Saturday, August 19, 2017

Alexander technique physical therapy feldenkrais exercises

तो १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील, रंगभूमीवरील एक नामवंत शेक्सपिअरिअन नट! त्याच भांडवल म्हणजे त्याचा अवाज, पण तोच हळूहळू बसत एक दिवस नाहीसा होतो. सर्व प्रकारचे उपचार तो करून पाहातो; पण कशाचाच उपयोग होत नाही. मग एक दिवस आरशासमोर उभे राहून सराव करताना, संवाद फेकताना आपले शरीर नको एवढे ताठरते हे  त्याच्या लक्षात येते आणि तो हळूहळू शरीरातील विविध स्नायूंमधील हा तणाव प्रयत्नपूर्वक काढून टाकतो आणि एक दिवस, अहो आश्चर्यम्, त्याचा आवाज चक्क पूर्ववत होतो! फ्रेडरिक मथियास अलेक्झांडर (१८६९-१९५५) च्या आयुष्यातील या घटनेने त्याला एका वेगळ्या वाटेवर चालण्यास प्रवृत्त केले आणि त्यातूनच जन्म झाला, या आगळ्यावेगळ्या उपचारांचा. अलेक्झांडर तंत्राचा!
काय आहे, हे अलेक्झांडर तंत्र ?
अलेक्झांडरच्या मते आयुष्यातील विविध ताणतणावांचा सामना करताना, लहानपणापासूनच आपल्या स्नायूंच्या विविध प्रतिक्रिया निश्चित होत जातात व त्यातूनच आपल्या शरीराची ढब बदलते, स्नायू तणावग्रस्त होतात. डोके, मान व कणा एका सरळ रेषेत राहण्याची नैसर्गिक आवश्यकता संपुष्टात येते व त्यातूनच विविध व्याधींचा जन्म होतो. लहानपणापासून लागलेल्या या चुकीच्या सवयी आपण प्रयत्नपूर्वक घालवू शकतो. (Delearning) व त्यामुळे शरीराला एक प्रकारचा नैसर्गिक हलकेपणा व स्वास्थ्य प्राप्त होते. बसणे, उभे राहणे, चालणे व बोलणे या दैनंदिन कृतींमधील अवघडलेपण व ताणलेली स्थिती, ‘भान’ व ‘शिथिलीकरण’ या दोन तंत्रांचा अवलंब करून, प्रयत्नपूर्वक नाहीशी करणे हा अलेक्झांडर तंत्राचा पाया होय. याकरिता काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम व मृदू पद्धतीने स्नायू हाताळणे यांचा अंतर्भाव या पद्धतीत केला जातो. आपली ‘चुकीची ढब’ सुधारणे हे या पद्धतीचे महत्त्वाचे अंग असून, आपण आपल्या ‘शारीर अस्तित्वा’बद्दल संवेदनशील होणे या तंत्रात महत्त्वाचे मानले जाते.
सन १९७० मध्ये टफ्ट्स (TUFTS) विश्वविद्यालयात केल्या गेलेल्या काही प्रयोगात अशा प्रकारच्या Delearning चा उपयोग होतो, असे सिद्ध झाल्यानंतर ही पद्धत अधिक लोकप्रिय झाली असे म्हणता येईल. आल्डस् हक्सले, जॉर्जबर्नार्ड शॉ, नोबेल विजेता निकोलास टिनबर्जेन, पॉल मॅक्कर्टनी, जोएल ग्रे अशा नामवंतांनी नावाजलेली ही उपचारपद्धती आज नृत्य, अभिनय, वक्तृत्व अशा कलाविष्कारांना पूरक व काही ऑलिम्पिक्स खेळांच्या पूर्वतयारीकरिताही वापरली जाते. पाठदुखी, बोलण्यातील काही दोष, पार्किनसन् विकारात हालचाल नियंत्रणाकरिता, आत्मविश्वास वाढविण्याकरिता ‘तसेच नैराश्य वा नाहक’ चिंता यावर मात करण्याकरिता अशा विविध विकारात या तंत्राचा आज जगभर वापर होताना दिसतो. दैनंदिन आयुष्यातील वरवर सोप्या व सहज वाटणाऱ्या कृती-हालचालीही व्याधीविकार निर्मितीच्या दृष्टीने (व उपचारांच्या दृष्टीनेही) किती महत्त्वाच्या असतात हेच सत्य अलेक्झांडर तंत्र अधोरेखित करते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
