Saturday, August 19, 2017

what is reiki and how does it work

सर्वसाधारणपणे उपचार म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर गोळ्या, औषधे, शल्यक्रिया, मसाज, लेप, व्यायाम, आहार-विहाराची पथ्ये, किरणोपचार, मानसोपचार, समुपदेशन या व अशा काही ठोस गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण कोणी नुसते आपले हात हातात घेऊन किंवा स्पर्श करून किंवा शरीराभोवती काही हातवारे करून आपल्याला बरे करतो म्हणाला तर आपल्याला निश्चितच चमत्कारीक वाटेल. वरवर विचित्र व चमत्कारीक भासणाऱ्या, आधुनिक वैद्यकाची निश्चित शास्त्रीय बैठक शोधू पाहणाऱ्या अशा काही चिकित्सा व उपचारपद्धतींचा गट म्हणजे उर्जावैद्यक?
आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधू पाहणाऱ्या सर्व शास्त्रांनी, तत्त्वज्ञानांनी, विज्ञानाने व वैद्यकाने एक गोष्ट निश्चितपणे मान्य केली आहे व ती म्हणजे सजीव व निर्जिव किंवा चेतन व अचेतन यामधील निश्चित फरक म्हणजे चेतना, चैतन्य किंवा उर्जा! वेगवेगळ्या शास्त्रात तिचे नामानिधान बदलते. उदा. आधुनिक विज्ञान व वैद्यकात ‘ऊर्जा’ (Energy), जुन्या वैद्यकात ‘जीवनशक्ती’ (Lifeforce), योगशास्त्रात ‘प्राणशक्ती’, चीनी वैद्यकात 'chi', होमिओपथीत 'Vital Force' इ. इ. परंतु मूळ वैचारिक बैठक सारखी आहे. या उर्जेमुळे अचेतन, चेतन होते व मृत्यूसमयी या चेतनातून उर्जा नाहीशी होते व ते परत अचेतन होते. चेतनाची अवस्था बिघडली, असंतुलन झाले की, आपण ‘रोग’ झाला असे म्हणतो. हा ‘रोग’ नाहीसा करण्याकरिता सर्वसाधारण पारंपरिक वा आधुनिक वैद्यकपद्धतीवर उल्लेखिल्याप्रमाणे काहीतरी हास्य व ठोस (Tangible) अशा पद्धती वापरतात, थोडक्यात बहुतांशी वेळा त्यातील ‘अचेतन’ वा ‘द्रव्य’ (Matter) भागावर उपचार करतात व त्यातून ‘चेतन’ दुरुस्त होईल अशी अपेक्षा ठेवतात. ‘उर्जा’ वैद्यक या ‘चेतना’तील उर्जेवर उपचार करण्याचा दावा करतात व त्यातून ‘चेतन’ दुरुस्त होतो, रोगनिवारण होते असे म्हणतात.
उर्जावैद्यकापुढची आजची मोठी समस्या म्हणजे या उर्जेचे ठोस स्वरूप दाखविणे, ‘रोगट’स्थितीत या उर्जेच्या पातळीत वा रचनेत बदल होतो असे सिद्ध करणे व उपचारपद्धतीनी ही पातळी व रचना ठीक होते व रोग नाहीसा होतो हे सिद्ध करणे आणि हे सर्व आधुनिक विज्ञानाचे निकष लावून! आजच्या घटकेला तरी या सर्व गोष्टी ‘धूसर’ आहेत; पण ‘धूसर’ आहेत म्हणून त्या ‘नाहीत’ असे म्हणणे म्हणजे वैचारिक काठिण्य होय. योगशास्त्रात ‘प्राण’शक्ती गृहीत धरून; चीनी वैद्यकात ही जीवन उर्जा,‘ची’ शरीरातून विविध मार्गानी प्रवाहित होते (Meridians) व त्यात अडथळा आल्यास विविध रोगांची निर्मिती होते हे गृहित धरून त्यावर दाब देऊन (Acupressure), सुया टोचून (Acupressure) वा मॉक्सा वनस्पती जाळून (Moxibustion) हा खंडीत प्रवाह ठीक करून; किर्लिऊन फोटोग्राफीने शरीराभोवतालच्या आभेचे (Aura) चित्रण करून, रोगामुळे त्यात होणारे बदल जाणून घेऊन त्यानुसार उपचार केले जातात; शरीराचे विद्युतचुंबकीय पातळीवरील अस्तित्व मान्य करून, रोगस्थितीत त्यात बदल होतात व ते काही विशिष्ट उपचारांनी ठीक होतात असे गृहित धरून तशी उपचारपद्धती वापरली जाते; हे सर्व उर्जावैद्यकाचे विविध आयाम होत. विविध उर्जावैद्यक (Energy Medicine) उपचारपद्धतींचे या लेखात आपण विहंगावलोकन करणार असून पुढे त्यातील काही प्रसिद्ध उपचारपद्धती खोलात जाऊन पाहणार आहोत.
उर्जा वैद्यकाच्या विविध पद्धती :
या सर्व उपचार पद्धतींप्रमाणे प्रमुख सूत्र म्हणजे शरीरात जीवनउर्जा खेळती असते, तिचे असंतुलन झाले की, रोग निर्मिती होते, या उर्जेचे परत संतुलन साधले की आरोग्यप्राप्ती होते. हे संतुलन साधण्याकरिता स्पर्शाचा वापर करणाऱ्या Touch Technique किंवा न करणाऱ्या Nontouch Technique किंवा Absentia अशा दोन प्रमुख गटात या पद्धतींची विभागणी केली जाते. वेगवेगळ्या पद्धती उर्जेच्या वेगवेगळ्या आयामांवर लक्ष केंद्रीत करताना दिसतात. उदा. आभा (Aura), चक्र (Chakra), मेरिडियन यंत्रणा (Meridian System), जीवनउर्जाक्षेत्र (Human Energy Field) इ. या विविध उपचारपद्धती खालीलप्रमाणे-
१. रेकी (Reiki)- रे म्हणजे वैश्विक, की म्हणजे जीवनउर्जा. आपली जीवन उर्जा ही वैश्विक उर्जेचाच एक भाग असून, बिघडलेली जीवनउर्जा ठीक करण्याकरिता वैश्विक उर्जा वापरली जाते ती उपचारकाच्या माध्यमातून. यात स्पर्श (Touch) किंवा विनास्पर्श (Distant Reiki) अशा दोन्ही पद्धती असून, जपानमधील डॉ. मिकाओ उसुई यांनी ही पद्धत प्रथम प्रचलित केली.
२. मेरिडिअन टॅपिंग (Meridian Tapping)- नकारात्मक भावनांनी शरीरातील जीवनउर्जेच्या प्रवाहात निर्माण होणारे अडथळे यात दूर केले जातात. त्याकरिता एखादी नकारात्मक भावना. उदात. क्रोध, द्वेष, मत्सर, वैफल्यग्रस्तता इ. घेऊन त्यावर लक्ष केंद्रीत करून ती घालविण्याचा तसेच तिच्या जागी एखादी सकारात्मक भावना, उदा. प्रेम, आशा, कणव इ. स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो.
३. अ‍ॅक्युपंक्चर- याविषयी पूर्वी एका लेखात सविस्तर माहित दिली आहेच.
४. कोलाईम्नि (Koloimni)- यात शरीराच्या विद्युतचुंबकीय क्षेत्रावर, स्पर्श न करता काम केले जाते. शरीराच्या बाहेर अर्धा ते एक इंचावर या पद्धतीत छोटे छोटे धक्के 'strokes' दिले जातात. या पद्धतीला ‘इथेरीक मसाज’ (Etheric Massage) असेही म्हणतात.
५. ‘शारीरसंवाद’ पद्धत (Body Talk Therapy)- आपल्या शरीराजवळ स्वत:ला बरे करण्याचे शहाणपण व सामथ्र्य आहे. या मूलभूत तत्त्वावर ही पद्धत आधारित आहे. चेतास्नायू आधारित जैवप्रतिज्ञापन तंत्राप्रमाणे हे तंत्र वापरले जाते. यात उपचारक शरीरातील बिघडलेली उर्जाचक्रे (Energy Circuits) शोधतो व त्यावर उपचार करतो.
