Saturday, August 19, 2017

how does acupuncture work to relieve pain?

सन १९७८. शांघायमधील एका युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील गोष्ट. न्यूयॉर्क हॉस्पिटल, कॉर्नेल मेडिकल सेंटर, तसेच मेमोरियल स्लोन-कॅटरिंग कॅन्सर सेंटर येथे कार्यरत असणारे क्लिनिकल मेडिसीन व काार्डियॉलॉजी विषयाचे प्रोफेसर आणि त्यांचे काही डॉक्टर मित्र विशेष निमंत्रित म्हणून शांघायमधील या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये २८ वर्षांच्या एका तरुणावर होणाऱ्या हृदयाच्या एका झडपेची शस्त्रक्रिया बघण्याकरिता म्हणून उपस्थित होते. रुग्णस्त्रीला एका व्हिलचेअरवरून ऑपरेशन थिएटरमध्ये आणले जाते. ऑपरेशनच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिला तयार केले जाते आणि प्रमुख हृदयशस्त्रविशारद स्कालपेल चालवून तिची छाती उघडणार तोच प्रो. डॉ. रोझेनफेल्ड आश्चर्याने विचारतात, ‘डॉक्टर अ‍ॅनेस्थेशियाचे काय?’ चिनी डॉक्टर तिच्या कानाकडे बोट दाखवून दर्शवितात तिला सुझोक या पद्धतीचे अ‍ॅक्युपंक्चर करून अ‍ॅनेस्थेशिया दिला गेला आहे. पुढच्या साधारण ३० मि.मध्ये शस्त्रक्रिया पूर्ण होऊन रुग्ण हसतहसत व्हिलचेअरवरून बाहेर जातो. डॉ. इझाडोर रोझेनफेल्डसारख्या अ‍ॅलोपाथीच्या निष्णात डॉक्टरना आलेला हा अनुभव त्यापूर्वी काही व त्यानंतर अनेकांनी घेतला आणि पारंपरिक चिनी वैद्यकाकडे जगाचे लक्ष वेधले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विशेषत: अमेरिकी अध्यक्ष निक्सन यांच्या चीन भेटीनंतर पाश्चात्त्य जगाचे याबाबतीतले औत्सुक्य वाढीस लागले असे दिसून येते.
अ‍ॅलोपथी, अ‍ॅक्युपंक्चर, अ‍ॅक्युप्रेशर, आयुर्वेद, होमिओपथी, कीरोप्रॅक्टिक ऑस्टोओपथी, निसर्गोपचार, योगोपचार, मसाज, वनौषधी, रंगोपचार, पुष्पोपचार, सुगंधोपचार, जलोपचार, चुंबकोपचार, हिप्नॉसिस, क्रिस्टलथेरपी अशा सुमारे ८४ उपचार पद्धती आज जगात प्रचलित आहेत. त्यापैकी काहींना जागतिक आरोग्य संघटनेने विशिष्ट मर्यादेत मान्यता दिली आहे. यात अ‍ॅलोपथी अथवा आधुनिक वैद्यक हा प्रमुख प्रवाह असल्याने इतरांना पर्यायी अथवा Alternate  किंवा Complementary Medicine या नावाने संबोधण्यात येते. यातील काही वैद्यकपद्धती उदा. अ‍ॅक्युपंक्चर, सुगंधोपचार, होमिओपथी या ‘ऊजा’ अधिष्ठान असलेल्या (Energybased) तर अ‍ॅलोपथी, बाराक्षार, आयुर्वेद या बऱ्याचशा ‘द्रव्य’ अधिष्ठान असलेल्या (Matter Based) अशा गणल्या जातात. या दोन्ही प्रकारात बरेचसे सैद्धान्तिक फरक असल्याने, आजाराच्या व उपचारांच्या त्यांच्या त्यांच्या संकल्पनेतही खूप फरक आढळतो.
