Saturday, August 19, 2017

Metamorphic Therapy

ही पद्धत डॉक्टरमहाशयांनी अनेक इच्छुकांना शिकविली; पण आधुनिक वैद्यकाचे सर्व उपासक मात्र त्याने स्तंभित झाले व त्यांनी तिकडे चक्क पाठ फिरविली.‘आपले डोके आकाशात असले तरी पाय मात्र जमिनीवरच असावेत’ असा एक वाक्प्रचार आपल्याकडे रूढ आहे. याचा अर्थ, आपली कल्पनाशक्ती अवकाशात विहरत असली तरी वास्तवाचे भान मुळीच सुटता कामा नये.
पण या वाक्प्रचाराच्या लाक्षणिक अर्थाने समाधानी न होता कोणी शब्दश: अर्थ अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर?
ब्रिटिश निसर्गोपचार तज्ज्ञ आणि रिफ्लेक्सॉलॉजिस्ट रॉबर्ट जॉन (Robert st. John) याने मनोविकलांग मुलांवर (रिफ्लेक्सॉलॉजीने) उपचार करता करता अशाच एका नव्या उपचार पद्धतीला जन्म दिला; या उपचार पद्धतीचे बारसे त्याने सुरुवातीस ‘प्रसूतीपूर्व उपचारपद्धती’ (Prenatal Therapy) असे केले. पण या उपचारपद्धतीमुळे केवळ रोगनिवारणच होणे वा काही शारीरिक बदलांपुरतीच ती मर्यादित राहते असे नव्हे तर त्यामुळे माणसाच्या एकंदर व्यक्तिमत्त्वात, स्वभावात व र्सवकष आरोग्यातच बदल होतो, अशी त्याची धारणा झाली व म्हणून रुपांतर करणारी उपचारपद्धती (Metamorphic Therapy) असे तिथे नामरुपांतर त्याने पुढे केले.
काय आहे मेटामॉर्फिक तंत्र?
एका अर्थाने ही उपचारपद्धती नसून ते आपल्या एकंदर आरोग्यात बदल घडवून आणणारे तंत्र आहे असा हे तंत्र वापरणाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे शरीरांतर्गत जीवनउर्जा कळ दाबल्यासारखी कार्यान्वित होते व त्यामुळे रोगनिवारण तर होतेच; पण आरोग्याच्या आणखी उच्चस्तरावर आपण पूर्ण विकसित होण्यास मदत होते असा या उपचारकांचा दावा आहे.
आपले पाय आपल्या पूर्ण अस्तित्वाचे निर्देशक आहेत असेही मंडळी मानतात. पाय खऱ्या अर्थाने जमिनीवर असतात म्हणजे आपल्या मूलस्रोताशी त्यांचा कायम संपर्क असतो व त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टींशी म्हणजे ‘बदल व हालचाल’ त्यांचा प्रत्यक्ष सबंध असतो व त्यामुळे पायांवर (म्हणजे पायाच्या तळव्यांवर) उपचार म्हणजे संपूर्ण शरीर-मनावर उपचार अशी या तंत्राचा अवलंब करणाऱ्यांची धारणा आहे.
पायाच्या तळव्याचे विविध भाग शरीराच्या विविध भागांचे निर्देशक आहेत. (याबाबतीत त्यांचे रिफ्लेक्सॉलॉजी ना अ‍ॅक्युप्रेशरच्या एका तंत्राशी साधम्र्य आहे) एवढेच नव्हे तर हे विविध भाग विविध मनोवृत्ती व भावनांशीही निगडीत आहेत, असेही मंडळी मानतात. याही पुढे जाऊन आपण गर्भावस्थेत असताना ज्या आपल्या शारीरिक, मानसिक व भावनिक ठेवणीचा पाया घातला जातो तो कालखंड (४० ते ४२ आठवडे), पायाच्या तळव्यांच्या आतल्या बाजूस म्हणजे अंगठय़ाचे मूळ ते घोटा या प्रदेशात, ४० ते ४२ बिंदूच्या माध्यमातून निर्देशित केला जातो असे ही मंडळी मानतात. साहजिकच या भागावर काम केल्यास (स्पर्श, दाब, उत्तेजना इ. माध्यमातून) न केवळ शरीराच्या वा मनाच्या विविध वृत्तींवर सकारात्मक परिणाम घडविता येतो तर गर्भावस्थेत निर्माण झालेले नकारात्मक पॅटर्न बदलून ते सकारात्मकही करता येतात असा या मंडळींचा दावा आहे.
रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये पायाच्या तळव्यांवरील दुखरे भाग (जेथे त्यांच्या सिद्धांताप्रमाणे जैवउर्जेचा प्रवाह खंडीत झालेला असतो ते भाग) शोधून त्यावर दाब देऊन उपचार केले जातात तर या तंत्रात तेथे प्रत्यक्ष दाब न देता त्यांच्या अस्तित्वाची केवळ दखल घेतली जाते व जीवनउर्जेचा प्रवाह उत्तेजित झाल्यावर या दुखऱ्या बिंदूंची आपोआप काळजी घेतली जाईल असे मानण्यात येते. म्हणूनच बऱ्याच वेळा या मंडळींना उपचारक न म्हणता ‘उत्प्रेरक’ (catalyst) असे संबोधण्यात येते.
प्रत्यक्ष उपचार कसे देतात? यात ‘उत्प्रेरक’ रुग्णाजवळ बसून त्याच्या पायाच्या तळव्यांना (विशेषत्त्वाने आतील बाजूस) हलका; पण तालबद्ध असा स्पर्श करतो. अशा प्रकारच्या साधारण २० मि.च्या उपचारांनंतर तो रुग्णाचा हाताच्या तळव्यांना तसेच मस्तकाच्या मध्यभागी तसेच तळाशी (मान व मस्तक यांच्या सांध्यापाशी) व कानाच्या मागील बाजूसही १० ते १५ मि. स्पर्श करतो. असे उपचार काही आठवडे वा काही महिनेही करावे लागतात.
अन्य अनेक शारीरिक विकारांबरोबरच शैक्षणिक समस्याग्रस्त मुलांवर तसेच स्वमग्न मुलांवर (Autistic children) याचा चांगला उपयोग होतो असे हे उपचारक म्हणतात.

