आपल्या जीवनात ‘रंग’ नसते तर ते केवळ कृष्ण-धवल असते तर? नुसत्या कल्पनेनेही अस्वस्थ व्हायला होते! रंग, हे केवळ आपल्या विचारांशी, भावनांशी वा ‘मूड’शीच निगडित नसून, ते आपल्या अस्तित्वाशीच जोडलेले आहेत का? किती सहजगत्या भावनांच्या अभिव्यक्तीत आपण रंगांचा वापर करतो? तो रागाने ‘लाल’ला, घाबरून ती ‘पांढरीफटक’ पडली, I am feeling `Blue' किंवा He was `Green' with envy! इतक्या सहजतेने आपल्या जीवनात उतरलेले हे रंग, त्यांचाच वापर कोणी उपचारांमध्ये करू लागले तर? वरकरणी अशक्य वाटणारी ही गोष्ट वास्तवात मात्र खरी आहे आणि रंगोपचारांना Colour Therapy अथवा Chromotherapy ला) चक्क हजारो वर्षांचा इतिहास आहे.
इतिहास - इजिप्तमध्ये प्राचीनकाळी रंगांच्या मोठमोठय़ा कुंडांत, रुग्णांना बसवून उपचार केले जात असत तर काही वेळा खोलीला रंगीत काया बसवून, आत झिरपणाऱ्या रंगीत प्रकाशाने (खोलीत रुग्ण व्यक्तीला उभे करून) रंगस्नान घातले जात असे. आपल्या आयुर्वेदात व खासकरून अथर्ववेदातही रंगचिकित्सेचे उल्लेख येतात. आज तर ‘सूर्यभारीत जल’, ‘रंगश्वसन’, ‘रंगध्यान’, ‘रत्नरंग चिकित्सा’ अशा विविध पद्धतीनी ही चिकित्सा विकसित झाली आहे.
बैठक : आधुनिक वैद्यकाची या चिकित्सेला मान्यता नसली तरी रंग चिकित्सकांच्या मते या उपचारपद्धतीला एक निश्चित शास्त्रीय बैठक आहे व ती अशी- प्रत्येक रंगाला स्वत:ची अशी स्पंदनाची वारंवारिता आहे. (Vibration with a frequency) आपले शरीर ज्या लक्षावधी पेशींनी बनले आहे त्या प्रत्येकीला स्वत:ची अशी स्पंदन वारंवारिता आहे. ही पेशीसमूहांची स्पंदने ‘आरोग्या’स्थितीत संतुलित अवस्थेत असतात व ही स्पंदने काही अंतर्गत वा बाह्य कारणाने बिघडली, की ते ते पेशीसमूह व उती, असंतुलित अर्थात ‘रोगट’ स्थितीत जातात.
एखाद्या विशिष्ट रंगाच्या वापराने ही असंतुलित स्पंदने, संतुलित स्थितीत आणली जातात. आरोग्य निर्मिती होते. बिघडलेल्या उतींनुसार (रोगानुसार), योग्य रंगांची निवड हे तज्ज्ञ रंगोपचारकाचे काम असते. एवढेच नव्हे तर रंगाचा डोस ही योग्य असावा लागतो, नपेक्षा त्यापासून हानी संभवते. कारण प्रत्येक रंगाला सकारात्मक व नकारात्मक अशा दोन बाजू असतात. उदा.- लाल रंग शैथिल्य, नैराश्य दूर करतो, पण त्याचा अतिवापर व्यक्तीला अस्वस्थ व आक्रमक बनवू शकतो. आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे प्रत्येक रंगाला एक पूरक रंगही असतो व दोघांच्या योग्य मिश्रणाने संतुलन साधले जाते.
