शरीरात चुंबकीय ऊर्जा असल्याचा व ती शरीरात हजारो चॅनेल्समधून (अ‍ॅक्युपंक्चरमधील मेरिडियन्स? योगशास्त्रातील नाडय़ा?) वाहत असल्याचा व तिचा प्रवाह खंडित झाल्यास रोगनिर्मिती होत असल्याचा व तो प्रवाह पूर्ववत केल्यास रोगनिवारण होत असल्याचा दावा केला. त्याकरिता त्याने ‘जैव चुंबकीय क्षेत्र’ (Animal Maynetism) या संज्ञेचा वापर केला  सुरुवातीस हे बिघडलेले चुंबकीय प्रवाह सुरळीत करण्याकरिता चुंबकांचाही वापर केला पण पुढे त्याने चुंबक टाळले व उपचारकाच्या Animal Magnetism चा वापर करून तो रुग्णोपचार करू लागला. त्याकरिता तो रुग्णांना विशिष्ट पद्धतीने हस्तस्पर्श करणे व त्यांच्या डोळ्यात खोलवर बघून, हातांच्या काही विशिष्ट हालचालींनी  (Mesmereism) त्यांच्या शरीरातील द्रव्याचा (Fluid) प्रवाह नीट करणे अशा पद्धतींचा अवलंब करू लागला. पुढे त्याच्या एका पट्टशिष्याची ‘चार्लस् डी एस्लॉन’ची या संदर्भात पॅरिसमध्ये राजा सोळावा लुईसने आपले अधिकारी व रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे काही शास्त्रज्ञ (यात सुप्रसिद्ध बेंजामीन फ्रँकलीनचाही समावेश होता!) यांच्या मदतीने चौकशी केली. त्यांचा निष्कर्ष होता - असे काही वेगळे चुंबकीय द्रव्य (Fluid) शरीरात नाही व रुग्णांना होणारा फायदा हा केवळ  त्यांच्या स्वत:च्या स्वयंसूचनांमुळे (Autosvqqestion and Imagination!) होत आहे! याच स्वयंसूचनासिद्धांतावर आधारित डॉ. ब्रैद यांनी संमोहनशास्त्र विकसित केले. पुढे डॉ. सिग्मंड फ्राईडसारख्या थोरामोठय़ांनीही रुग्णोपचारांमध्ये व मानसोपचार पद्धतींमध्ये संमोहनाचा वापर केल्याचे दिसते.
शास्त्रीय बैठक : संमोहनाचा नेमका परिणाम कसा साधला जातो याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता दिसून येते. काहींच्या मते सूचनांचा (स्वयंसूचना अथवा उपचारक देत असलेल्या) परिणाम हा जागृत मेंदूवर (किंवा मनावर) होऊन तो निर्माण करीत असलेल्या काही विशिष्ट चेतारसायनांमार्फत (एन्केफॅलिन्स व एन्डॉर्फिन्स) शरीराचे शिथिलीकरण व मेंदूची एकाग्रता साधली जाते व त्या माध्यमातून शेवटी भावना, विचार, संवेदना, स्वभाव इ.वर परिणाम (सूचनेनुसार सकारात्मक वा नकारात्मक) साधला जातो. तर काहींच्या मते या सूचनांचे वहन अर्धतामृत किंवा अबोध मनापर्यंत होऊन त्यामार्फत शेवटी दृष्य परिणाम साधला जातो. अर्थात आजच्या घटकेला तरी अर्धजागृत मन/मेंदू इ. बोध मन इ. गोष्टी आधुनिक वैद्यकाला पूर्णपणे माहीत आहेत, असे म्हणता येणार नाही. काहींच्या मते तर हिप्नॉसिसने साधला जाणारा परिणाम हा ‘प्लासिबो’ परिणामाच्या जवळ जाणारा आहे. आयर्विग कर्शने तर संमोहनाची व्याख्याच `Nondeceptive Mega Placebo' अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन (APA) च्या डिव्हिजन ३० ने म्हणजे ‘सोसायटी फॉर सायकॉलॉजिकल हिप्लॉसिस’ने, संमोहनाची नेमकी व्याख्या केली व ती म्हणजे सूचनांच्या माध्यमातून, बोध, संवेदना, भावना, विचार व स्वभाव यात होणारे बदल!
संमोहन तंत्र - स्टेजवर एखाद्या व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना सूचना देऊन त्यांच्याकडून अतक्र्य व अफाट क्रिया करवून घेणे आणि सूचना देऊन व्यक्तीला उपचार करणे यात वेगवेगळे संमोहन तंत्र वापरले जाते; परंतु सर्वसाधारणपणे प्रथम योग्य ती वातावरणनिर्मिती करून, ‘संमोहनशील’ व्यक्तीला निर्देशित करणाऱ्या सूचना दिल्या जातात व नंतर ती व्यक्ती तंद्रीत गेली (ही तंद्री गाढ किंवा हलकी असू शकते) की पुढील विशिष्ट सूचना देऊन, संमोहन साधले जाते. वातावरणनिर्मितीकरिता शांत वातानुकूलित खोली, सुगंध, मंद संगीत, विशिष्ट प्रकाशयोजना, विशिष्ट चिन्ह इ.चाही वापर केला जातो. न्यूयॉर्कस्थित मानसोपचार व संमोहनचारतज्ज्ञ डॉ. हर्बर्ट स्पिजेल यांनी कोण संमोहनशील असते व कोण नाही. हे ठरविण्याकरिता काही मोजमाप शोधले आहे व यानुसार ० ते ५ या मोजमापात सर्व व्यक्तींचे पृथ:करण केले आहे. उदा. ० ते १ अपोलोनियन्स : हे फार तार्किक, कठीण असून, संमोहनात अयोग्य., २ते ३ : ओडिसिअन्स : थोडेफार  लवचिक व काही प्रमाणात संवेदनशील, ४ ते ५ : डायोनिसिअन्स : अतिसंमोहनशील, वर उल्लेखिल्याप्रमाणे संमोहन सर्वसाधारणपणे दोन टप्प्यात साधले जाते. इ. शिथिलीकरण व सूचना
शिथिलीकरण : सर्वसाधारणपणे याकरिता मानवी कल्पनाशक्तीचा आधार घेतला जातो. उदा. डोळे मिटून आपण एखाद्या शांत व विस्तीर्ण जलाशयाच्या बाजूस बसलो आहोत, अशी कल्पना केल्यास आपण हळूहळू शिथिल होत जातो. काही वेळा यात हेवी आम्र्स किंवा सिमाफोर तंत्र यांचाही वापर केला जातो.
सूचना : शिथिलीकरणानंतर, तंद्री साधली जाऊन काही विशिष्ट सूचना (उपचारकामार्फत किंवा स्वयंसूचना) दिल्या जातात. संमोहनशास्त्रानुसार बहुसंख्य रोजांची निर्मिती मनात होते व संमोहनाने मनाच्या ‘बरे करण्याच्या शक्ती’ जागृत झाल्या, की रोगनिवारण होते. याव्यतिरिक्त काही वेळा सुरुवातीस उल्लेखिल्याप्रमाणे निर्गमन  (Age Regression), Hupnogealing, Parts Therapy इ. तंत्रांचाही वापर केला जातो. 
संमोहनोपचार कोठे उपयुक्त? - गेल्या जवळजवळ दीड-पावणेदोन शतकात संमोहनपचारांनी बरेच बरेवाईट दिवस पाहिले. ‘काळ्या जादू’पासून ते ‘सर्व रोगांवर उपयुक्त’ असे अनेक शिक्के त्यावर बसले; पण आजच्या घटकेला हे नेमके कोठे उपयुक्त आहेत, असे पाहिल्यात, काही विशिष्ट व्याधींवर पूरक उपचार म्हणून त्यांचा चांगला उपयोग होतो, असे दिसून येते. यापैकी काही व्याधीविकार पुढीलप्रमाणे - १) कर्करोग अथवा संधिवात इ. व्याधींमुळे होणाऱ्या अस'ा वेदना कमी करण्याकरिता. २) शस्त्रक्रियेदरम्यान वापरावयाच्या भूलकारक औषधांचा त्रास होऊ नये म्हणून तसेच नंतरच्या वेदना कमी करण्याकरिता. ३) लठ्ठपणा- वजन कमी करण्याकरिता. ४) काही त्वचाविकार- सोरायसिस, अटोपिक त्वचा दाह, मस इ. ५) मानसोपचारांचा एक भाग. ६) सवयीचे दुष्परिणाम- धूम्रपान, दात खाणे इ. ७) शिथिलीकरणाकरिता- ताणतणावांवर उपाय. ८) क्रीडानैपुण्य वाढविण्याकरिता. ९) गर्भारपणातील मळमळ कमी करण्याकरिता १०) दीर्घकालिक आंत्रदाह ११) संमोहित प्रसूतीकरिता. १२) मुलांमधील अंथरूण ओले करण्याची प्रवृत्ती. १३) दमा. १४. काही प्रकारच्या अ‍ॅलर्जी. 
उपसंहार : संमोहनशास्त्रावर अजून बरेच संशोधन बाकी आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. तोपर्यंत काही गोष्टी ध्यानात घ्याव्या-
१) संमोहनोपचार नेहमी तज्ज्ञ व्यक्तींकडूनच घ्यावेत. २) मनाने दुर्बल माणसेच संमोहित होतात ही चुकीची समजूत असून आपण अधिक सृजनशील  बुद्धिमान असाल तर अधिक ‘संमोहनशील’ असाल. ३) संमोहन म्हणजे चेतानिद्रा नव्हे तर शारीरिक  ‘शिथिलीकरण+तीव्र मानसिक एकाग्रता’ होय. ४) संमोहित व्यक्ती संमोहनकाराच्या पूर्ण अमलबजावणी असे ही समजूत चुकीची होय. ५) हृदयस्पंदन गती, रक्तदाब, अशी सर्वसामान्यपणे ऐच्छिक नियंत्रणाखाली नसलेली शरीरकार्ये, संमोहनामुळे तात्पुरती बदलू शकतात व उपचारांमध्ये ते फायदेशीर ठरू शकते. ६) प्रभावी स्वयंसूचना तंत्र शिकता येते व वाइट सवयी घालविण्याकरिता वेदनाशमनाकरिता, नाहक चिंता, भीती दूर करण्याकरिता त्याचा उपयोग होऊ शकतो. ७) संमोहनोपचार म्हणजे जादूटोणा नव्हे तर मनावर आधारित असे एक उपचारतंत्र आहे, त्यावर सातत्याने संशोधन चालू आहे.