कर्करोगग्रस्त रुग्ण तपासल्यानंतर त्यांच्यामध्येही बेंबीच्या वर असाच बद्द आवाज येताना त्यांना आढळला.
आधुनिक दृष्टीकोन काय सांगतो? संपूर्ण वस्तूचा ‘Hologram’ तंत्राने फोटो काढला व त्याचा एखादा तुकडाही पुन्हा विकसित केला तर त्यातून ती वस्तू पुन्हा पूर्णपणे दृश्यमान होते. याच पद्धतीने संपूर्ण- शरीर व मन- पायाच्या वा हाताच्या तळव्यावर वा बाह्यकर्णावर निर्देशित होते काय? आजच्या घटकेला तरी आधुनिक विज्ञान वा वैद्यक असे मानत नाही. (पण पारंपरिक चीनी वैद्यकात तशी धारणा आहे!) व त्यामुळे Metamorphic Technique आजच्या घटकेला तरी ‘गूढ’च राहते. यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे असे वाटते!
याहून अधिक ‘गूढ’ व वादग्रस्त तंत्र म्हणजे रेडिऑनिक्स (Radionics)! त्याविषयी थोडे.
इतिहास : अमेरिकन न्यूरॉलॉजिस्ट डॉ. अल्बर्ट अब्राम्स (Dr. Albert Abroms) यांना एका कर्करोगग्रस्त रुग्णाचे पोट तपासून पाहताना, नेहमीच्या पोटाच्या पोकळ आवाजाऐवजी बद्द आवाज आढळला. बरे तेथे (म्हणजे बेंबीच्या वर) कोणतीही गाठ वा अन्य काही विकृतीही आठवली नाही. अन्य कर्करोगग्रस्त रुग्ण तपासल्यानंतर त्यांच्यामध्येही बेंबीच्या वर असाच बद्द आवाज येताना त्यांना आढळला. कर्करोगाव्यतिरिक्त अन्य व्याधी वा विकारांनीग्रस्त रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना पोटाच्या विविध भागात (विविध रोगांनुसार) अशा प्रकारचाच बद्द आवाज येताना आढळला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पूर्ण निरोगी माणसानेसुद्धा हातात एखादी रोगग्रस्त उती (Tissue) धरली, तर त्याच्याही पोटावरच्या आघात-तपासाने (Percvssion) असाच बद्द आवाज येताना त्यांना आढळला. या सर्व निरीक्षणांमधून त्यांनी एक निष्कर्ष काढला (सन १९२०) व तो म्हणजे, रोग हा मूलत: पेशीं नाशाशी संबंधित नसून, शरीरातील इलेक्ट्रॉन्सचे संतुलन बिघडल्याने निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्जनाशी (Radionics) संबंधित आहे. पुढे पोटाच्या एकाच क्षेत्रात विविध रोगांची किरणोत्सर्जन क्षेत्रे एकमेकामध्ये मिसळू लागली. तेव्हा ती वेगवेगळी लक्षात येण्याकरिता त्यांनी एक यंत्र तयार केले त्याचे नाव बायोडायनॅमोमीटर! (Biodynamometer). याच यंत्राला पुढे ‘अ‍ॅब्रामचा ब्लॅक बॉक्स’ असे संबोधण्यात येऊ लागले.