योगशास्त्राप्रमाणे आपल्या शरीरात मेरुदंडामध्ये (Spinal card) सात प्रमुख ऊर्जाचक्रे आहेत. येथून शरीरातील सर्व चेतनेचे नियंत्रण होते. या सात चक्रांना रंगोपचारशास्त्रानुसार सात अधिष्ठाते ‘रंग’ बहाल केले आहेत व त्या त्या रंगांचा वापर, ते ते ऊर्जाचक्रे संतुलित करण्याकरिता होतो, अशी त्यांची धारणा आहे. (पाहा सोबतचा तक्ता ) रंगोपचारशास्त्रानुसार प्रत्येक ‘रंगाची’ आपली अशी एक प्रकृती आहे, ओळख आहे, गुणधर्म आहेत. सप्तरंग व त्यांचे गुणधर्म जे उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते पुढीलप्रमाणे आहे.
लाल (तांबडा)- हा रंग जोश, जोर, जोम, ताकद, सृजनशीलता, उत्साह दर्शवितो. अशा रंगांकडे स्वाभाविकपणे आकृष्ट होणाऱ्या व्यक्ती या जन्मजात नेतृत्व करणाऱ्या, ताबडतोब जबाब देणाऱ्या व अतिसंवेदनशील अशा असतात. या रंगाचा वापर नैराश्य, मंदत्व, शारीरिक जडता दूर करण्याकरिता होतो. या रंगाचा अतिवापर रुग्ण अस्वस्थ, आक्रमक व रागीट होण्यात होतो व म्हणून याचा वापर हृदयविकारांवर उपचार करताना टाळला जातो.
नारिंगी - लाल रंगाप्रमाणेच हा ऊर्जा देणारा रंग आहे. एकाकी माणसाचे मनोबल वाढावयास हा रंग मदत करतो; पण अतिवापर लाल रंगाप्रमाणेच धोकादायक आहे. पित्ताशयातील खडे, पचनाच्या तक्रारी, छातीचे विकार, सांधेदुखी इ.वर हा रंग उपयुक्त आढळून आला आहे.
पिवळा - तेजस्वी, लखलखत्या व्यक्तिमत्त्वांचा हा रंग आहे. तो बौद्धिक उत्तेजना देणारा रंग असून, उत्साहवर्धक आहे; पण अतिवापर नैराश्य निर्माण करणारा व काहीसा दमणूक करणारा आहे. याचा वापर पचनविकारात व त्वचेच्या विकारात होतो तर तणावग्रस्त व्यक्तींत याचा वापर टाळला जातो.
हिरवा - हा रंग संतुलन, आशा, समत्व यांचा निर्देशक आहे. यातील पिवळ्या छटेकडे आकृष्ट होणारी माणसे ही स्वभावत: धाडसी असतात तर निळ्या छटेकडे आकृष्ट होणारी माणसेही आशावादी असतात असे दिसून आले आहे. याचा अतिवापर आत्मसंतुष्टता व शैथिल्य निर्माण करतो. ताणतणाव कमी करण्याकरिता, हृदयविकारांवर व उतींच्या पुननिर्माणाकरिता या रंगाचा वापर करण्यात येतो. गर्भिणी परिचर्येतही याचा वापर करावा, असे रंगोपचारक सुचवितात.
निळा - हा रंग सत्य, उदात्तपणा, प्रसन्नता यांचा निर्देशक आहे. झोपण्यापूर्वी या रंगाचे ध्यान केल्यास भीतीदायक स्वप्ने पडणे कमी होते, असे रंगोपचारशास्त्राचे म्हणणे आहे. भीती, नैराश्य, अगतिकता कमी करण्याकरिता या रंगाचा वापर सुचविलेला आहे, तसेच याच्या योग्य वापराने रक्तस्राव, वेदना, ताप कमी होतात, असा रंगोपचारकांचा दावा आहे. अर्थात याच्या अतिवापराने माणूस दु:खी व अति‘थंड’ होण्याचा धोका असतो.
पारवा - हा थोडा ‘गूढवादी’ रंग असून, तो बौद्धिक उत्तेजना देणारा, धैर्यशील, अंतरिक शांती व सत्ता प्रस्थापित करणारा असा आहे. त्याच्या अतिवापराने डोकेदुखी उद्भवते व झोपाळूपणातही वाढू शकतो. याचा वापर रक्तशुद्धीकरिता, नाक-कान-घशाच्या विकारांवर, तसेच नेत्रविकारांवर केला जातो. काही त्वचाविकार, तसेच व्हेरिकोज व्हेन्स इ.वरही तो वापरला जातो.
