Cymatics healing
त्याचा जन्म खरे म्हणजे सॅमोस या ग्रीक बेटावर झाला; पण त्याचे प्राथमिक शिक्षण दक्षिण इटलीमधील क्रोटोन येथे झाले; पण इजिप्तमध्ये जावे लागले. तेथेच त्याच्या गणिती बुद्धीला व विशेषकरून भौमितिक प्रज्ञेला धुमारे फुटले व त्याने आपला जगप्रसिद्ध सिद्धान मांडला. पुढे तो परत क्रोटोनमध्ये आला व त्याने विद्यार्थ्यांकरिता (मुले व मुलीसुद्धा!) एक गुरुकुल काढले.
पाश्चात्त्य विचारसरणीवर खोलवर परिणाम साधणारे तत्त्वज्ञान म्हणजे ग्रीक तत्त्वज्ञान व ग्रीक तत्त्वज्ञानाचे तीन अध्वर्यू म्हणजे अॅरिस्टॉटल, सॉक्रेटीस आणि लिटो. यापैकी प्लेटोवर वर उल्लेखिलेल्या महानुभवाचा खूप प्रभाव होता. हा महानुभव दुसरा तिसरा कोणी नसून ‘पायथागोरस’ होय! पायथागोरसला (*ख्रिस्तपूर्व ५८२ ते ५०७) भूमितीव्यतिरिक्त अध्यात्मातही गती होती, त्याकाळातही तो स्त्री-शिक्षणाचा खंदा पुरस्कर्ता होता. त्याची मुलगी व शिष्या थेन्नो (ळँील्लल्ल) ही गणिती होती व तिने गणित, विज्ञान, मानसशास्त्र आणि वैद्यकावरही अनेक पुस्तके लिहिली असे म्हणतात.
याच महाप्रज्ञ पायथागोरसने ध्वनीचा, संगीताचा आणि मानवी शरीरमनाचा संबंध दाखवून दिला व त्यानेच पाश्चात्त्य जगतात ध्वनी आणि संगीताचा प्रथम उपचारपद्धती म्हणून उपयोग केला, असे मानले जाते.
आपल्याकडेही ध्वनिशास्त्र, संगीत आणि त्यांचा मानवी शरीरमनावर होणारा परिणाम यांचा बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे व होतही आहे. वैदिकशास्त्रातील गौतमेय तंत्रात म्हटल्याप्रमाणे स्वरशक्ती अनंत आहेत व त्या आकाशाप्रमाणे सर्वकामी आहेत. ध्वनी व संगीत हे चराचरात भरलेले आहेत. पेशींच्या हालचालींपासून ते सजीवांच्या आकुंचन, प्रसरण, हालचाल या सर्वातही लय, कंपने, व ताल असतो. साहजिकच संगीताचा उपयोग (ज्या संगीताचे मूळ घटक नाद, लय व संवादीतत्त्व आहेत!) उपचारपद्धती होऊ शकतो हे पूर्वसुरींच्या केव्हाच लक्षात आले व त्यातूनच ‘संगीतोपचार’ पद्धतीचा जन्म झाला. वाग्भट, चरक, सुश्रुत इ. संहिता, तसेच गरुड पुराणातही ‘संगीत चिकित्से’चे उल्लेख आहेत; पण संगीत चिकित्सेत वापरली जाणारी ध्वनीऊर्जा ही ऐकण्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते तर येथे आपण ज्या तंत्राचा विचार करणार आहोत त्या ‘सायमॅटिक’मध्ये ही ऊर्जा थेट आपल्या शरीरात टय़ुनिंग फोर्क किंवा यंत्रांच्या माध्यमातून सोडली जाते व त्यातून आरोग्यदायी परिणाम साधला जातो.
