Hypnotherapy
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये मायामि येथे राहणारे, प्रख्यात खेल विश्वविद्यालय वैद्यकीय शिक्षण घेतलेले, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ब्रायन वेस यांचे त्यांच्या कॅथरीन नावाच्या रुग्ण स्त्रीवर आधारित `Many Lives many masters' नावाचे पुस्तक सन १९९८ मध्ये प्रकाशित झाले आणि त्याने अमेरिकेतच नव्हे तर जगभर खळबळ उडवून दिली. या महिलेवर तिच्या भीती, नाहक चिंता इ. लक्षणांवर डॉक्टर, संमोहनाच्या माध्यमातून उपचार करीत होते. ते करीत असताना, तिचे प्रतिगमन (Regression) होऊन ती तिच्या अगदी लहानपणीच्या व त्याहीपुढे जाऊन, पूर्वजन्मीच्या (व केवळ एकाच नव्हे तर अनेक!) आठवणी सांगू लागली व त्यातच तिच्या या जन्मातील मानसिक लक्षणांची बीजे होती व त्यावर उपचार करताच, ही लक्षणे दूर झाली असा दावा डॉक्टरांनी केला. त्यानंतर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजतागायत त्यांनी सुमारे ४००० रुग्णांचे या पद्धतीने विश्लेषण करून त्यावर उपचार केले आहेत. या विषयावर डॉक्टरांनी आतापर्यंत सात पुस्तके लिहिली असून, अमेरिकेतील अनेक सुप्रसिद्ध टेलिव्हिजन शोजमध्ये उदा. ऑपराह, लॅरिकिंग लाइव्ह, २०/२० इ. डॉक्टरांच्या असंख्य मुलाखती झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर सुप्रसिद्ध कोलंबियन गायक, शाकिरा हिने आपल्या `No Creo' या गाण्यात चक्क त्यांचा उल्लेखही केला आहे. अर्थात डॉक्टरांचे हे स्पष्टीकरण सगळ्यांच्याच पचनी पडले आहे, असे नव्हे. वैद्यकीय क्षेत्रात तर त्याला नकारघंटाच अधिक आहे. कै. डॉ. इयान स्टिव्हनसन यांच्या मते तर संशोधनामुळे प्रतिगमन होऊन, अशा तऱ्हेने (तथाकथित) पूर्वजन्मातील आपली विविध व्यक्तिमत्त्वे दिसणे आणि स्वप्नस्थितिंतील विविध कल्पनाचित्रे यात काहीच फरक नाही व म्हणून त्याला फारसे महत्त्व नाही. एकंदरीत या पुस्तकाच्या निमित्ताने ‘संमोहन’ हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एवढे निश्चित!
इतिहास - डॉ. जेम्स ब्रैद या स्कॉटिश शल्यविशारदाने १८४२ मध्ये प्रथम संमोहनाची कल्पना जगासमोर मांडली व Hypnosis हा शब्द रूढ केला. सन १८४३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या `Neurypnology' नावाच्या पुस्तकात त्याने संमोहनाचे वर्णन, शारीरिक शिथिलतेच्या पाश्र्वभूमीवर मानसिक अतिएकाग्रता असे केले व संमोहन ही एक प्रकारची चेतानिद्रा आहे असे म्हटले. यात संमोहित व्यक्ती ही शारीरिकदृष्टय़ा पूर्ण शिथिल असते; पण निद्रिस्त नसते आणि जरी सर्वसाधारण व्यवधान कमी झाले असले (‘म्हणजे चेतानिद्रा’) तरी एखाद्या विशिष्ट कल्पनेवर मन अतिकेंद्रित असते व त्या कल्पनेशी निगडित सूचनाबरहुकूम (Suqqestion)शरीर हालचाली करू शकते. या अवस्थेतील विद्युत मस्तिष्कालेख (E. E. G. अथवा इलेक्ट्रोएन्केफॅलोग्राम) हा निद्रिस्तावस्थेतील मस्तिष्कालेखापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो हे येथे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे! यामुळेच पुढे डॉ. ब्रैद यांनी १८५५ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या `The phusiology of Fascination' या पुस्तकात आपलाच चेतानिद्रेचा सिद्धान्त खोडून हिप्नॉसिस म्हणजे शारीरिक शिथिलीकरणाच्या पाश्र्वभूमीवर एक कल्पनावाद (Monoideism) असा सिद्धांत मांडला व आज या क्षेत्रात बहुतांशी तीच कल्पना ग्राह्य धरली जाते.