जांभळा - हा रंग सृजनशीलतेशी निगडित आहे. भावनोद्रेकावर उपचार म्हणून या रंगाचा वापर केला जातो. कलाकारांची सृजनता फुलविणारा हा रंग आहे. म्हणूनच बहुधा बियोवेन आपल्या घरात या रंगाच्या पडद्यांचा वापर करीत असे व लिओनार्दो दा विंची या रंगाचे ध्यान करीत असे!
रंगाची नेमकी निवड कशी करतात? - याकरिता विविध पद्धतींचा वापर केला जातो. काही वेळा सात रंगांची वेगवेगळी कार्डस् देऊन त्यातून तुम्हाला सगळ्यात जास्त भावणाऱ्या तीन कार्डाची निवड करण्यास सांगण्यात येते. हे तीन रंग तुमची भावनिक, मानसिक व शारीरिक सद्य:स्थिती दर्शवितात व मग त्यानुसार रंगांची निवड केली जाते. काही रंगोपचारक तुमच्या ऊर्जाचक्रांचा किंवा ऊर्जावलयांचा (Aura) अभ्यास करतात व त्याकरिता काही वेळा डाऊसिंग (Dowsing) या तंत्राचा अवलंब करतात. तुमच्या चक्रात वा वलयात ज्या रंगाची कमतरता असेल, तो रंग नंतर उपचारात वापरला जातो.
रंगांचा वापर नेमका कसा करतात? - याकरिता विविध तंत्रांचा वापर केला जातो. उदा.- १) रंगीत बल्बच्या साहाय्याने प्रकाश सोडणे २) रंगीत प्रकाशात, प्रकाशस्नान करणे ३) संमोहनाखाली विशिष्ट रंग ‘बघणे’ ४) रंगीत पारदर्शक काचेच्या पेल्यात पाणी ठेवून ते सूर्यप्रकाशाने भारित करणे व मग ते पिण्याकरिता वापरणे. ५) कपडे, खायचे अन्न व भोवतालच्या वातावरणात, त्या त्या रंगांचा वापर करणे. ६) रंगश्वसन (Colour Breathing) ७) रंग ध्यान (Colour Meditation) ८) रत्नांच्या साहाय्याने शरीराच्या विशिष्ट भागांवर विशिष्ट रंगाचा मारा करणे. काही वेळा याकरिता अॅक्युपंक्चर बिंदूंचाही वापर केला जातो. ९) अन्य पर्यायी वैद्यक तंत्रांसोबत उदा. रिफ्लेक्सॉलॉजी, बारवपुष्पौषधी इ. बरोबर
रंगोपचारांचे भविष्य : आज जगात (विशेषत: युरोप, अमेरिकेत) हजारो जण रंगोपचारांचा उपयोग करीत असले तरी आधुनिक विज्ञान व वैद्यकशास्त्र या सर्व गोष्टींकडे साशंकतेने पाहत आहे. रंगोपचारांची शास्त्रीय बैठक सुस्पष्ट नाही व त्यात अनेक गोष्टी वस्तुनिष्ठ (Objective) नसून व्यक्तीसापेक्ष (Subjective) आहेत, असे निदर्शनास येते. अर्थात याकरिता या क्षेत्रात संशोधनास भरपूर वाव आहे. आधुनिक तंत्र विज्ञानामुळे अनेक गोष्टी पडताळून पाहणे शक्य हे व म्हणून एक सर्वमान्य, ठोस उपचारपद्धती म्हणून रंगोपचारांना स्थान मिळण्याकरिता, सखोल संशोधनाची आवश्यकता आहे, असे सुचवावेसे वाटते.
color therapy
colour therapy chart
colour therapy treatment
how to use color therapy for healing
how does colour therapy work
colour therapy meanings
colour therapy for depression
how to do color therapy
colour therapy for weight loss

No comments:
Post a Comment