Diseases detected by eye exam - Kinesiology and Quadriceps and Iridology
‘‘डोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचे’’...
स्व. बाबूजींनी गायिलेल्या या गीतातील आशयाशी कोणीही चटकन सहमत होईल. कारण चेहऱ्याचे व खासकरून डोळ्यांचे एक प्रमुख कार्य म्हणजे मानवी मनातील भावनादर्शन! ‘चंचल डोळे’, ‘लबाड डोळे’, ‘भेदक नजर’, ‘आश्वासक दृष्टी’, ‘प्रेमळ नजर’, ‘शांत वा गंभीर नजर’ अथांग सागराप्रमाणे ‘विशाल नेत्र’, ‘दिलखेचक नजर’- ही सर्व वर्णने डोळ्यांची भावनादर्शनाची क्षमता स्पष्ट करणारी आहेत. वैद्यकाच्या दृष्टीकोनातून बघितले तर डोळ्यांची तपासणी ही केवळ अनेक नेत्रविकारांच्याच दृष्टीने आवश्यक असते असे नव्हे. (उदा. मोतीबिंदू, काचबिंदू, उच्चरक्तदाब, मधुमेह इ.) तर काही शारीरिक व्याधींचे निदानही (उदा. विल्सन रोगातील के. एफ. रिंग इ.) नेत्रतपासणीने होऊ शकते. आजकाल ‘बायोमेट्रिक्स ओळख’ परीक्षेत मानवी बुब्बुळालाही (IRIS) असेच महत्त्व प्राप्त झाले आहे. पण या बुब्बुळाच्या परीक्षणाने एकंदरीतच व्यक्तीच्या आरोग्याविषयी वा त्याला होऊ घातलेल्या आजारांविषयी भाकित करणे शक्य आहे असे कोणी सांगितले तर? प्रथमदर्शनी तरी त्यावर विश्वास ठेवणे कठीणच! पण चक्क अशी एक पर्यायी निदानपद्धती अस्तित्वात आहे, ती म्हणजे बुब्बुळपरीक्षण अथवा आयरिडॉलॉजी (Iridology)! या व अशाच एका दुसऱ्या पर्यायी निदान पद्धतीचा, कायनेसिऑलॉजी (kinesiology) चा आपण यावेळी वेध घेणार आहोत.
आयरिडॉलॉजी- बुब्बुळ परीक्षणाने त्या त्या व्यक्तीला होऊ शकणाऱ्या संभाव्य आजारांची कल्पना येऊ शकते असे हे शास्त्र मानते. यात आयरिडॉलॉजिस्ट, प्रथम साध्या टॉर्चने व बहिर्गोल भिंगाच्या मदतीने बुब्बुळ परीक्षण करतो व नंतर आवश्यकतेनुसार विशेष कॅमेऱ्याच्या मदतीने त्याचे व्हिडीओरेकॉर्डिग वा फोटो काढतो आणि नंतर प्रोजेक्टरच्या मदतीने त्याचे मोठय़ा पडद्यावर प्रक्षेपण करून त्याचे सखोल परीक्षण करतो. यात बुब्बुळाचा रंग, पोत त्यावरील खुणा यांचा अभ्यास केला जातो व त्यातून निष्कर्ष काढले जातात. ही पद्धती कोणी व कशी शोधून काढली याचा इतिहासही मनोरंजक आहे.
इतिहास : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हंगेरियन होमिओपथिक डॉक्टर, इग्नाटझ फॉन पेक्झिले (Ignatz Von Peczeley याने ही पद्धत शोधून काढली असे म्हटले जाते. तो बारा वर्षांचा असताना, एका पाळीव घुबडाबरोबर खेळताना चुकून त्याच्या हातून त्या घुबडाचा एक पाय मोडला. त्यावेळी त्या घुबडाच्या बुब्बुळात एक काळी ठळक खूण उमटाताना त्याने पाहिली. पुढे त्या घुबडाची त्याने शुश्रुषा केली व व पाय बरा झाल्यानंतर ही काळी खूण पांढरी झालेली त्याच्या लक्षात आली. पुढे एका पाय मोडलेल्या रुग्णावर उपचार करताना, त्याच्या बुब्बुळात त्याला अशीच काळी खूण आढळली व पुढे अनेक रोगांच्या व संभाव्य रोगांच्या खुणा बुब्बुळात उमटतात असे त्याला आढळून आले व त्यावरच आधारित असा त्याने या निदानपद्धतीचा पाया घातला.