hypnotherapy
hypnotherapist meaning
how does hypnotherapy work
hypnotherapy benefits
hypnotherapy reviews
hypnotherapy techniques
is hypnotherapy real
hypnotherapy training

hypnotherapy anxiety
hypnotherapist meaning
hypnotherapy meaning in hindi
what is hypnotherapy and how does it work
benefits of hypnotherapy
hypnotherapy techniques
hypnotherapist salary
hypnotherapy reviews
is hypnotherapy real

hypnotherapy near me
August 19, 2017

Breathing therapy

‘दमा’ हा श्वसनाचा विकार आहे हे आपणास सहजगत्या उमगते; पण सतत दमल्यासारखे वाटते हे ‘चुकीच्या श्वसनामुळे’ असू शकेल हे आपल्या लक्षात येणे जरा कठीण आहे. ‘स्पाँडिलायटीस’ किंवा ‘स्लिप डिस्क’मुळे मान, पाठ दुखते हे आपणास माहीत असते; पण श्वासाचा आकृतीबंध बिघडल्यामुळेही असे होऊ शकते, असे कोणी आपणास सांगितले तर ते खरे वाटणार नाही. मनोविकृतींमुळे नैराश्य व नाहक चिंता निर्माण होतात हे आपण वाचलेले असते; पण श्वसनतंत्र बिघडल्यानेही ते निर्माण होऊ शकतात हे आपल्या गावीही नसते; पण अनेक व्याधी विकार हे चुकीच्या श्वसनामुळे निर्माण होतात, असे ध्यानात येऊ लागले आहे व म्हणूनच ‘श्वासोपचार’ हे नवीन तंत्र झपाटय़ाने विकसित होऊ लागले आहे.