६. प्राणिक हिलिंग (Pranic Heling)- यात उपचारक प्रथम रुग्णाची आभा किंवा उर्जाक्षेत्र तपासतो, त्यात कोठे अडथळा आहे ते जाणून घेतो व नंतर आपल्या हाताच्या तळव्यातील उर्जाचक्राच्या माध्यमातून, जीवनउर्जा, रुग्णामधील बिघडलेल्या भागात संक्रमित करतो; या प्रकारे तेथे साफसफाई होऊन तो भाग पुन्हा चैतन्यमय होतो, असे हे शास्त्र मानते.
७. मॅट्रिक्स एनर्जेटिक्स (Matrix Energetics)- यात स्पर्शाने प्रथम समस्याप्रधान भाग शोधला जातो व नंतर स्पर्श आणि बरे करण्याचा उद्देश एकत्रित करून हे परिवर्तनीय उपचार 'Transformational Healing' केले जातात.
८. टाँग रेन थेरपी (Tong Ren Therapy)- ही एक दूरस्थ उपचारपद्धती असून यात रुग्ण निर्देशक अशी एक ‘अ‍ॅक्युपंक्चर डॉल’ असते व उपचारक तिच्यावर लक्ष केंद्रित करून रुग्णोपचार करतो.
९. अमाडय़ूस (Ama Deus)- स्पर्श तसेच विनास्पर्श अशा विविध तंत्रांचा अवलंब करून यात द्विस्तरीय पद्धतीने उपचार केले जातात. अध्यात्मिक उन्नतीकरिता व ‘भान’ आणण्याकरिता प्रामुख्याने या उपचारपद्धतीचा वापर केला जातो.
१०. ह्यूना (HUNA)- हवाई भाषेत याचा अर्थ ‘रहस्य’ असा होतो. आपल्या शरीरात स्वत:ला बरे करणारे असे एक उच्चस्तरीय वैश्विक शहाणपण आहे. या मूलभत तत्त्वावर ही पद्धत आधारित असून, मानसिक शक्तींच्या साहाय्याने या पद्धतीत ‘शरीरांतर्गत शहाणपणाशी’ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो.
११. क्वांटम टच् (Quantum Touch)- यात स्पर्श, श्वसन नियंत्रण तसेच ‘शारीरभान आणणारे ध्यान’ या तिन्ही गोष्टींचा वापर केला जातो. याला ibrational Touch Therapy  असेही संबोधण्यात येते.
१२. चिऑस एनर्जी हिलिंग (Chios Energy Healing)- स्टीव्ह बॅरेटने लोकप्रिय केलेल्या या पद्धतीत उर्जा चक्रांची ताकद वाढविणे, त्यांचे संतुलन साधणे, सातस्तरांवर उपचार इ. गोष्टींचा अंतर्भाव होतो.
१३. जोहरी हिलिंग (Johrei Healing)- हे एक जपानी तंत्र असून यात नकारात्मक स्थिती घालविण्याचा प्रयत्न केला जातो.
१४. लाँजेविटॉलॉजी (Longevitology)- चीनी फिजिशियन लोन झिआँग व अन्य काही जणांनी हे तंत्र विकसित केले असून यात उर्जाचक्रांचे संतुलन साधण्यावर भर दिला जातो.
या सर्व उपचारपद्धतींना आधुनिक वा पारंपरिक वैद्यकाची मान्यता मिळावयास आणखी काही वर्षे तरी जातील, असे आजच्या स्थितीवरून वाटते.

reiki healing
what is reiki healing used for
what is reiki and how does it work
reiki healing near me
how to do reiki
what is reiki good for
reiki benefits
reiki emotional healing

reiki healing symbols

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...