आयरिडॉलॉजी निदान तंत्र : वर उल्लेखिल्याप्रमाणे बुब्बुळाचा अभ्यास करताना त्याचा रंग, पोत इ.चा विचार केला जातो. सर्वसामान्यपणे उजवे बुब्बुळ शरीराच्या उजव्या भागातील विकार व डाव्या भागातील विकार दर्शविते. डोळ्यांचे विशिष्ट रंग, विशिष्ट रोग होण्याचे संभाव्य निर्देशक असतात असेही हे शास्त्र मानते. उदा. निळे डोळे असणाऱ्या व्यक्तींना सांध्यांचे आजार वा आंत्रव्रण होण्याची शक्यता, तपकिरी डोळेवाल्यांना धमन्यांचे काठिण्य वा पित्ताशयाचे विकार होण्याची शक्यता तर हिरवे, करडे वा घारे डोळे असणाऱ्यांना पचन संस्थेचे विकार होण्याची अधिक शक्यता असते.
याव्यतिरिक्त बुब्बुळाचे विविध भाग शरीरातील विविध भागांचे निर्देशक असतात असे हे शास्त्र मानते व त्या त्या भागातील बुब्बुळातील, रंगातील वा पोतामधील विविध बदल वा विविध ठिपके हे शरीराच्या त्या त्या भागातील संभाव्य आजारांशी निगडीत असतात असे हे शास्त्र मानते. उदा. बाहुलीभोवतालचा (Pupil’) बुब्बुळाचा भाग हा ‘पोट’ निर्देशक असतो तर परिघावरील बुब्बुळाचा भाग त्वचा निर्देशक असतो. अशा तऱ्हेने बुब्बुळ व शरीराचे विविध भाग यांचा अन्योन्य संबंध दाखविणारे फार गुंतागुंतीने असे नकाशे प्रथम डॉ. इग्नाट्झ याने तयार केले. नंतर डॉ. बर्नार्ड जेन्सन या आयरिडॉलॉजिस्टने त्यात सुधारणा केल्या. मात्र येथे हे स्पष्ट केले पाहिजे की, आयरिडॉलॉजिस्ट सहसा एखाद्या विशिष्ट रोगाचे निदान करत नाहीत तर तुम्हाला काय होण्याची शक्यता आहे यावर भाष्य करतात व त्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्याविषयी सुचवितात.
आधुनिक वैद्यकाचा दृष्टीकोन- या सर्वच बाबतीत, आधुनिक वैद्यकाचे मत मात्र अनुकूल नाही. सन १९७९ मध्ये सॅन डिआगो विश्वविद्यालयात झालेल्या एका मोठय़ा अभ्यासपाहणीत व अन्य काही अशाच पाहण्यातून आयरिडॉलॉजीबद्दल काही ठोस, सकारात्मक निष्कर्ष काढता आलेले नाहीत व म्हणून आजच्या घटकेला तरी याविषयी अधिक संशोधन होणे आवश्यक आहे असे वाटते.
बुब्बुळ परीक्षणातून सर्वसाधारण आरोग्याचा, अनारोग्याचा किंवा रोगांचा अंदाज बांधणे ही संकल्पना जर आपणास ‘अशक्य’ कोटीतील वाटत असेल तर ‘हालचालीतून’ किंवा अधिक नेमकेपणाने सांगावयाचे झाले तर ‘स्नायूपरिक्षणातून’ अनारोग्यासंबंधी अंदाज बांधण्याच्या निदान पद्धतीला आपण काय म्हणाल? सर्वसाधारणपणे स्नायूपरीक्षणातून डॉक्टर मंडळी किंवा फिजिओ वा ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्या स्नायूजवळील किंवा त्यावर आधारित अशा सांध्यांसंबंधी किंवा प्रत्यक्ष त्या स्नायूसंबंधी काही अंदाज बांधतात, पण विशिष्ट स्नायू कमकुवत वाटतो म्हणून शरीरांतर्गत विशिष्ट अवयवाचे किंवा विशिष्ट प्रणालीचे कार्य बिघडले आहे असे निदान कोणी करू लागले तर? पण चक्क अशी एक निदान पद्धती अस्तित्वात आहे व ती म्हणजे कायनेसिऑलॉजी (kinesiology)!