प्राणीमित्रांच्या उत्पत्तीबरोबरच विविध विकारांची वा रोगांची उत्पत्ती झाली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही आणि या व्याधी-विकारांवर मात करण्याकरिता मानवाने केलेल्या अखंड परिश्रम व सतत अभ्यासातून अनेकविध उपचारपद्धती निर्माण होणेही स्वाभाविकच होते. काळाच्या ओघात यापैकी काही नष्ट झाल्या, काही नवीन निर्माण झाल्या, काहींचे नव्याने पुनरुज्जीवन झाले. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने एखाद्यात एखादी उपचारपद्धती लागू पडते तर दुसऱ्यास तिचा काडीचाही फायदा होत नाही. उपचारपद्धतींच्या या गलबत्यात सर्वसामान्य रुग्ण भांबावून न गेला तरच नवल! कित्येक वेळा रुग्णाला आपल्याला झालेल्या व्याधीकरिता नेमकी कोणती उपचारपद्धती अवलंबावी तेच कळत नाही व त्यामुळे तो विविध उपचारपद्धती ‘स्वीच ऑन- स्वीच ऑफ’ करीत राहतो व त्यामुळे तोही गोंधळतो व डॉक्टरांचाही गोंधळ वाढत राहतो. यावर उपाय म्हणजे- रुग्णशिक्षण आणि डॉक्टरांनी विविध उपचारपद्धती माहिती करून घेणे व त्या त्या रुग्णाकरिता सर्वोत्तम उपचारपद्धती निवडून त्या त्या तज्ज्ञांकरवी त्याला मार्गदर्शन व त्याच्यावर उपचार करणे! यातूनच काही संशोधक, र्सवकष वैद्यकाकडे (Holistic Medicine) वळू लागले आहेत व ती कदाचित वैद्यकशास्त्राची नवी दिशा असू शकेल! उपरोक्त विविध उपचारपद्धतींपैकी अ‍ॅलोपथीच्या खालोखाल जगभरात प्रचलित असलेली उपचारपद्धती म्हणजे पारंपरिक चिनी वैद्यक. भारतीय आयुर्वेदाप्रमाणेच हजारो वर्षांच्या कालावधीत (Traditional Chinese Medicine) चा विकास झाला. अ‍ॅक्युपंक्चर (सुयांच्या साहाय्याने शरीरात काही विशिष्ट बिंदूंवर टोचणे), मॉक्सिबश्चन (मॉक्सा नावाची वनस्पती उपरनिर्दिष्ट बिंदूवर जाळणे), वनौषधी, मसाज, आहार आणि व्यायाम (ताईची पद्धत) ही या पारंपरिक चिनी वैद्यकाची काही प्रमुख अंगे या सर्व अंगांचा जोर हा रोगोपचारांपेक्षा रोगप्रतिबंधनावर आहे ही मुद्दाम लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट. या सर्व प्रकारातही सर्वाधिक लोकप्रिय अंग म्हणजे अ‍ॅक्युपंक्चर (आणि अ‍ॅक्युप्रेशर!)
उपरोल्लेखित डॉ. इसाडोर रोझेनफेल्ड आपल्या एका लेखात रुग्णांना एक महत्त्वाचा सल्ला देतात. ते म्हणतात सर्वसाधारण शस्त्रक्रियांकरिता नेहमीच्या ‘मूल’ तंत्राचाच वापर करा; पण विशिष्ट कारणाशिवायच तुमची पाठ सतत दुखत असेल किंवा शरीरात कोठे ना कोठे वेदना असेल (विशिष्ट कारण नसताना), तुम्हाला दीर्घकालिक अस्थमा वा संग्रहणी असेल, दारू-तंबाखू वा ड्रग्जच्या विळख्यातून सुटावयाचे असेल, कॅन्सरवरील केमोथेरपीनंतर प्रचंड मळमळ होत असेल, शरीराचा एखादा भाग बधीर होत असेल तर अ‍ॅक्युपंक्चरचा जरूर विचार करा. एखाद्या तज्ज्ञाकडून त्याविषयी मार्गदर्शन घ्या. अर्थात हे सर्व सारासार विचार करून व विवेकाचा अवलंब करूनच!  

