How does yoga detoxify the body?
आयुर्वेद, ज्योतिर्विद्या, रस्त्शास्त्र, गणिती शून्य, रागदारीवर आधारित शास्त्रीय संगीत, या व अशा अनेक देणग्या भारताने आजवर संपूर्ण जगाला दिल्या. त्यात कदाचित सर्वश्रेष्ठ ठरावी अशी विद्या म्हणजे योगविद्या! शरीरमनाच्या यंत्रणेचे आरोग्य उत्तमरित्या सांभाळण्याकरिता, आपल्याच भूमीत विकसित झालेले शास्त्र, तत्त्वज्ञान, कला व तंत्रज्ञान म्हणजे योग! ऋग्वेदपूर्व कालापासून हळूहळू विकसित झालेले व सुमारे २५०० वर्षांपूर्वी पतंजली मुनींनी (हा काळ काहीजण ४५०० वर्षेही मानतात.) १९५ सूत्रांमध्ये एकत्रित व संपादित केलेले हे ‘योग’शास्त्र खरे म्हणजे उपचारपद्धती म्हणून निर्माण वा विकसित झालेले नाही. परंतु योग ही एक आरोग्यदायी जीवनशैली असल्याने, जीवनशैलीशी निगडीत विविध रोगांवरील उपचारांकरिता योगाचा उपयोग करण्याचे मानवाला सुचले नसते तरच नवल! मानवी शरीर मनाच्या यंत्रणेचे ‘जड’ व ‘ऊर्जा किंवा चेतना’ असे दोन प्रमुख घटक आहेत. काही उपचार पद्धती या प्रामुख्याने ‘जड’ केंद्रीत आहेत तर काही ‘ऊर्जा’ केंद्रीत आहेत. योगाचे हे खास वैशिष्टय़ म्हणता येईल की तो एकाच वेळी जड आणि ऊर्जा दोहोंवर कार्य करतो व म्हणून योग ही एक र्सवकष जीवनशैली होऊ शकते. तसेच योगोपचार हे र्सवकष उपचारपद्धती (Wholistic Therapy) म्हणून विकसित होऊ शकतात, किंबहुना होत आहेत. अर्थात योगोपचार हे सर्व रोगांवर रामबाण (Panacea Therapy) नव्हेत हेही आपण पुढे पाहणारच आहोत.
इतिहास : मुळात योगाची निर्मिती ऋग्वेद पूर्व काळात झाली असावी असे त्या काळाशी निगडीत अशा उत्खननातील पुराव्यांवरून वाटते. पतंजली मुनींनी त्यातील मनोव्यापारांवर अधिक लक्ष केंद्रीत करून मनाच्या प्रशिक्षणाचे एक तंत्र म्हणून ‘राजयोग’ म्हणून ते सूत्रबद्ध केले. पुढे त्यातील शारीरिक कृतींवर अधिक संशोधन होईन. त्यातून हठयोगाची निर्मिती झाली असावी असे दिसते. हे ज्ञान घेरंड मुनींच्या ‘घेरंड संहिते’त व स्वात्मारामांच्या ‘हलप्रदीपिके’त विस्तृतपणे ग्रंथबद्ध झाले आहे. योगातील शारीरिक कृतींचा जसजसा फायदा दिसून येऊ लागला. (उदा. शरीराचा सडपातळपणा, लवचिकता, उत्तम श्वसनक्षमता, तरुण सतेज कांती इ.) तसतसा ‘हठयोग’ अधिक प्रसृत होऊ लागला. पण पुढे भारतातील मध्ययुगीन अधोगतीमुळे सर्व ‘योग’च बासनात पडल्यासारखा झाला. (नाथपंथियांमुळे तो बऱ्याच प्रमाणात तग धरून राहिला.) पुढे स्वामी विवेकानंद व त्यानंतर भारतातून परदेशात गेलेल्या अनेक योग्यांमुळे तो पाश्चिमात्य जगात बराच स्थिरावला व लोकप्रियही झाला. पुढे महर्षी महेशयोगी यांच्या T.M. ध्यानपद्धतीमुळे (Transcendenta Meditation) प्रेरित होऊन अनेक पाश्चात्य वैद्यक व्यावसायिकांनी ‘योगोपचार’ हे शास्त्र म्हणून विकसित होण्यास मदत केली असे म्हणता येईल. अगदी अलिकडे म्हणजे सन १९९२ च्या आसपास अमेरिकेत डॉ. डीन ऑर्निशनी आपल्या हृदरोग उपचारांवरील एका फार मोठय़ा संशोधनात योग प्रणित जीवनपद्धतीचा पुरस्कार केल्याने योगोपचारांची लोकप्रियता अधिकच वाढली. तत्पूर्वी भारतामध्ये सुद्धा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लो. टिळकांच्या प्रेरणेने स्वामी कुवलयानंदांनी महाराष्ट्रात, कैवल्यधाम या संस्थेच्या माध्यमातून योगावर शास्त्रीय संशोधन करून, योगोपचारांची शास्त्रीय बैठक पक्की करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. असेच प्रयत्न कैवल्यधाम