इतिहास : वास्तविक पाहता ‘श्वासा’चे अनन्यसाधारण महत्त्व भारतीय दर्शनांनी विशेषत: योगाने फार पूर्वीच जाणले होते, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. किंबहुना श्वास व त्याचे नियंत्रण (प्राणायाम) हा शरीर व मन यांना जोडणारा ‘सेतू’ आहे अशीच पूर्वसुरींची धारणा होती व म्हणून ‘श्वसनशुद्धी’ला अनन्यसाधारण महत्त्व होते. शरीराच्या विविध क्रियांपैकी काहींवर आपले ‘ऐच्छिक’ नियंत्रण असते तर काही आपोआप घडतात. (Reflex, Involuntary of Autonomous!!) हात हलवून चहाचा कप उचलणे ऐच्छिक (Voluntary) तर हृदयस्पंदने आपोआप (Involuntary)  पण ‘श्वास’ ही सर्वसाधारणपणे एकच अशी क्रिया आहे, की जी एकाच वेळी ऐच्छिक नियंत्रणाखाली असू शकते (जसे आपण जलद श्वसन करू शकतो वा इच्छेप्रमाणे संथ, दीर्घ श्वसन करू शकतो.) वा जो पूर्णपणे प्रतिक्षित असू शकते (जसे आपण घाबरल्यास श्वसन आपोआप जलद होते व ध्यानास बसल्यास श्वसन आपोआप संथ व खोल होते.) श्वसनाच्या या खासियतेमुळेच योगशास्त्र, जे एक सवरेत्कृष्ट ‘शरीर-मनोवैद्यक’ 'Body mind Medicine' आहे ते प्राणायामाच्या माध्यमातून उत्कृष्ट श्वसनोपचार साधते व मनावर नियंत्रण आणू पाहते. अन्य प्रतिक्षिप्त क्रिया या पूर्णत: आपल्या ऐच्छिक नियंत्रणाच्या बाहेर असतात; पण श्वसन हीच एक क्रिया इच्छावर्ती व अनिच्छावर्ती अशा दोन्ही मज्जासंस्थांच्या नियंत्रणाखाली असते व म्हणून त्या माध्यमातून संपूर्ण ‘मेंदूवर नियंत्रण आणण्याचा मानवाने प्रयत्न केला आहे. योगी हृदयगती कमी-जास्त करू शकतात वा ‘भूक’ ताब्यात ठेवू शकतात त्याचे हेच रहस्य आहे. मन आणि शरीर, तसेच श्वास-शरीर आणि मन यांचा हा संबंध जसजसा दृगोच्चर होऊ लागला आहे तसतसे चुकीच्या श्वसनाचे विविध दुष्परिणाम स्पष्ट होऊ लागले आहेत व म्हणूनच या विषयातले तज्ज्ञ आज आपणास श्वसनप्रक्रिया (विशेष करून उच्छ्वास) परत शिकण्यास सांगतात.
शास्त्रीय बैठक : अगदी छोटय़ा बाळांमध्ये आपल्याला उरोश्वसन (Chest berathing) आणि उदरश्वसन (Abdominal berathing) अशा दोन्ही क्रिया सहजपणे व तालबद्धरीत्या चाललेल्या दिसतात; पण आपण हळूहळू या दोहोंतील ताल विसरत जातो, तसेच प्रामुख्याने उरोश्वसन व तेही उध्र्व उरोश्वसन (Upperchest Brcathina) करीत राहतो साहजिकच श्वसनाच्या ‘उथळ’ पातळीवरच राहतो व या अशा दीर्घकालीक चुकीच्या श्वसनामुळे अनेक बिघाडांना उदा. सततची दमणूक, डोकेदुखी- मानदुखी- पाठदुखी, ताणतणाव, नाहक चिंताग्रस्तता इ. इ. जन्म देतो, असे या विषयातले तज्ज्ञ सांगतात. ताण वाढला, की माणूस अधिकाधिक उरोश्वसन करतो, असेही आढळून आले आहे. या सर्व गोष्टींमुळे शरीरातील कार्बनडाय ऑक्साइड वायू हा अधिक प्रमाणात बाहेर फेकला जातो, त्याचे रक्तातील प्रमाण कमी झाल्याने रक्त अधिक अल्कलाइन होते. रक्ताची आम्लता कमी झाल्याने Bohr effect मुळे हिमोग्लोबीनपासून ऑक्सिजन सुटून पेशींना उपलब्ध होण्याच्या क्रियेत अडथळा होतो, तसेच रक्तवाहिन्या आकुंचित होऊन, विविध अवयवांना व पेशींना होणारा रक्तपुरवठाही कमी होतो. याचा अधिक परिणाम ऑक्सिजन व ग्लुकोज वर अतिरिक्त प्रमाणात अवलंबून असणाऱ्या मेंदूवर होतो व त्याचे कार्य बिघडते. या सर्व दुष्परिणामांना `Brain Fog' असे संबोधण्यात येते. या धुक्याने ग्रस्त मेंदूमुळे आपली संवेदनशीलता कमी होते; ‘मूड’ सतत बिघडत राहतो व परिघ मज्जासंस्था (Peripheral Nervous system)  अतिसंवेदनशील होऊन सतत मुंग्या येणे, दुखणे अशा तक्रारी निर्माण होतात; स्नायू लवकर दमतात, पोटाच्या स्नायूंवर परिणाम झाल्याने वारंवार शौचाची भावना होते. (Irritable Bowel syndrome) एखाद्या विशिष्ट अन्नघटकाची अ‍ॅलर्जी वाढीस लागते व श्वसनाच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण आल्याने मान, खांदे व वरची पाठ दुखू लागते, असे या विषयातले तज्ज्ञ सांगतात. काही वेळा या 'Brain Fog' चे पर्यवसन घबराटीत (Panic attacks) किंवा फोबियातही होताना दिसते. हे सर्व टाळावयाचे असेल तर आपल्या श्वसनाच्या गुणवत्तेत बदल घडवून आणावयास हवा, असे हे तज्ज्ञ सांगतात. चुकीच्या श्वसनामुळे निर्माण होणाऱ्या या सर्व शरीरमनाच्या बिघाडांना श्वसन अकृतीबंधातील बिघाड Breathing Pattern Disorders (B.P.D.) असे संबोधण्यात येतो.
नेमके काय करावयास हवे? 
श्वसन सुधारण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे ‘प्राणायाम’ तंत्र शिकणे. (अर्थात योग्य श्वसन हा प्राणायामाचा फक्त एक आयाम आहे हे येथे प्रकर्षांने ध्यानात घ्यावे.) या व्यतिरिक्त शरीरातील विविध भागांचे, अवयवांचे शिथिलीकरण करून, श्वासावर लक्ष केंद्रित करून, श्वसन सुधारण्याची अनेकविध तंत्रे आज उपलब्ध आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व आपापल्या प्रकृतीनुसार व आवडीनुसार आपण यांचा अवलंब करू शकतो.
* प्राणायाम : प्राणायाम म्हणजे काही मर्यादित अर्थाने, नियंत्रित श्वासोच्छ्वास! जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया बदलणे म्हणजे प्राणायाम. योगाच्या भाषेत श्वास आत घेण्याच्या क्रियेला पूरक, उच्छ्वासाच्या क्रियेला रेचक तर दोहोंच्या मध्ये खास थांबविण्याच्या प्रक्रियेला कुंभक म्हणतात. या पूरक रेचकाच्या तालावर नियंत्रण आणून, आपण श्वासोच्छ्वास ज्या नाकपुडय़ांतून करतो त्यांच्या बदलावर नियंत्रण आणून (उजवी, डावी किंवा दोन्ही नाकपुडय़ा) प्राणायाम साधता येतो. थोडक्यात अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आपण प्राणायामाच्या रुपाने श्वसन प्रशिक्षण घेऊन श्वसन सुधारू शकतो. अर्थात या संज्ञा येथे श्वासोच्छ्वासाच्या भाषेत समजाविल्या असल्या तरी सूक्ष्म अर्थाने त्यांचा अंतिम संबंध प्राणशक्तीशी म्हणजे चैतन्य शक्तीशी व प्राणमय कोशाशी आहे हे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे.)
* श्वसन प्रशिक्षण : चुकीची श्वसन पद्धती आपल्या इतकी अंगवळणी पडलेली असते, की ती विसरून योग्य पद्धत शिकण्यासही कित्येक वेळा सहा-सहा महिने लागू शकतात. यात मुख्य भर हा पूर्ण उच्छ्वासावर असतो, तसेच श्वसनाचे मुख्य तसेच पूरक स्नायू शिथिलीकरणावर व ‘श्वसनभान’ आणण्यावरही भर दिला जातो. अशीच एक साधी-सोपी पद्धत वर चौकटीत दिली आहे
‘साँसों की जरूरत है जिंदगी के लिये..’ असे एका गाजलेल्या हिंदी गाण्यात म्हटले आहे ते किती खरं आहे व त्या दृष्टीने श्वासोपचारांचे महत्त्व एव्हाना वाचकांच्या ध्यानात आले असेलच.