* इतिहास
मंगोलियाच्या अंतर्भागात झालेल्या उत्खननामध्ये सापडलेल्या दगडी सुयांमुळे हे शास्त्र अतिप्राचीन असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘नी जिंग’ या पीतसम्राटाने सुमारे २,२०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या वैद्यकविषयक ग्रंथात अ‍ॅक्युपंक्चरचा उल्लेख आहे. ‘पीएन चुह’ नावाच्या अ‍ॅक्युपंक्चरतज्ज्ञाने बेशुद्धावस्थेतील राजकुमाराला या उपचारपद्धतीचा वापर करून शुद्धीत आणल्यानंतर हे शास्त्र झपाटय़ाने लोकप्रिय झाले, असे इतिहास सांगतो. आजतर जागतिक आरोग्य संघटनेनेही या शास्त्रास, (विविध विकारांवर) पर्यायी उपचारपद्धती म्हणून मान्यता दिली आहे.
* शास्त्रीय बैठक
सर्वसाधारणपणे बहुतांश उपचारपद्धती या द्रव्य पायाभूत (Matter Based) असतात तर अ‍ॅक्युपंक्चर व अ‍ॅक्युप्रेशर ही पद्धती ऊर्जा पायाभूत (Energy Based) आहे. आपल्या शरीरात चैतन्य निर्माण करणारी प्राणशक्ती ही शरीरात काही विशिष्ट मार्गानी (Meridians) वाहते. या वहनात अडथळा निर्माण झाला तर ते ते अवयव आजारी होतात व हे वहन पूर्ववत होताच त्या त्या अवयवांचे कार्य परत नीट होते. विशिष्ट बिंदूवर सुया टोचणे वा दाब देणे (अ‍ॅक्युपंक्चर वा अ‍ॅक्युप्रेशर) यामुळे हे बिंदू उत्तेजित वा बधीर होतात व त्यामुळे प्राणशक्तीच्या वहनात बदल होतो. असे प्राणशक्ती वहनाचे १४ प्रमुख मार्ग असून, त्यावर सुमारे ५०० प्रमुख बिंदू (यातही कान व पायाचे तळवे यावर अधिक) असतात असे हे शास्त्र मानते.
*  आधुनिक दृष्टिकोन
आधुनिक शास्त्राच्या मतानुसार हे मार्ग दाखविता येत नाहीत; परंतु त्यांच्या परिणामांचे मात्र मोजमाप करता येते. उदा.- रोगनिवारण, अवयवांच्या कार्यात सुधारणा, शरीरात ‘एन्डॉर्फिन्स’ या प्रकारची वाढलेली पातळी इ. चिनी पारंपरिक वैद्यकानुसार अनेकविध रोगांत या तंत्राचा वापर करता येत असला तरी आधुनिक वैद्यकाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, वेदनाशमन, भूल (Anaesthesia) सांध्यांचे व स्नायूंचे विकार रोगप्रतिकार शक्ती वाढविणे इ.करिता या शास्त्राचा परिणामकारक वापर करता येतो. अर्थात अ‍ॅक्युपंक्चर वा अ‍ॅक्युप्रेशर शिकणे व आत्मसात करणे हे वाटते तितके सहजसाध्य नाही.
*  अभ्यास
अ‍ॅक्युपंक्चर वा अ‍ॅक्युप्रेशरशास्त्र पूर्णपणे आत्मसात करण्याकरिता चिनी तत्त्वज्ञानाचा व चिनी वैद्यकाचा अभ्यास जरुरीचा आहे. त्यातही खालील काही तत्त्वांचा अभ्यास नितांत आवश्यक समजावा.
’ टाओ (TAO) ’ यीन व यँग ’ आठ तत्त्वे- यीन / यँग, गरम / थंड, आत / बाहेर, कमी / अधिक ’ तीन खजिने- ची, शेन आणि जिंग ’ पाच मूलतत्त्वे- पृथ्वी, आप, तेज, धातू, लाकूड.
वरील सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केल्यानंतर अ‍ॅक्युपंक्चर / अ‍ॅक्युप्रेशर हे एक महत्त्वाचे पर्यायी वैद्यकशास्त्र आहे हे वाचकांनी जाणलेच असेल. (अर्थात त्याच्या मर्यादा जाणूनच!)

acupuncture
acupuncture meaning
acupuncture benefits
acupuncture history
acupuncture wiki
acupuncture for back pain
acupuncture points
acupuncture reviews
acupuncture side effects
acupuncture benefits
acupuncture benefits and risks
how does acupuncture work to relieve pain?
acupuncture treatment for back pain
acupuncture benefits for anxiety
pros and cons of acupuncture
benefits of acupuncture for fertility
acupuncture benefits for weight loss
is acupuncture painful

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...