डॉ. जेम्स ब्रैद यांनी आपला हा सिद्धांत काहीसा जर्मन ऑस्ट्रियन डॉक्टर ‘फ्रँझ अॅन्टन मेस्मेर’ यांच्या सिद्धांतांवर आधारित असल्याचे म्हटले होते. प्रत्येकाच्या शरीरात चुंबकीय ऊर्जा असल्याचा व ती शरीरात हजारो चॅनेल्समधून (अॅक्युपंक्चरमधील मेरिडियन्स? योगशास्त्रातील नाडय़ा?) वाहत असल्याचा व तिचा प्रवाह खंडित झाल्यास रोगनिर्मिती होत असल्याचा व तो प्रवाह पूर्ववत केल्यास रोगनिवारण होत असल्याचा दावा केला. त्याकरिता त्याने ‘जैव चुंबकीय क्षेत्र’ (Animal Maynetism) या संज्ञेचा वापर केला सुरुवातीस हे बिघडलेले चुंबकीय प्रवाह सुरळीत करण्याकरिता चुंबकांचाही वापर केला पण पुढे त्याने चुंबक टाळले व उपचारकाच्या Animal Magnetism चा वापर करून तो रुग्णोपचार करू लागला. त्याकरिता तो रुग्णांना विशिष्ट पद्धतीने हस्तस्पर्श करणे व त्यांच्या डोळ्यात खोलवर बघून, हातांच्या काही विशिष्ट हालचालींनी (Mesmereism) त्यांच्या शरीरातील द्रव्याचा (Fluid) प्रवाह नीट करणे अशा पद्धतींचा अवलंब करू लागला. पुढे त्याच्या एका पट्टशिष्याची ‘चार्लस् डी एस्लॉन’ची या संदर्भात पॅरिसमध्ये राजा सोळावा लुईसने आपले अधिकारी व रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे काही शास्त्रज्ञ (यात सुप्रसिद्ध बेंजामीन फ्रँकलीनचाही समावेश होता!) यांच्या मदतीने चौकशी केली. त्यांचा निष्कर्ष होता - असे काही वेगळे चुंबकीय द्रव्य (Fluid) शरीरात नाही व रुग्णांना होणारा फायदा हा केवळ त्यांच्या स्वत:च्या स्वयंसूचनांमुळे (Autosvqqestion and Imagination!) होत आहे! याच स्वयंसूचनासिद्धांतावर आधारित डॉ. ब्रैद यांनी संमोहनशास्त्र विकसित केले. पुढे डॉ. सिग्मंड फ्राईडसारख्या थोरामोठय़ांनीही रुग्णोपचारांमध्ये व मानसोपचार पद्धतींमध्ये संमोहनाचा वापर केल्याचे दिसते.