श्वसन व्यायाम
* हात असलेल्या एखाद्या खुर्चीवर आरामात बसा. आपले हात खुर्चीच्या हातांवर सहजपणे विसावू द्या.
* कोपराने बाहूंवर हलकासा दाब द्या, यामुळे श्वासोच्छ्वास करताना मानेचे वा खांद्याचे स्नायू तुम्ही साहजिकच वापरू शकणार नाही.
* नेहमीप्रमाणे श्वास घेतल्यावर ओठ अलगद विलग करा आणि हळुवारपणे तोंडाने उच्छ्वास करा.
* ओठ परत बंद करा, क्षणभर थांबा आणि सावकाश श्वास आत घ्या.
* उच्छ्वास पूर्ण व दीर्घ झाला, की श्वास आपोआपच खोल व पूर्ण घेतला जातो.
* उच्छ्वास, श्वासापेक्षा दीर्घ असणे आवश्यक (व योग्यही!) असते.
* हे सकाळ/संध्याकाळ वीस-वीस वेळा करा.
* सुरुवातीस योग्य मार्गदर्शनाखाली व अगदी घडय़ाळ लावून हा श्वसन अभ्यास करावा. हळूहळू ते सहज साधले जाईल.

breathing therapy
somatic breath therapy
breath therapy training
breathing therapy for anxiety
breathing therapy for asthma
breathing therapy for copd
breathing therapy machine
somatic breathing

breathing therapy for pneumonia
August 19, 2017

How to become an osteopath

विविध व्याधी विकारांवर उपलब्ध असलेल्या उपचारपद्धतींकडे एक धावती नजर टाकली तरी त्यांचे अधिष्ठान फार पूर्वीच्या काळी फक्त ‘देह’ हेच होते उदा. मसाज, सांधे व मऊ उती यांच्या मसाजावर अधिष्ठित चिनी उपचारपद्धत टय़ुइना (Tuina) इ. व आता त्या अधिकाधिक ‘मना’धिष्ठित होत चालल्या आहेत. उदा. डॉ. बारव पुष्पोपचार पद्धती इ. हे सहज लक्षात येते. वास्तविक अस्तित्वाचे दोन्ही आयाम ‘मन’ व ‘देह’ हे महत्त्वाचे आहेत, परस्परावलंबी आहेत व कोणत्याही व्याधी विकारात दोघांवर उपचार महत्त्वाचे असतात हे विसरून चालणार नाही. दीर्घकालिक हृदयविकाराने वा किडनीच्या विकाराने ग्रस्त व्यक्ती हताश होतात, निराश होतात व त्यांना मानसोपचारांची गरज लागते तर नैराश्यग्रस्त मनोरुग्णांना मसाज, व्यायाम इ.ची जोड दिल्यास त्यांची स्थिती सुधारते. आज ‘मनो’धिष्ठित उपचारपद्धती अधिक लोकप्रिय होत चालल्या असल्या तरी ‘देहा’वर उपचार विसरून चालणार नाही. सॉफ्टवेअर तर उत्तम हवेच; पण त्याच्या आविष्कृतीकरिता ‘हार्डवेअर’ ही तितकेच महत्त्वाचे व त्याचे आरोग्य सांभाळणे व बिघडल्यास ते दुरुस्त करणे हेही अति आवश्यक! जगभर व विशेष करून युरोप-अमेरिकेत लोकप्रिय असलेली एक हार्डवेअर थेरपी म्हणजे ‘ऑस्टिओपथी!’ एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकन फिजिशिअन्सपैकी सुमारे ५.५ टक्के फिजिशिअन्स हे ऑस्टिओपथिक फिजिशिअन आहेत हे लक्षात घेतले तर ऑस्टिओपथीची लोकप्रियता ध्यानात येण्यास वेळ लागणार नाही. काय आहे ही ऑस्टिओपथी?
इतिहास : डॉ. अ‍ॅन्ड्रय़ू टेलर स्टील (Dr. Andrew Still’’) 
हा कान्सास प्रांतातील बाल्ड्विन शहराजवळ राहणारा ‘अमेरिकन सिव्हिल वॉर’मधील एक नेता. हाा ऑस्टिओपथीचा जनक. त्याने १० मे १८९२ रोजी मिसुरी प्रांतातील ‘कर्कस्व्हिले’ येथे अमेरिकन स्कूल ऑफ ऑस्टिओपथीची स्थापना केली. आज त्याच स्कूलची मोठी A. T. still University  झाली आहे. ऑस्टिओपथीच्या शास्त्रशुद्ध शिक्षणाचा इतका व्यापक पाया व अभ्यासक्रम डॉ. टेलर यांनी तयार केला, की मिसुरी राज्याने त्यांच्या ऑस्टिओपथी स्कूलला, स्नातकांना इतर डॉक्टरांप्रमाणे ‘एम. डी.’ डिग्री देण्याचीही अनुमती दिली; पण आपले वैशिष्टय़ जपण्याकरिता डॉ. टेलरने ती नाकारून ‘डी. ओ.’ (डॉक्टर ऑफ ऑस्टिओपथी) अशी डिग्री देणे चालू केले. आज अमेरिकेत अन्य डॉक्टरांप्रमाणे औषधे वा आवश्यक तेव्हा शल्यक्रिया वापरणारे असे ‘ऑस्टिओपथी फिजिशिअन’ हे वेगळे असून ‘नॉनफिजिशिअन ऑस्टिओपाथ’ जे केवळ Osteopathic Manipulative Treatment (OMT)  देतात असे वेगळे आहेत, त्यांचे अभ्यासक्रम वेगळे आहेत व विविध अमेरिकन राज्यात त्यांच्याकरिता वेगवेगळे वैद्यकीय कायदेकानू लागू आहेत. युरोप व कॉमनवेल्थ देशांत हे दुसऱ्या प्रकारचे उपचारक   अधिक लोकप्रिय असून, त्यांची उपचारपद्धती ही कायद्याच्या दृष्टीने ‘पर्यायी’ उपचारपद्धती म्हणून गणली जाते, असे उपचारक स्वत:ला चेता-स्नायू- अस्थि विशेषज्ञ  M. N. M. S. Specialis  म्हणवून घेताना आढळतात.