अलेक्झांडर तंत्र किंवा अन्य ‘शारीर तंत्र’ (Bodywork) पद्धतीकडे पाहाताना एक गोष्ट सहज ध्यानात येते व ती म्हणजे शरीर केंद्रीभूत माणून विकसित झालेल्या या सर्व पद्धतींमध्ये, उपचार करणाऱ्याचा रुग्णाला होणारा हस्तस्पर्शही खूपच महत्त्वाचा घटक असतो. मागील लेखात वर्णिलेल्या ‘किरोप्रॅक्टिक’ तंत्रातही किरोप्रॅक्टर उपचारक रुग्णाचे सरकलेले मणके स्वत:च्या हाताने परत पूर्वस्थितीत आणताना दिसतो. आधुनिक वैद्यकाच्या जनकाने हिपॉक्रेटीसने तर मसाजतंत्रावर चक्क एक पुस्तक लिहिले होते व पुढे अनेक वर्षे वैद्यकीय अभ्यासक्रमात त्याचा समावेश होत होता. आणि रुग्णही डॉक्टरांचे रेटिंग केवळ त्यांच्या ज्ञान, व्यक्तिमत्त्व किंवा निदानक्षमतेवर करत नसून त्यांच्या ‘मसाज’ कलेच्या क्षमतेवरही करत असत! पण पुढे यंत्रे आली, जादूई औषधे आली, रुग्णसंख्येमुळे डॉक्टरांनाही वेळ कमी पडू लागला व मसाजाचे, स्पर्शाचे हे काम दुसऱ्यांवर सोपविले जाऊ लागले. आजतर ‘मानसोपचार’सारख्या क्षेत्रांत रुग्णाला हस्तस्पर्श करणे हे व्यवसायमूल्यांच्या दृष्टीने जवळजवळ निषिद्ध समजले जाते. या पाश्र्वभूमीवर Bodywork उपचारपद्धती या आगळ्यावेगळ्या ठरतात. फेल्डेनक्रेस (Feldenkrais) ही अशीच एक वैशिष्टय़पूर्ण उपचारपद्धती.
रशियामध्ये जन्माला आलेला मोशे फेल्डेनक्रेस हा बहुआमायी व्यक्तिमत्त्वाचा भौतिक शास्त्रज्ञ! तो प्रामुख्याने किरणोत्सर्ग, पाणबुडी प्रतिरोधक तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील संशोधनात गुंतला असला तरी नकाशे करण्यात, यंत्र अभियांत्रिकीत किंवा शिक्षणक्षेत्रातही आणि ज्यूडोमध्येही पटाईत होता. किंबहुना ज्यूडोत ब्लॅकबेल्ट मिळविणाऱ्या पहिल्या काही युरोपियन्सपैकी तो एक होता. तो या उपचारपद्धतींमध्ये कसा शिरला? अलेक्झांडरप्रमाणे तोही एका वैयक्तिक आजारामुळे ही पद्धत शोधून काढण्यास माध्यम ठरला. त्याच्या दोन्ही गुडघ्यांना मार लागल्यामुळे तो जवळजवळ पंगूच झाला होता. विविध डॉक्टरांच्या उपचारानंतरही त्याच्यात फारसा फरक न पडल्याने त्याने स्वत:च स्वत:वर उपचार करण्याचे ठरविले आणि त्याकरिता त्याने भौतिकी, जीवशास्त्र, मानसशास्त्र, चेताविज्ञान, न्यूटोनियन मेकॅनिक्स अशा विविध विषयांच्या अभ्यासाचा एक महाज्ञानयज्ञ आरंभिला आणि त्यातूनच या पद्धतीचा जन्म झाला.