इतिहास- वर उल्लेखिल्याप्रमाणे पायथागोरसने जरी प्रथम संगीताचा उपयोग उपचारपद्धती म्हणून होऊ शकतो हे दाखवून दिले असले तरी पुढची जवळजवळ १२००-१३०० वर्षे त्यात फारशी प्रगती झाली नाही. इ. स.च्या आठव्या शतकात जर्मन शास्त्रज्ञ अर्न्स्ट क्लॅडनी (Ernst Chladni) याने ध्वनीचा द्रव्यावर परिणाम होतो हे प्रथम दाखवून दिले. वाळू पसरलेल्या धातूच्या पट्टीवर एका बाजूस धनुकलीने स्पंदने निर्माण केली तर वाळूत विविध भौमितिक आकार तयार होतात हे त्याने प्रयोगांती सिद्ध केले. पुढे सन १९६० मध्ये स्विस शास्त्रज्ञ डॉ. हॅन्स जेनी (Dr. Hans Jenny) याने वाळू, विविध द्रवपदार्थ, पावडरी व धातूच्या पट्टय़ांचा आणि कंपने निर्माण करणाऱ्या विविध यंत्रांचा वापर करून हाच परिणाम परत सिद्ध केला. त्यानेच या परिणामाचे वर्णन करण्याकरिता प्रथम ‘सायमा’ या शब्दाचा वापर केला. (मूळ ग्रीक शब्द Kyma' ज्याचा अर्थ आहे मोठी लहर किंवा मोठा तरंग) याच सुमारास (सन १९५० ते ६० च्या दरम्याने) पॅरिसमधील प्रो. गॉव्ह (Prof. Gauvou) जर्मनीतील डॉ. ब्रौना, येल विश्वविद्यालयातील डॉ. हॅरॉल्ड एस. र्ब (Dr. Harold S. Burr) इ. शास्त्रज्ञ या विषयाच्या अभ्यासात गुंतले होते. या सर्वाच्या संशोधनाचा तौलनिक अभ्यास करून ब्रिटिश वैद्यकतज्ज्ञ आणि ऑस्टिओपाय डॉ. पीटर मॅनर्स (Dr. Peter Manners) यांनी प्रथम १९६० च्या दरम्याने सायमॅटिक्स (Cymatics) हे उपचारतंत्र म्हणून रूढ केले. आरोग्यदायी असे ध्वनीतरंग शरीरात थेट सोडण्याकरिता डॉ. पीटर मॅनर्सनी प्रथम Mark 1‘ हे यंत्र विकसित केले. पुढे त्याचाच विकास होऊन ते Mark 6‘ मध्ये परिणत झाले.
‘सायमाथेरपी (R) इंटरनॅशनल’ची विद्यमान अध्यक्षा मँडारा क्रॉमवेल Mandara Cromwell) ही सन २००१ च्या सुमारास प्रथमडॉ. पीटर नॅनर्सना भेटली. पुढे २००२ साली या थेरपीची धुरा डॉ. मॅनर्सनी मँडारा क्रॉमवेल यांच्याकडे सोपविली. त्यांनीच पुढे ‘सायमा १०००’ या अत्याधुनिक तरंग जनित्राची निर्मिती केली. त्यातून जवळजवळ ९०० आरोग्यदायी तरंगांची निर्मिती होते.
बैठक - प्रत्येक सजीवाच्या भोवती त्याचे स्वत:चे असे एक ऊर्जाक्षेत्र असते व याला स्वत:ची अशी एक तरंग वारंवारिता (Wave Frcquency) असते, असे हे शास्त्र मानते. शरीरातील पेशींना स्वत:च्या अशा ध्वनीवारंवारिता (Saind frequencies) असतात व त्या ‘आरोग्य’ स्थितीत व ‘रोगट’ स्थितीत वेगवेगळ्या असतात. रोगट स्थितीतील बदललेले तरंग, यंत्रांच्या साहाय्याने शरीरात आरोग्यदायी तरंग (ज्यांचे पेशींच्या आरोग्यदायी स्थितीतील तरंगांशी साम्य असते.) सोडून, पेशींना रोगनिवारणाच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण केले जाते. या पोषक वातावरणामुळे नैसर्गिकरीत्या, रोगट पेशी बऱ्या होतात व रोगी रोगमुक्त होतो, असा या शास्त्राचा सिद्धान्त आहे.