‘स्नायू अस्थि व सांधे ‘यांचा सांगाडा व त्याचे आरोग्य राखणे हे ऑस्टिओपथीच्या तत्त्वानुसार अतिमहत्त्वाचे असते. त्यातील बिघाड हा चेतासंस्थेच्या ऊर्जेत व पर्यायाने सर्व शरीराच्या ऊर्जेत बिघाड घडवून आणतो व रोगनिर्मिती होते, असे हे शास्त्र मानते. या सांगाडय़ाच्या आरोग्यावर आतील अवयवांचेही आरोग्य अवलंबून असते व हीच मध्यवर्ती कल्पना मानून सन १९४० च्या दरम्यान एच. व्ही. हुवर व एम. डी. यंग या दोन ऑस्टिओपायनी ? व्हिसेरल ? ऑस्टिओपथी  (Visceral osteopathy)  म्हणजे अवयवाधिष्ठित ऑस्टिओपथी अशी नवीन शाखा निर्माण केली.
कवटीची हाडे व मणके यांच्या संरक्षणात मेंदू व मज्जारज्जू कालक्रमणा करतात. त्यांच्या (मेंदू व मज्जारज्जू) भोवती  Meninges  चे संरक्षक आवरण असते तर मस्तिष्कद्रवात (Cercbrospinalflnid) ते एक प्रकारे डुंबत असतात. या रचनेत काही बदल झाल्यास, मस्तिष्कद्रवाच्या प्रवाहात अडथळे आल्यास, या संपूर्ण रचनेच्या आतील दाबात काही फरक पडल्यास त्यामुळे चेतासंस्थेच्या (व पर्यायाने संपूर्ण शरीराच्या) कार्यात बिघाड होतो, हा बदल डोक्यावरून हात फिरवून वा पाठीच्या मणक्यांवरून हात फिरवून तज्ज्ञाला जाणवू शकतो व योग्य त्या ठिकाणी दाब देऊन तो हा बदल नाहिसा करून ही संपूर्ण रचना पूर्वस्थितीत आणू शकतो या गृहीत तत्त्वावर डॉ. विल्यम सुदरलँड (Dr. william Sutherland) याने  Cranial Ostcopathy ही एक नवीन शाखा अस्तित्वात आणली. मुख्यत्वे खालच्या मणक्यांवर आधारित अशी  Craniosaoral Theropy  सुद्धा अस्तित्वात आहे. अर्थात व्हिसेरल, क्रॅनिअल वा क्रॅनिओर्सेक्रल या सर्व पद्धतींबाबत क्लासिकल ऑस्टिओपाय वा अन्य डॉक्टरांच्या मनात अजूनही प्रचंड शंका आहेत.
ऑस्टिओपथीचा परिणाम नेमका कसा होतो?
अस्थि, स्नायू, सांधे- जोड उती’ यांचा प्रचंड सांगाडा हा चेतासंस्था वा शरीरांतर्गत अन्य अवयव संस्था यांच्या संरक्षणाकरिता, परस्परसंपर्काकरिता व बाह्यजगातील हालचालींकरिता आवश्यक आहे हे सहज मान्य होण्यासारखे आहे; पण जवळजवळ सर्वच व्याधी विकारांचे उगमस्थान या सांगाडय़ातच असते व तो ठीकठाक केल्यास संपूर्ण आरोग्यप्राप्ती होते व आता ज्ञात असलेल्या वैद्यकीय माहितीमुळे, पचनी पडणे थोडे कठीणच आहे. अर्थात ऑस्टिओपथीतील मुख्य  Manipulation बरोबरीनेच आहार, व्यायाम, ढब सुधारणे, व्यावसायिक उपदेश (Ocupaticnal advise)  इ.चा वापर केल्याने अनारोग्यकारक विविध घटकांचा परामर्श घेतला जाऊन, आरोग्यप्राप्ती तणावजन्य डोकेदुखी अशा विविध दुखण्यात ऑस्टिओपथीमुळे जे उत्तम परिणाम मिळतात त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर हे परिणाम या थेरपीमुळे कदाचित शरीरात निर्माण होणाऱ्या सूजनिवारक ‘इंटरल्युकिन्स’ या द्रव्यांमुळे (Antiintlammatary Interleukins)  होत असावेत, असे दृष्टोत्पत्तीस आले आहे. डिसेंबर २००७ च्या ‘जर्नल’ ऑफ अमेरिकन ऑस्टिओपथिक असोसिएशन’मध्ये या संबंधीची सविस्तर माहिती आली आहे ती जिज्ञासुनी जरूर पाहावी.
आपली बिघडलेली स्थिती नीट करण्याची प्रत्येक शरीराची आपली अंतर्गत अशी क्षमता असते. शरीराची ही बरे होण्याची क्षमता ‘अस्थि, स्नायू, सांधे, जोड उती’ या यंत्रणेमार्फत पूर्वस्थितीत आणणे हे ‘ऑस्टिओपथी’ या उपचार पद्धतीचे मध्यवर्ती तत्त्व होय.
ऑस्टिओपथी कोठे उपयुक्त?
आज कंबरदुखीपासून ते फुप्फुसांच्या संक्रमणापर्यंत अनेक व्याधीविकारांवर ऑस्टिओपथीचे उपचार होत असले तरी प्रामुख्याने कंबरदुखी, पाठदुखी, तणावजन्य डोकेदुखी या विकारांवर ऑस्टिओपथी जास्तीत जास्त गुणकारी असते, असे म्हणता येईल. याव्यतिरिक्त खेळांमधील दुखापतींवर तसेच सांध्याच्या लवचिकतेकरिताही ऑस्टिओपथीचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे ऑस्टिओपथ सांगतात.
मुळात, आरोग्याचा शारीरिक आयाम ऑस्टिओपथी अधोरेखित करतो व त्यातच तिचे महत्त्व व ताकद लपलेले आहेत, असे नमूद करावेसे वाटते.
ऑस्टिओपथीची आठ प्रमुख तत्त्वे :
१) शरीर ही एक स्वयंपूर्ण यंत्रणा आहे.
२) शरीररचना व शरीराचे कार्य परस्परावलंबी असतात.
३) शरीराची स्वनियंत्रणाची अशी यंत्रणा असते.
४) शरीराची स्वसंरक्षणाची व स्वत:ला ‘बरे करण्याची’ क्षमता असते.
५) ही क्षमता ओलांडल्यास रोगनिर्मिती होते.
६) शरीरस्वास्थ्याकरिता शरीरांतर्गत द्रवांची (Body Fluids) हालचाल आवश्यक.
७) चेतासंस्था व ‘नसा’ (Nwrves) यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
८) रोगाचे देहिक घटक, रोगट स्थिती राहण्यास मदत करतात (व म्हणून त्यावर उपचार महत्त्वाचे!)

