Chinese army learns Indian and foreign languages in India.
भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती असली तरी चीन, व्हिएतनाम, नेपाळ, लाओसचे सैन्य अधिकारी एकत्रितपणे मध्यप्रदेशातील पचमढी येथील भारतीय लष्कराच्या शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयात इंग्रजी भाषेचे धडे गिरवित आहेत.
द्विपक्षीय करारानुसार मित्र देशातील सैन्य अधिकारी परस्परांच्या देशात जावून संयुक्त सराव करीत असतात. तसेच वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी देखील जात असतात. दोन देशाच्या सीमेवर तणावाचा यावर परिणाम होत नाही. भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या सीमेवरून वादआहे. चीनने मानसरोवर यात्रेमध्ये अडथळे निर्माण केले आहे. त्याच वेळी चीन, नेपाळ, व्हिएतनाम आणि लाओसचे सैन्य अधिकारी पचमढी येथे इंग्रजी भाषेचा एकत्रितपणे अभ्यास करीत आहेत. पचमढी येथील केंद्रात ऊर्दू, काश्मिरी आणि इंग्रजी या भाषांबरोबर शेजारी राष्ट्रांच्या भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास केला जातो.
प्रशिक्षण केंद्रात विदेशी भाषांचे दोन प्रमुख विभाग आहेत. त्यात १२ हून अधिक भाषांचे वर्ग घेतले जातात. तसेच संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता विकसित केली जाते. देभरातील तीन दलाचे अधिकारी विविध भाषा शिकण्यासाठी येथे येतात. त्यासाठी त्यांना अखिल भारतीय स्तरावरील भाषा कल चाचणी उत्तीर्ण करावी लागते. तसेच विदेशातील सैन्य अधिकारी इंग्रजी आणि भारतीय भाषा शिकण्यासाठी येतात.
सध्या येथे भारतीय सैन्य अधिकारी चिनी, रशियन, बर्मिझ (म्यानमार), डोंखा (भूतान), तिबिटियन, पर्शियन, पुश्तो, अरेबिक, सिंहला (श्रीलंका) भाषा शिकत आहेत. चिनी आणि रशियन भाषेचा सर्वाधिक कालावधीचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. पुश्तो, बर्मिझ भाषेचा चार महिन्याचा तर, पर्शियन अभ्यासक्रम ४७ आठवडय़ांचा आहे. संवादासाठी इंग्रजी शब्दकोश आहे. तेथे सैनिक भाषा ऐकून सराव करतात. हे अभ्याक्रम शिकवण्यासाठी वर्ग खोल्यांची वेगळी रचना केली जाते. त्यासाठी पोस्टर, संबंधित राष्ट्राची संस्कृती, तेथील प्रतिके, वर्तमानपत्र लावले आहेत. तसेच विविध देशातील सशस्त्र दलातील ‘रँक’ लावली जाते. भूतान आणि तिबेटियन विभागात प्राचिन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
डोंखा केवळ भारतात
भारत शेजारी देशाशी संबंध अधिक सदृढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेजारी राष्ट्राची संस्कृती समजून घेणे आणि त्यांच्या भाषेचा अभ्यास केला जात आहे. भारतीय सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांना देखील त्याच दृष्टीने विविध राष्ट्रांची भाषा आणि संस्कृती शिकण्यात येते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे भूतानची भाषा ‘डोंखा’ आपल्या देशात शिवकणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. भूतान वगळता केवळ भारतात ही भाषा शिवकली जाते. या भाषेचे धडे पचमढी येथील लष्कराच्या केंद्रात दिले जाते.
No comments:
Post a Comment