नेमके काय केले जाते?- ‘सायमॅटिक्स’ उपकारक शरीराच्या विविध भागातील रोगग्रस्त पेशींना ठीक करण्याकरिता विविध वारंवारितेचे तरंग निर्माण करणारी यंत्रे वापरतात. सुरुवातीस ही यंत्रे खूप मोठी असत; पण आता छोटय़ा ब्रीफकेसमध्ये मावतील एवढी ती छोटी असतात. हातात धराव्या लागणाऱ्या एखाद्या अॅप्लिकेटरने किंवा पेन्सिलच्या आकाराच्या, शरीरावर चिकटवून ठेवता येण्याजोग्या ‘सायमॅटिक प्रोब्स’च्या माध्यमातन शरीराच्या विशिष्ट रोगग्रस्त भागात या विशेष ध्वनीलहरी सोडल्या जातात. सायमॅटिक्स उपचारक उपलब्ध विविध सुमारे ९०० तरंगांमधून, रोगानुसार व (काही वेळा चुंबकलहरींसोबत) पेशींनुसार, विशिष्ट तरंगांची निवड करतो व नेमक्या त्याच ध्वनीलहरी शरीराच्या रोगग्रस्त भागात सोडतो. काही वेळा या ध्वनीलहरी अॅक्युप्रेशर बिंदूतून किंवा अॅक्युपंक्चर बिंदूवर, अॅक्युपंक्चर सुई टोचून तिच्या माध्यमातूनह शरीरात सोडल्या जातात. रोगानुसार या लहरींचा वापर ३० ते६० मिनिटे इतका वेळ केला जातो. किती दिवस या प्रकारच्या उपचारांचा वापर आवश्यक ठरेल हे सांगणे तसे कठीण असते. सुरुवातीस साधारणपणे आठवडय़ातून दोनदा व पुढे पुढे आठवडय़ातून एकदा अशा पद्धतीने हे उपचार केले जातात.
संधीवात वा अन्य सांध्यांच्या विकारांवर जलोपचार (Hydro therapy) उपयुक्त ठरतात हे भौतिकी उपचार पद्धतींनी सिद्ध झालेलेच आहे. ध्वनीलहरींनी पाण्याची रेण्वीय रचना बदलता येते या तत्त्वाचा वापर करून या क्षेत्रातील काही उपचारकांनी आता या दोन्ही उपचार पद्धतींचा मेळ घालून ‘अॅक्वासॉनिक्झ’ (Aquasonics) अशा एका नव्या उपचार पद्धतीस जन्म दिला आहे. यात वातानुकूलित इमारतीमधील गरम तरण तलावाचा (Heated Pool) वापर केला जातो, ज्यात रुग्ण व्यक्ती साधारण २० मि. पोहोतो वा हालचाल करते. अत्यंत आरामदायी असा हा वेगळाच अनुभव असतो. अर्थात हे सर्व उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय बिलकुल करू नयेत.
कोठे उपयुक्त? -या थेरपीमुळे शरीरातील वेदना व सूज कमी होण्यास मदत होते व त्यामुळे साहजिकच हालचालींत सहजता येते. म्हणूनच विविध प्रकारचे सांध्यांचे विकार, संधीवात, पाठदुखी, शल्यक्रियेनंतर एखादा भाग आखडणे, नीट न भरून येणारे अस्थिभंग, खेळांमुळे होणाऱ्या दुखापती, स्नायूंचे विकार इ.वर ही उपचारपद्धती बऱ्यापैकी परिणाम साधते असे या शास्त्राचे अभ्यासक म्हणतात. आधुनिक विज्ञानामध्ये ध्वनीलहरींचा वापर उपचारपद्धती म्हणून केला जात असला (उदा. ध्वनीलहरींच्या माध्यमातून मूतखडय़ांवर उपचार इ.) तरी जी सैद्धांतिक भूमिका ‘सायमॅटिक्स’ हे शास्त्र मांडू पाहते ती आजतरी आधुनिक वैद्यकात मान्य आहे, असे दिसत नाही. या सर्वच बाबींकडे आधुनिक वैद्यक संशयाच्या दृष्टीने पाहते असे चित्र दिसते. अर्थात आज ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जपान व ऑस्ट्रेलिया, तसेच अन्य युरोपीयन देशात ‘सायमॅटिक्स’ उपचार केंद्रे मोठय़ा प्रमाणात आहेत व ती लोकप्रियही आहेत.
भविष्यकाल- ऊर्जा उपचारपद्धतींचे वाढते महत्त्व पाहता, भविष्यात ‘सायमॅटिक्स’ ही अधिकाधिक वापरले जाईल, अशी चिन्हे आहेत. अर्थात या विषयावर अधिक व्यापक व अधिक सखोल संशोधन आवश्यक आहे, असे सुचवावेसे वाटते.
cymatics music therapy
cymatic therapy side effects
ami 750 for sale
cyma 1000 for sale
cymatic therapy instruments
cymatics definition
cymatherapy machine for sale
cymatics healing
cymatics experiments
No comments:
Post a Comment