osteopathy
osteopathy vs chiropractic
osteopathy salary
does osteopathy work
osteopathic doctor
osteopathy degree
how to become an osteopath
osteopath near me

osteopathy vs physiotherapy
August 19, 2017

Personalised Food Therapy - food therapy for adults


आहारशास्त्र हे एकमेव असे शास्त्र असावे की ज्यात आपणाला सर्व काही कळते अशी आपल्यापैकी बऱ्याच जणांची समजूत असते. दुर्दैवाने परिस्थिती बहुसंख्य वेळा उलटीच असते. आधुनिक तंत्र-विज्ञानामुळे आरोग्य शास्त्राची व आधुनिक वैद्यकाची क्षितिजे विस्तारू लागल्यापासून तर, आहारशास्त्र अधिकाधिक प्रगत व गुंतागुंतीचे होऊ लागले आहे.केवळ पोषणापुरत्याच त्याच्या मर्यादा न राहता, विविध आजारांच्या उपचारांमध्ये व रोगप्रतिबंधनामध्येही ‘आहारा’ची भूमिकाही अधिक ठळक होऊ लागली आहे. जणुकीय पाश्र्वभूमी लाभलेल्या जीनॉमिक्स (GENOMICS) च्या सहाय्याने उपचारांमध्ये अतिविशिष्ट वैयक्तिक आहाराचा (Personalised Food Therapy) उपयोग हे आहारशास्त्राचे एक नवे क्षितीज. या सर्व घडामोडींना, विशेष करून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे विशेषकरून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे सन १९८९ मध्येच ‘फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन इन मेडिसीन’ यू.एस..च्या संस्थापक चेअरमन डॉ. स्टीफन डिफेलिस यांनी छान बारसे केले आहे व ते म्हणजे- न्यूट्रास्यूटिकल्स- न्यूट्रिशन + फार्मास्युटिकल्स- आहार + औषध! तसे पाहिले तर गेल्या काही शतकातील आहाराविषयीचा आपला संकुचित दृष्टीकोन सोडला, तर आयुर्वेदाने आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात आहाराचा र्सवकष व सखोल विचार केल्याचे लक्षात येते. ‘औषधं जान्हवी तोयं’ (गंगेचे पाणी म्हणजे औषधच!), ‘रसोद्भव: पुरुष:’ (अन्न) रसातूनच व्यक्तीची निर्मिती होते!), ‘यथा अन्नं, तथा मन:’ (जसे अन्न तसे मन!) यासारखे औपनिषदिक् विचार म्हणजे एका अर्थाने आरोग्यविषयक ब्रह्मवाक्येच! आयुर्वेदाची ‘आहार’ संकल्पनाही अशीच व्यापक व वैशिष्टय़पूर्ण आढळते. त्या शास्त्रानुसार आपल्या शरीरात पंचज्ञानेंद्रियामार्फत जे जे काही ग्रहण केले जाते, ते ते त्या त्या इंद्रियांचा, म्हणजे पर्यायाने शरीराचा आहार. उदा. रसनेमार्फत (जीभ) घेतले जाणारे अन्न म्हणजे स्थूल आहार, दृश्ये हा दृष्टीचा आहार, गंध हा घ्राणेंद्रियाचा (नाक) आहार, श्रृती (ऐकणे) हा कानाचा आहार तर स्पर्श हा त्वचेचा आहार! व म्हणून आहाराचा विचार म्हणजे या सर्वाचा विचार आणि आरोग्याकरिता योग्य व सात्त्विक आहार म्हणजे या सर्व दृष्टीकोनातून योग्य व सात्त्विक आहार! अर्थात आपल्या आजच्या लेखमर्यादेत आपण ‘आहारा’चा केवळ पारंपरिक स्थूल अर्थानेच, म्हणजे ‘खायचे अन्न’ या दृष्टीकोनातूनच विचार करणार आहोत.
इतिहास : ‘न्यूट्रास्यूटिकल्स’ हे नाव जरी नवीन असले तरी अन्नाचा औषध म्हणून वापर ही कल्पना तशी जुनीच आहे. आधुनिक वैद्यकाचा जनक ‘हिप्रोक्रेटिस’ ही योग्य आहाराचा उपचाराकरिता पुरस्कार करत असे. आयुर्वेदाने तर आरोग्य टिकविण्याकरिता व संवर्धनाकरिता ज्या स्वास्थ्यवृत्ताचा पुरस्कार केला त्याचा बराच भाग आहारविषयकच आहे. आयुर्वेदामध्ये रुग्णोपचारांमध्ये आहारविषयक ‘पथ्य-अपथ्य’ संकल्पनाही खूपच दृढमूल आहेत. आधुनिक कालखंडामध्ये बघितल्यास एकोणविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेमध्ये थायरॉईड ग्रंथीच्या ‘गॉयटर’ (Goitre) या विकासाकरिता आयोडिनयुक्त मीठाच्या वापराची संकल्पना प्रथम मांडली गेली असे आढळते आणि आज तर नेहमीच्या वापरातल्या खाद्यपदार्थाचे अनेक आरोग्यविषयक गुणधर्म नव्याने लक्षात येत आहेत. उदा. टोमॅटोमधील लायकोपीन द्रव्यामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांना आळा बसतो; साल्मन माशातील ‘ओमेगा ३’ या द्रव्यामुळे धमन्यांची लवचिकता टिकून राहते, इ. तर काही धान्ये वा भाजीपाला यांचे नवीन पद्धतीने, म्हणजे हायब्रिडीकरण किंवा जैवतंत्रज्ञानाने जनुकीय रचनेत बदल करून उत्पादन होत आहे. उदा. बीटा कॅरोटीन द्रव्याने (जे गाजरात भरपूर असते व शरीरातील विटामीन ए करिता वा अ‍ॅण्टीअ‍ॅक्सिडंट म्हणून ज्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे) युक्त असा तांदूळ किंवा विटामिन संपृक्त ब्रोकोली ही भाजी इ.

आहारस्फोट- आहार व आरोग्य यांचा अन्योन्य संबंध अधिकाधिक स्पष्ट होत जाणे, माहिती व तंत्रविज्ञानाचा स्फोट, दीर्घायुषी लोकांचे वाढते प्रमाण, नेहमीच्या आरोग्यसेवांच्या वाढत्या किमती आणि रोगप्रतिबंधनाविषयक वाढती जागृती अशा अनेकविध कारणांमुळे हा ‘आहारस्फोट’ होत आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.
न्यूट्रॉस्यूटिकल्स म्हणजे नेमके काय?
डॉ. स्टीफन डिफेलिस यांच्या व्याख्येनुसार आपल्या नेहमीच्या पोषणमूल्यांव्यतिरिक्त (म्हणजे विटामिन्स, क्षार, स्निग्ध- पिष्टमय- प्रथिन पदार्थ इ. इ.) रोगप्रतिबंधन व रोगोपचारांचे (यात अ‍ॅनेमियाचा समावेश नाही) मूल्य असणारे वैद्यकीय व आरोग्यदृष्टीने फायदेशीर असे सर्व अन्नपदार्थ म्हणजे न्यूट्रॉस्यूटिकल्स! यात फळे, भाज्या, धान्य, मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ अशा सर्व पारंपरिक अन्नपदार्थाचा समावेश तर होऊ शकतोच. पण शेतीतंत्रज्ञानाने (हायब्रिडीकरण काही जैवतंत्रज्ञान इ.) निर्माण झालेली नवीन प्रकारची धान्ये किंवा भाजीपाला तसेच काही पारंपरिक पदार्थाचे मूल्यवर्धन उदा. कॅल्शियममुक्त ऑरेंज ज्यूस, फोलिक अ‍ॅसिडयुक्त पीठे इ. अशा अनेक अपारंपरिक अन्नपदार्थाचाही समावेश होतो. या क्षेत्रात नित्यनवीन संशोधन होत असून विविध पारंपरिक अन्नपदार्थातील गुणवान द्रव्ये आढळून येऊ लागली आहेत. (सोबतचा तक्ता पाहा.) अर्थात या सर्व अन्नघटकांची व जुन्या वा नव्या अन्नपदार्थाची मानवी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता आणि व्यावहारिक उपयुक्तता यासंबंधी अधिकाधिक संशोधन होणे महत्त्वाचे आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनालयाच्या माध्यमातून अशा प्रकारची उत्पादने निर्माण करण्यासंबंधीचे तसेच त्यांच्या जाहिराती (काय नमूद करावे वा काय नमूद करता येणार नाही) यासंबंधी एक अधिक व्यापक सरकारी धोरण असणे आवश्यक आहे असे वाटते. युरोप व अमेरिकेमध्ये तेथीलोऊअ तसेच ‘न्यूट्रिशन लेबलिंग अँड एज्युकेशन अ‍ॅक्ट’ (NLEA) इ. माध्यमातून अशी बरीच उपयुक्त नियंत्रणे आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत व जात आहेत.
भविष्यवेध- आरोग्य जागृतीमुळे समाजाचा व वैद्यकाचाही रोगप्रतिबंधनाकडे वाढता कल लक्षात घेतला तर आहारोपचारांना, म्हणजेच न्यूट्रास्यूटिकल्सना नजिकच्या भविष्यात अधिक चांगले दिवस येतील अशी स्पष्ट सुचिन्हे दिसतात. एकटय़ा अमेरिकेतच २००३ साली वार्षिक ३१ बिलियन अमेरिकी डॉलर्सची उलाढाल असणारा न्यूट्रामेटिकल्सचा उद्योग आज ८६ बिलियन डॉलर्सपर्यंत झेपावला आहे. भारतातही आजमितीस रु. ४४०० कोटींचा उलाढाल असणारा उद्योग येत्या ३ वर्षांत दुप्पट होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. युरोप व जपानमध्ये तर या उद्योगाची व्याप्ती अमेरिकेहून प्रचंड आहे. एकटय़ा जपानमध्ये सुमारे ४७ टक्के लोक एखादे तरी न्यूट्रॉस्यूटिक दररोज वापरतात असे काही सर्वेक्षणे सांगतात. भारतीय उद्योजकांनीही हे संकेत जाणून पुढे जाणे आवश्यक आहे असे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते. आहारोपचार अथवा न्यूट्रास्यूटिकल्सनी आपल्या उपचारात भविष्यात अतिमहत्त्वाचे स्थान मिळविले तर आश्चर्य वाटावयास नको. अखेर ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हेच खरे!
Food Therapy
food therapy for adults
food therapy for autism
food therapist near me
food therapy book
food therapy meaning
how to become a food therapist
food therapy quotes