शास्त्रीय बैठक : संमोहनाचा नेमका परिणाम कसा साधला जातो याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता दिसून येते. काहींच्या मते सूचनांचा (स्वयंसूचना अथवा उपचारक देत असलेल्या) परिणाम हा जागृत मेंदूवर (किंवा मनावर) होऊन तो निर्माण करीत असलेल्या काही विशिष्ट चेतारसायनांमार्फत (एन्केफॅलिन्स व एन्डॉर्फिन्स) शरीराचे शिथिलीकरण व मेंदूची एकाग्रता साधली जाते व त्या माध्यमातून शेवटी भावना, विचार, संवेदना, स्वभाव इ.वर परिणाम (सूचनेनुसार सकारात्मक वा नकारात्मक) साधला जातो. तर काहींच्या मते या सूचनांचे वहन अर्धतामृत किंवा अबोध मनापर्यंत होऊन त्यामार्फत शेवटी दृष्य परिणाम साधला जातो. अर्थात आजच्या घटकेला तरी अर्धजागृत मन/मेंदू इ. बोध मन इ. गोष्टी आधुनिक वैद्यकाला पूर्णपणे माहीत आहेत, असे म्हणता येणार नाही. काहींच्या मते तर हिप्नॉसिसने साधला जाणारा परिणाम हा ‘प्लासिबो’ परिणामाच्या जवळ जाणारा आहे. आयर्विग कर्शने तर संमोहनाची व्याख्याच `Nondeceptive Mega Placebo' अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन (APA) च्या डिव्हिजन ३० ने म्हणजे ‘सोसायटी फॉर सायकॉलॉजिकल हिप्लॉसिस’ने, संमोहनाची नेमकी व्याख्या केली व ती म्हणजे सूचनांच्या माध्यमातून, बोध, संवेदना, भावना, विचार व स्वभाव यात होणारे बदल!
संमोहन तंत्र - स्टेजवर एखाद्या व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना सूचना देऊन त्यांच्याकडून अतक्र्य व अफाट क्रिया करवून घेणे आणि सूचना देऊन व्यक्तीला उपचार करणे यात वेगवेगळे संमोहन तंत्र वापरले जाते; परंतु सर्वसाधारणपणे प्रथम योग्य ती वातावरणनिर्मिती करून, ‘संमोहनशील’ व्यक्तीला निर्देशित करणाऱ्या सूचना दिल्या जातात व नंतर ती व्यक्ती तंद्रीत गेली (ही तंद्री गाढ किंवा हलकी असू शकते) की पुढील विशिष्ट सूचना देऊन, संमोहन साधले जाते. वातावरणनिर्मितीकरिता शांत वातानुकूलित खोली, सुगंध, मंद संगीत, विशिष्ट प्रकाशयोजना, विशिष्ट चिन्ह इ.चाही वापर केला जातो. न्यूयॉर्कस्थित मानसोपचार व संमोहनचारतज्ज्ञ डॉ. हर्बर्ट स्पिजेल यांनी कोण संमोहनशील असते व कोण नाही. हे ठरविण्याकरिता काही मोजमाप शोधले आहे व यानुसार ० ते ५ या मोजमापात सर्व व्यक्तींचे पृथ:करण केले आहे. उदा. ० ते १ अपोलोनियन्स : हे फार तार्किक, कठीण असून, संमोहनात अयोग्य., २ते ३ : ओडिसिअन्स : थोडेफार लवचिक व काही प्रमाणात संवेदनशील, ४ ते ५ : डायोनिसिअन्स : अतिसंमोहनशील, वर उल्लेखिल्याप्रमाणे संमोहन सर्वसाधारणपणे दोन टप्प्यात साधले जाते. इ. शिथिलीकरण व सूचना
शिथिलीकरण : सर्वसाधारणपणे याकरिता मानवी कल्पनाशक्तीचा आधार घेतला जातो. उदा. डोळे मिटून आपण एखाद्या शांत व विस्तीर्ण जलाशयाच्या बाजूस बसलो आहोत, अशी कल्पना केल्यास आपण हळूहळू शिथिल होत जातो. काही वेळा यात हेवी आम्र्स किंवा सिमाफोर तंत्र यांचाही वापर केला जातो.
सूचना : शिथिलीकरणानंतर, तंद्री साधली जाऊन काही विशिष्ट सूचना (उपचारकामार्फत किंवा स्वयंसूचना) दिल्या जातात. संमोहनशास्त्रानुसार बहुसंख्य रोजांची निर्मिती मनात होते व संमोहनाने मनाच्या ‘बरे करण्याच्या शक्ती’ जागृत झाल्या, की रोगनिवारण होते. याव्यतिरिक्त काही वेळा सुरुवातीस उल्लेखिल्याप्रमाणे निर्गमन (Age Regression), Hupnogealing, Parts Therapy इ. तंत्रांचाही वापर केला जातो.