काय आहे फेल्डेनक्रेस ?feldenkrais exercises
मूलत: हालचालीतील लवचिकता, समन्वय, आवाका व कार्यक्षमता वाढविणारी अशी ही एक प्रशिक्षण पद्धती आहे. आज जरी वेगवेगळ्या वयोगटांत वेगवेगळ्या व्याधी-विकारांवर जगभर ही पद्धत वापरली जात असली तरी प्रामुख्याने तिचा उपयोग चेता व स्नायूसंस्थेच्या विकारांवर अधिक होताना दिसतो. उदा. मस्तिष्कघात (cerebral palsy), लकवा (stroke), Murtiple sclerosis B. फेल्डेनक्रेस पद्धतीचे दोन प्रमुख घटक म्हणजे- १. हालचालीतून भान. Awareness Through Movement (ATM) आणि २. कार्यकारी एकात्मता Functional Integration (FI). सर्वसामान्यपणे उपचारांची सुरुवात ATM च्या धडय़ांनी होते. यात रुग्ण पहुडलेला असताना अथवा खुर्चीवर बसलेला असताना किंवा जमिनीवर उभा असताना त्याला त्याच्या शरीराच्या विविध भागांवर लक्ष केंद्रित करून त्यासंबंधीचे भान आणले जाते. मग उपचारक त्याच्याकडून हळूहळू विविध हालचाली अनेक वेळा करवून घेतो. कालांतराने ती ती हालचाल अधिक सफाईदार व लवचिक झाल्याचे ध्यानात येते. विविध विकारांकरिता विविध हालचालींचे सेशन्स करावे लागतात.ोक सेशनमध्ये अळट प्रमाणे हालचाली तर करून घेतल्या जातातच, पण पुढे उपचारक हळूवार पद्धतीने रुग्णाच्या स्नायू व सांध्यांवरही दाब देऊन हालचालींचा आवाका वाढवितो. एकंदरीतच ‘शारीरस्थितीचे भान’ आणणे हा या उपचारपद्धतीतील महत्त्वाचा घटक असतो. वैद्यक क्षेत्रातील अनेक शोध हे त्या क्षेत्रातील डॉक्टरांपेक्षा इतर अनेकांनी लावल्याचे लक्षात येते. इडारोल्फ या जैवभौतिकी शास्त्रज्ञ महिलेने शोधलेली रोल्फिंग (Rolfing) ही उपचारपद्धती ही अशापैकीच एक. अन्य पद्धती उदा. किरोप्रॅक्टिक, ऑस्टोओपथी, एलेक्झांडर, फेल्डेनक्रेस इ. ज्या वेळी अस्थी-स्नायू-सांधे यांवर भर देताना दिसतात त्यावेळी रोल्फिंग जोड-ऊतींवर (connective Tissues CXQF. Fascia) भर देताना दिसते. सर्वसामान्यपणे या जोड-ऊती उदा. स्नायूबंधने ही सैल, लवचिक व ओलसर असतात व त्यामुळेच स्नायू व सांधे लवचिक राहून हालचालक्षम राहतात. पण दीर्घकालिक ताण-तणावांमुळे वा त्यांचा उपयोग न केल्यास (आळशीपणा, व्यायामाचा अभाव, सततचे गाडी- घोडे, यंत्रांचा अतिवापर इ.) त्यामध्ये गाठी निर्माण होऊन त्यांची लवचिकता कमी होते. परिणामस्वरूप स्नायू आखडतात  व सांधे जखडतात. रोल्फिंगमध्ये रोल्फर हळूवार दाब देऊन जोड-ऊतींमधील या ‘गाठी’ घालवितात व त्या ऊती परत पहिल्यासारख्या लवचिक करण्याचा प्रयत्न करतात. सर्वसाधारणपणे एक-दोन आठवडय़ाचे अंतर ठेवून दोन तासांचे दहा सेशन्स अशी दोन सेशन्समध्ये रोल्फिंगची पद्धत आहे. अमेरिकेत कोलोरॅडोमधील ‘बोल्डर’ येथे Rolf Institute असून जगभरात आज हजारो रोल्फर ही पद्धत अवलंबितात. UCLA मधील  Department of kinesiology मध्ये व Univertsity of Maryland मध्ये केलेल्या विविध संशोधनांनी रोल्फिंगची या बाबतीतील उपयुक्तता अधोरेखित केली आहे. दीर्घकालिक पाठदुखी, बालमस्तिष्काघात अशा विविध विकारांत रोल्फिंग उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
या रोल्फिंगचीच एक परिवर्तित आवृत्ती म्हणजे Hellerwork! जोसेफ हेलर हा नासामधील एक एरोस्पेस इंजिनीयर. इडा रोल्फने त्याला स्वत: शिकविले, पुढे तो १९७६ साली रोल्फ इन्स्टिटय़ूटचा पहिला रोल्फिंग प्रमुख बनला. नंतर त्याने रोल्फिंगला भावनिक ताण कमी करण्याकरिता संवादात्मक सूचनांची (verbal Dialogue) जोड दिली व त्यातूनच ‘हेलरवर्क’ ही नवीन पद्धत जन्माला आली. ‘Bodywork’  उपचारपद्धतीचे हे विश्व असे वैविध्यपूर्ण व उद्बोधक आहे. आपल्याच शरीराविषयी एक वेगळेच भान या पद्धती आपणाला आणू देतात हे त्यांचे प्रमुख वैशिष्ठय़ व बलस्थानही!

alexander technique physical therapy
what is the alexander technique
alexander technique posture
how to do the alexander technique
alexander technique for actors
alexander technique los angeles
alexander technique exercises
alexander technique uk

alexander technique certification
feldenkrais
feldenkrais practitioner
moshé feldenkrais
feldenkrais training
feldenkrais definition
feldenkrais movement
feldenkrais method awareness through movement
feldenkrais exercises
feldenkrais youtube

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...