food therapy definition
August 19, 2017

Alexander technique physical therapy feldenkrais exercises

तो १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील, रंगभूमीवरील एक नामवंत शेक्सपिअरिअन नट! त्याच भांडवल म्हणजे त्याचा अवाज, पण तोच हळूहळू बसत एक दिवस नाहीसा होतो. सर्व प्रकारचे उपचार तो करून पाहातो; पण कशाचाच उपयोग होत नाही. मग एक दिवस आरशासमोर उभे राहून सराव करताना, संवाद फेकताना आपले शरीर नको एवढे ताठरते हे  त्याच्या लक्षात येते आणि तो हळूहळू शरीरातील विविध स्नायूंमधील हा तणाव प्रयत्नपूर्वक काढून टाकतो आणि एक दिवस, अहो आश्चर्यम्, त्याचा आवाज चक्क पूर्ववत होतो! फ्रेडरिक मथियास अलेक्झांडर (१८६९-१९५५) च्या आयुष्यातील या घटनेने त्याला एका वेगळ्या वाटेवर चालण्यास प्रवृत्त केले आणि त्यातूनच जन्म झाला, या आगळ्यावेगळ्या उपचारांचा. अलेक्झांडर तंत्राचा!
काय आहे, हे अलेक्झांडर तंत्र ?
अलेक्झांडरच्या मते आयुष्यातील विविध ताणतणावांचा सामना करताना, लहानपणापासूनच आपल्या स्नायूंच्या विविध प्रतिक्रिया निश्चित होत जातात व त्यातूनच आपल्या शरीराची ढब बदलते, स्नायू तणावग्रस्त होतात. डोके, मान व कणा एका सरळ रेषेत राहण्याची नैसर्गिक आवश्यकता संपुष्टात येते व त्यातूनच विविध व्याधींचा जन्म होतो. लहानपणापासून लागलेल्या या चुकीच्या सवयी आपण प्रयत्नपूर्वक घालवू शकतो. (Delearning) व त्यामुळे शरीराला एक प्रकारचा नैसर्गिक हलकेपणा व स्वास्थ्य प्राप्त होते. बसणे, उभे राहणे, चालणे व बोलणे या दैनंदिन कृतींमधील अवघडलेपण व ताणलेली स्थिती, ‘भान’ व ‘शिथिलीकरण’ या दोन तंत्रांचा अवलंब करून, प्रयत्नपूर्वक नाहीशी करणे हा अलेक्झांडर तंत्राचा पाया होय. याकरिता काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम व मृदू पद्धतीने स्नायू हाताळणे यांचा अंतर्भाव या पद्धतीत केला जातो. आपली ‘चुकीची ढब’ सुधारणे हे या पद्धतीचे महत्त्वाचे अंग असून, आपण आपल्या ‘शारीर अस्तित्वा’बद्दल संवेदनशील होणे या तंत्रात महत्त्वाचे मानले जाते.
सन १९७० मध्ये टफ्ट्स (TUFTS) विश्वविद्यालयात केल्या गेलेल्या काही प्रयोगात अशा प्रकारच्या Delearning चा उपयोग होतो, असे सिद्ध झाल्यानंतर ही पद्धत अधिक लोकप्रिय झाली असे म्हणता येईल. आल्डस् हक्सले, जॉर्जबर्नार्ड शॉ, नोबेल विजेता निकोलास टिनबर्जेन, पॉल मॅक्कर्टनी, जोएल ग्रे अशा नामवंतांनी नावाजलेली ही उपचारपद्धती आज नृत्य, अभिनय, वक्तृत्व अशा कलाविष्कारांना पूरक व काही ऑलिम्पिक्स खेळांच्या पूर्वतयारीकरिताही वापरली जाते. पाठदुखी, बोलण्यातील काही दोष, पार्किनसन् विकारात हालचाल नियंत्रणाकरिता, आत्मविश्वास वाढविण्याकरिता ‘तसेच नैराश्य वा नाहक’ चिंता यावर मात करण्याकरिता अशा विविध विकारात या तंत्राचा आज जगभर वापर होताना दिसतो. दैनंदिन आयुष्यातील वरवर सोप्या व सहज वाटणाऱ्या कृती-हालचालीही व्याधीविकार निर्मितीच्या दृष्टीने (व उपचारांच्या दृष्टीनेही) किती महत्त्वाच्या असतात हेच सत्य अलेक्झांडर तंत्र अधोरेखित करते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
अलेक्झांडर तंत्र किंवा अन्य ‘शारीर तंत्र’ (Bodywork) पद्धतीकडे पाहाताना एक गोष्ट सहज ध्यानात येते व ती म्हणजे शरीर केंद्रीभूत माणून विकसित झालेल्या या सर्व पद्धतींमध्ये, उपचार करणाऱ्याचा रुग्णाला होणारा हस्तस्पर्शही खूपच महत्त्वाचा घटक असतो. मागील लेखात वर्णिलेल्या ‘किरोप्रॅक्टिक’ तंत्रातही किरोप्रॅक्टर उपचारक रुग्णाचे सरकलेले मणके स्वत:च्या हाताने परत पूर्वस्थितीत आणताना दिसतो. आधुनिक वैद्यकाच्या जनकाने हिपॉक्रेटीसने तर मसाजतंत्रावर चक्क एक पुस्तक लिहिले होते व पुढे अनेक वर्षे वैद्यकीय अभ्यासक्रमात त्याचा समावेश होत होता. आणि रुग्णही डॉक्टरांचे रेटिंग केवळ त्यांच्या ज्ञान, व्यक्तिमत्त्व किंवा निदानक्षमतेवर करत नसून त्यांच्या ‘मसाज’ कलेच्या क्षमतेवरही करत असत! पण पुढे यंत्रे आली, जादूई औषधे आली, रुग्णसंख्येमुळे डॉक्टरांनाही वेळ कमी पडू लागला व मसाजाचे, स्पर्शाचे हे काम दुसऱ्यांवर सोपविले जाऊ लागले. आजतर ‘मानसोपचार’सारख्या क्षेत्रांत रुग्णाला हस्तस्पर्श करणे हे व्यवसायमूल्यांच्या दृष्टीने जवळजवळ निषिद्ध समजले जाते. या पाश्र्वभूमीवर Bodywork उपचारपद्धती या आगळ्यावेगळ्या ठरतात. फेल्डेनक्रेस (Feldenkrais) ही अशीच एक वैशिष्टय़पूर्ण उपचारपद्धती.
रशियामध्ये जन्माला आलेला मोशे फेल्डेनक्रेस हा बहुआमायी व्यक्तिमत्त्वाचा भौतिक शास्त्रज्ञ! तो प्रामुख्याने किरणोत्सर्ग, पाणबुडी प्रतिरोधक तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील संशोधनात गुंतला असला तरी नकाशे करण्यात, यंत्र अभियांत्रिकीत किंवा शिक्षणक्षेत्रातही आणि ज्यूडोमध्येही पटाईत होता. किंबहुना ज्यूडोत ब्लॅकबेल्ट मिळविणाऱ्या पहिल्या काही युरोपियन्सपैकी तो एक होता. तो या उपचारपद्धतींमध्ये कसा शिरला? अलेक्झांडरप्रमाणे तोही एका वैयक्तिक आजारामुळे ही पद्धत शोधून काढण्यास माध्यम ठरला. त्याच्या दोन्ही गुडघ्यांना मार लागल्यामुळे तो जवळजवळ पंगूच झाला होता. विविध डॉक्टरांच्या उपचारानंतरही त्याच्यात फारसा फरक न पडल्याने त्याने स्वत:च स्वत:वर उपचार करण्याचे ठरविले आणि त्याकरिता त्याने भौतिकी, जीवशास्त्र, मानसशास्त्र, चेताविज्ञान, न्यूटोनियन मेकॅनिक्स अशा विविध विषयांच्या अभ्यासाचा एक महाज्ञानयज्ञ आरंभिला आणि त्यातूनच या पद्धतीचा जन्म झाला.