पुढे डॉ. अ‍ॅब्रामनी असेही दाखवून दिले की रुग्णाचे निदान करताना, प्रत्यक्ष रुग्ण समोर नसला तरीही चालू शकते तर त्याऐवजी रुग्णाची एखादी उती (रक्ताचा नमुना किंवा केस) बायोडायनॅमोमीटरला जोडलेल्या एखाद्या भांडय़ात डायनामायझ्र (Dynamiser) ठेवून तो बायोडायनॅमोमीटर एखाद्या निरोगी व्यक्तीला जोडून त्याचे पोट तपासूनही त्या रुग्णाचे निदान करता येते! ही पद्धत डॉक्टरमहाशयांनी अनेक इच्छुकांना शिकविली; पण आधुनिक वैद्यकाचे सर्व उपासक मात्र त्याने स्तंभित झाले व त्यांनी तिकडे चक्क पाठ फिरविली. पुढे अमेरिकन कायरोप्रॅक्टर रुथ ड्राऊनने केवळ निदानाकरिताच नव्हे तर उपचारांकरिताही (रुग्ण समोर नसला तरी वरील पद्धतीने त्याच्या उतीसमोर ठेवून!) या पद्धतीचा अवलंब केला. पण पुढे तिच्यावर वैद्यकीय फसवणुकीचा दावा दाखल केला गेला व त्यात तिला तुरुंगवासही झाला. ब्रिटनमध्ये मात्र जॉर्ज डि ला वॉर नावाच्या इंजिनियरने यावर बरेच संशोधन केले. सन १९२४ मध्ये ‘रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन’ने रेडिऑनिक्स या उपरोल्लेखित उपचार पद्धतीच्या परिणामकारकतेची वर्षभर कसून चौकशी केली व त्यात त्यांना या पद्धतीचा उपयोग दिसून आला. मात्र ‘रेडिऑनिक्स’ नेमके काय व कसे साधते ते काही आजही सांगता येत नाही.
आज अमेरिकेत या उपचारद्धतीला कायदेशीर अधिष्ठान नाही. ब्रिटनमध्ये ती चालते. प्रत्यक्ष रुग्ण समोर नसला तरी त्याची एखादी उती (रक्ताचा थेंब, नखाचा तुकडा किंवा केस इ.) समोर साक्षी (witness) ठेवून, विविध यंत्रांच्या साहाय्याने त्यातील उर्जेतील बिघाड शोधला जातो व नंतर दूरस्थ पद्धतीने रुग्णावर उपचार करताना, उर्जेतील हा बिघाड नाहीसा करून संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो. अ‍ॅलर्जी, दमा, सांधेदुखी अशा विविध व्याधी विकारांवर या पद्धतीने उपाय करता येतात असे या पद्धतीचा अवलंब करणारे उपचारक दावा करतात. अर्थात आजही आधुनिक वैद्यकाला रेडिऑनिक्सचे हे सिद्धान्त पचनी पडणे कठीणच!
मानवातील, किंबहुना सजीवातीलच, ‘चेतना’ हा नेहमीच गुंतागुंतीचा (व म्हणूनच गूढ!) विषय मानला गेला आहे. ही चेतना शरीरात नेमकी कोठून उद्भवते, ती शरीरात कशी ‘खेळते’, ती मोजता येते का, निरोगी स्थितीत व रोगावस्थेत तिची पातळी वेगवेगळी असते का, बाह्य यंत्रांनी ही ऊर्जा मोजून, शरीरांतर्गत रोगाचे नेमके निदान करता येते का व बाह्ययंत्रांनी त्या उर्जेचे परत संतुलन साधता येते का, हे व असे अनेक प्रश्न आज तरी (बऱ्याच प्रमाणात) अनुत्तरीत आहेत असे म्हणावयास हरकत नाही. भविष्यात काय आहे कोणास ठाऊक?

Metamorphic Therapy
metamorphic technique testimonials
metamorphic technique youtube
metamorphic technique practitioners
benefits of metamorphic technique
metamorphic technique training
metamorphic technique courses
metamorphic technique london
metamorphic technique for babies

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...