संमोहनोपचार कोठे उपयुक्त? - गेल्या जवळजवळ दीड-पावणेदोन शतकात संमोहनपचारांनी बरेच बरेवाईट दिवस पाहिले. ‘काळ्या जादू’पासून ते ‘सर्व रोगांवर उपयुक्त’ असे अनेक शिक्के त्यावर बसले; पण आजच्या घटकेला हे नेमके कोठे उपयुक्त आहेत, असे पाहिल्यात, काही विशिष्ट व्याधींवर पूरक उपचार म्हणून त्यांचा चांगला उपयोग होतो, असे दिसून येते. यापैकी काही व्याधीविकार पुढीलप्रमाणे - १) कर्करोग अथवा संधिवात इ. व्याधींमुळे होणाऱ्या अस'ा वेदना कमी करण्याकरिता. २) शस्त्रक्रियेदरम्यान वापरावयाच्या भूलकारक औषधांचा त्रास होऊ नये म्हणून तसेच नंतरच्या वेदना कमी करण्याकरिता. ३) लठ्ठपणा- वजन कमी करण्याकरिता. ४) काही त्वचाविकार- सोरायसिस, अटोपिक त्वचा दाह, मस इ. ५) मानसोपचारांचा एक भाग. ६) सवयीचे दुष्परिणाम- धूम्रपान, दात खाणे इ. ७) शिथिलीकरणाकरिता- ताणतणावांवर उपाय. ८) क्रीडानैपुण्य वाढविण्याकरिता. ९) गर्भारपणातील मळमळ कमी करण्याकरिता १०) दीर्घकालिक आंत्रदाह ११) संमोहित प्रसूतीकरिता. १२) मुलांमधील अंथरूण ओले करण्याची प्रवृत्ती. १३) दमा. १४. काही प्रकारच्या अॅलर्जी.
उपसंहार : संमोहनशास्त्रावर अजून बरेच संशोधन बाकी आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. तोपर्यंत काही गोष्टी ध्यानात घ्याव्या-
१) संमोहनोपचार नेहमी तज्ज्ञ व्यक्तींकडूनच घ्यावेत. २) मनाने दुर्बल माणसेच संमोहित होतात ही चुकीची समजूत असून आपण अधिक सृजनशील बुद्धिमान असाल तर अधिक ‘संमोहनशील’ असाल. ३) संमोहन म्हणजे चेतानिद्रा नव्हे तर शारीरिक ‘शिथिलीकरण+तीव्र मानसिक एकाग्रता’ होय. ४) संमोहित व्यक्ती संमोहनकाराच्या पूर्ण अमलबजावणी असे ही समजूत चुकीची होय. ५) हृदयस्पंदन गती, रक्तदाब, अशी सर्वसामान्यपणे ऐच्छिक नियंत्रणाखाली नसलेली शरीरकार्ये, संमोहनामुळे तात्पुरती बदलू शकतात व उपचारांमध्ये ते फायदेशीर ठरू शकते. ६) प्रभावी स्वयंसूचना तंत्र शिकता येते व वाइट सवयी घालविण्याकरिता वेदनाशमनाकरिता, नाहक चिंता, भीती दूर करण्याकरिता त्याचा उपयोग होऊ शकतो. ७) संमोहनोपचार म्हणजे जादूटोणा नव्हे तर मनावर आधारित असे एक उपचारतंत्र आहे, त्यावर सातत्याने संशोधन चालू आहे.
hypnotherapy
hypnotherapist meaning
how does hypnotherapy work
hypnotherapy benefits
hypnotherapy reviews
hypnotherapy techniques
is hypnotherapy real
hypnotherapy training
hypnotherapy anxiety
hypnotherapist meaning
hypnotherapy meaning in hindi
what is hypnotherapy and how does it work
benefits of hypnotherapy
hypnotherapy techniques
hypnotherapist salary
hypnotherapy reviews
is hypnotherapy real
hypnotherapy near me

No comments:
Post a Comment