काय आहे फेल्डेनक्रेस ?feldenkrais exercises
मूलत: हालचालीतील लवचिकता, समन्वय, आवाका व कार्यक्षमता वाढविणारी अशी ही एक प्रशिक्षण पद्धती आहे. आज जरी वेगवेगळ्या वयोगटांत वेगवेगळ्या व्याधी-विकारांवर जगभर ही पद्धत वापरली जात असली तरी प्रामुख्याने तिचा उपयोग चेता व स्नायूसंस्थेच्या विकारांवर अधिक होताना दिसतो. उदा. मस्तिष्कघात (cerebral palsy), लकवा (stroke), Murtiple sclerosis B. फेल्डेनक्रेस पद्धतीचे दोन प्रमुख घटक म्हणजे- १. हालचालीतून भान. Awareness Through Movement (ATM) आणि २. कार्यकारी एकात्मता Functional Integration (FI). सर्वसामान्यपणे उपचारांची सुरुवात ATM च्या धडय़ांनी होते. यात रुग्ण पहुडलेला असताना अथवा खुर्चीवर बसलेला असताना किंवा जमिनीवर उभा असताना त्याला त्याच्या शरीराच्या विविध भागांवर लक्ष केंद्रित करून त्यासंबंधीचे भान आणले जाते. मग उपचारक त्याच्याकडून हळूहळू विविध हालचाली अनेक वेळा करवून घेतो. कालांतराने ती ती हालचाल अधिक सफाईदार व लवचिक झाल्याचे ध्यानात येते. विविध विकारांकरिता विविध हालचालींचे सेशन्स करावे लागतात.ोक सेशनमध्ये अळट प्रमाणे हालचाली तर करून घेतल्या जातातच, पण पुढे उपचारक हळूवार पद्धतीने रुग्णाच्या स्नायू व सांध्यांवरही दाब देऊन हालचालींचा आवाका वाढवितो. एकंदरीतच ‘शारीरस्थितीचे भान’ आणणे हा या उपचारपद्धतीतील महत्त्वाचा घटक असतो. वैद्यक क्षेत्रातील अनेक शोध हे त्या क्षेत्रातील डॉक्टरांपेक्षा इतर अनेकांनी लावल्याचे लक्षात येते. इडारोल्फ या जैवभौतिकी शास्त्रज्ञ महिलेने शोधलेली रोल्फिंग (Rolfing) ही उपचारपद्धती ही अशापैकीच एक. अन्य पद्धती उदा. किरोप्रॅक्टिक, ऑस्टोओपथी, एलेक्झांडर, फेल्डेनक्रेस इ. ज्या वेळी अस्थी-स्नायू-सांधे यांवर भर देताना दिसतात त्यावेळी रोल्फिंग जोड-ऊतींवर (connective Tissues CXQF. Fascia) भर देताना दिसते. सर्वसामान्यपणे या जोड-ऊती उदा. स्नायूबंधने ही सैल, लवचिक व ओलसर असतात व त्यामुळेच स्नायू व सांधे लवचिक राहून हालचालक्षम राहतात. पण दीर्घकालिक ताण-तणावांमुळे वा त्यांचा उपयोग न केल्यास (आळशीपणा, व्यायामाचा अभाव, सततचे गाडी- घोडे, यंत्रांचा अतिवापर इ.) त्यामध्ये गाठी निर्माण होऊन त्यांची लवचिकता कमी होते. परिणामस्वरूप स्नायू आखडतात  व सांधे जखडतात. रोल्फिंगमध्ये रोल्फर हळूवार दाब देऊन जोड-ऊतींमधील या ‘गाठी’ घालवितात व त्या ऊती परत पहिल्यासारख्या लवचिक करण्याचा प्रयत्न करतात. सर्वसाधारणपणे एक-दोन आठवडय़ाचे अंतर ठेवून दोन तासांचे दहा सेशन्स अशी दोन सेशन्समध्ये रोल्फिंगची पद्धत आहे. अमेरिकेत कोलोरॅडोमधील ‘बोल्डर’ येथे Rolf Institute असून जगभरात आज हजारो रोल्फर ही पद्धत अवलंबितात. UCLA मधील  Department of kinesiology मध्ये व Univertsity of Maryland मध्ये केलेल्या विविध संशोधनांनी रोल्फिंगची या बाबतीतील उपयुक्तता अधोरेखित केली आहे. दीर्घकालिक पाठदुखी, बालमस्तिष्काघात अशा विविध विकारांत रोल्फिंग उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
या रोल्फिंगचीच एक परिवर्तित आवृत्ती म्हणजे Hellerwork! जोसेफ हेलर हा नासामधील एक एरोस्पेस इंजिनीयर. इडा रोल्फने त्याला स्वत: शिकविले, पुढे तो १९७६ साली रोल्फ इन्स्टिटय़ूटचा पहिला रोल्फिंग प्रमुख बनला. नंतर त्याने रोल्फिंगला भावनिक ताण कमी करण्याकरिता संवादात्मक सूचनांची (verbal Dialogue) जोड दिली व त्यातूनच ‘हेलरवर्क’ ही नवीन पद्धत जन्माला आली. ‘Bodywork’  उपचारपद्धतीचे हे विश्व असे वैविध्यपूर्ण व उद्बोधक आहे. आपल्याच शरीराविषयी एक वेगळेच भान या पद्धती आपणाला आणू देतात हे त्यांचे प्रमुख वैशिष्ठय़ व बलस्थानही!

alexander technique physical therapy
what is the alexander technique
alexander technique posture
how to do the alexander technique
alexander technique for actors
alexander technique los angeles
alexander technique exercises
alexander technique uk

alexander technique certification
feldenkrais
feldenkrais practitioner
moshé feldenkrais
feldenkrais training
feldenkrais definition
feldenkrais movement
feldenkrais method awareness through movement
feldenkrais exercises
feldenkrais youtube

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...