इतिहास : अमेरिकन किरोप्रॅक्टर डॉ. जॉर्ज जे. गुडहार्टने ही पद्धत शोधून काढली. स्नायूपरीक्षणातून शारीरिक अनारोग्याचा आगाऊ अंदाज बांधता येतो असा त्याचा दावा होता व स्नायू आणि शरीरांतर्गत विविध अवयव वा प्रणाली यांचा अन्योन्यसंबंध त्याने विशद केला. त्या त्या दुखऱ्या स्नायूवर उपचार केले, उपयोजित कायनेसिऑलॉजी, Applied kinesiology), की तो तो अवयव किंवा ती ती प्रणाली सुधारते असा त्याचा दावा होता.
बैठक : ‘कायनेसिऑलॉजी’ हे खरे तर पौर्वात्य ऊर्जावैद्यक (Energy Medicine) आणि पाश्चिमात्य तंत्रज्ञान यांचा मिलाफ आहे. ‘शरीर-मना’च्या चलनवलनास आवश्यक असलेली ऊर्जा (प्राणशक्ती किंवा की (Chi) शरीरात वेगवेगळ्या मार्गानी (योग- आयुर्वेदातील नाडय़ा किंवा पारंपरिक चीनी वैद्यकातील मेरिडिअन्स) वाहते. तिच्या या वहनात बंधने आले की त्या त्या अवयवाचे किंवा प्रणालीचे कार्य बिघडते (व आपण ‘रोग’ झाला असे म्हणतो!) याबरोबरच शरीरातील एखादा विशिष्ट ‘स्नायू’ही नाजूक किंवा दुखरा वा दुबळा होतो, असे डॉ. गुडहार्टचे म्हणणे होते.
उदा. मांडीच्या पुढच्या भागातील क्वाड्रीसेप्स (Quadriceps) या स्नायूची ऊर्जा जोड (Energy Link‘) लहान आतडय़ाशी तर मांडीच्या मागील भागातील धोंडशीरेची (Hamstring Muscle) ऊर्जा जोड मोठय़ा आतडय़ाशी आहे. म्हणजेच तुमच्या हुळहुळणाऱ्या क्वाड्रीसेप्समुळे कायनेसिऑलॉजिस्ट तुमचे लहान आतडे बिघडल्याचा निष्कर्ष काढेल व त्यावर उपचार करून तुमचे पोट ठीक करेल! अशा पद्धतीने कायनेसिऑलॉजिस्ट विविध शारीरिक, मानसिक वा भावनिक समस्यांचे निदान व उपचार करण्याचा दावा करतात. रोग पूर्णावस्थेत असताना तो ‘बरा’ करणे कठीण असल्याचे हे उपचारक मानतात व रोगाची पूर्वलक्षणे दिसताच (Subclinical State) त्यावर उपचार करणे योग्य असे सुचवितात. शरीरातील असंतुलन घालविणे हा मुख्य उद्देश असल्याचे ते मानतात व त्या दृष्टीने पचनाच्या समस्या, फूड अॅलर्जी, सांध्यातील ताठरपणा, पाठदुखी, डोकेदुखी, नाहक भीती इ.वर कायनेसिऑलॉजीने परिणामकारक उपचार करता येतात असा दावा ते करतात.
आयरिडॉलॉजी किंवा कायनेसिऑलॉजी या निदानपद्धती आज जगात अनेक ठिकाणी प्रचलित असल्या तरी अजूनही त्यांची शास्त्रीय बैठक पूर्णपणे स्पष्ट झाली आहे असे मानता येणार नाही. मुळातच ऊर्जावैद्यक व पर्यायी निदान पद्धती या उत्क्रांतीच्या अवस्थेत आहेत व त्यामुळे आधुनिक तंत्रविज्ञान व वैद्यकाची मदत घेऊन त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे असे वाटते. मात्र या दोन्ही पद्धती निदान वा उपचारांचा एक वेगळा आयाम सुचवितात एवढे निश्चित!
eyes checking for diseases
diseases detected by eye exam
diagnosing illness through the eyes
reading health through eyes
can an eye exam detect a brain tumor
can an eye test detect liver problems
can an eye exam detect diabetes
can a routine eye test detect a brain tumour
can an eye test detect a brain tumour
No comments:
Post a Comment