लोणावळा येथे, बिहारमध्ये मौघीर येथे, बंगलोर येथे विवेकानंद योग थेरपी अँड रिसर्च फाऊंडेशनमध्ये, योगीराज बी. के. एस. अय्यंगार यांच्या विविध देश-विदेशातील केंद्रांत व अन्य अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अव्याहतपणे चालू आहेत ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक मोठी आनंददायक बाब आहे. मात्र यातही गमतीचा भाग असा की भारतात व सर्वसाधारणपणे पौर्वात्य जगात योगाकडे अजूनही प्रामुख्याने, एक आध्यात्मिक उन्नतीचे साधन म्हणून पाहिले जाते तर पाश्चिमात्य त्यातील भौतिक अंगाला म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, चापल्य, तणावरहित मन, शिथिलीकरण इ.ना अधिक महत्त्व देताना दिसतात. आज जगात राजयोग, हठयोग, कर्मयोग, भक्तीयोग, लययोग, मंत्रयोग, जपयोग, नादयोग, सहजयोग, कुंडलिनी योग, ध्यानयोग, अष्टांग योग, अग्नियोग, ऑफिसयोग, पॉवरयोग अशी योगाची जी विविध रुपे दिसतात ती ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने योग्यच आहेत व त्यातून परत एकदा योगाची सर्वसमावेशकता व सर्वस्पर्शीपणा सिद्ध होतात.
योग म्हणजे नेमके काय? योग म्हणजे केवळ योगासने नसून त्यात ‘यम’ (समाजात वावरताना पाळावयाची नैतिक बंधने- अहिंसा, सत्य, चोरी न करणे, अवास्तव संग्रह न करणे, ब्रह्मचर्य), नियम (स्वयं अनुशासन- शोर्य, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वराला समर्पण), प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या इतर सात अंगांचाही समावेश होतो. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे तर तो शरीर व मन या दोघांचाही एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम आहे असे म्हटल्यास हरकत नसावी. सर्वसाधारणपणे वयाच्या ८/१० वर्षांनंतर योगाभ्यास कोणालाही सुरू करता येतो. सर्वसामान्यपणे ‘योग’ करताना कोणतीही बा'ा साधने लागत नाहीत. योग कोणत्याही ऋतूत करता येतो. आणि योग व्यक्तीच्या शारीरिक वा मानसिक प्रकृतीनुसार बेतता येतो हे खास वैशिष्टय़!
योग व योगोपचारांची शास्त्रीय बैठक : देश आणि परदेशात आजवर विविध ठिकाणी जे योगविषयक संशोधन झाले आहे त्याचा आपण येथे थोडक्यात आढावा घेणार आहोत. सन १९६० मध्ये अमेरिकेत कान्सास येथील मेनिन्जर फाऊंडेशनमध्ये झालेल्या संशोधनानुसार ध्यानामुळे हृदय व रक्ताभिसरणावर निश्चित फायदेशीर असा परिणाम होतो असे आढळून आले. पुढे सन १९९२ मध्ये डॉ. डीन ऑर्निश यांच्या व्यापक संशोधनात हे निष्कर्ष पक्के गेले व विशिष्ट आहार, व्यायाम, योग व जीवनपद्धतीमुळे हृदयधमन्यांचे काठिण्यही दूर होऊ शकते असे सिद्ध झाले. सन १९९० मधील लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार व १९८३ मधील ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयातील एका संशोधनानुसार योगामुळे श्वसन सुधारते, दम्याचे अॅटॅक कमी होतात आणि शरीरातील ऊर्जा वाढते. हॉर्वर्ड मेडिकल स्कूल, यूक्ला (UCLA), कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील वैद्यकीय विभाग व मेनिन्जर फाऊंडेशन अशा विविध ठिकाणी विविध संशोधनातून, सर्वसामान्यपणे अनिच्छावर्ती मज्जासंस्थेच्या (Autonomic Nervous System) नियंत्रणाखाली असलेल्या अनेक शारीरिक क्रिया उदा. श्वसन, हृदयगती, रक्तदाब, शरीराचे तापमान इ., योगाच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात नियंत्रणाखाली आणता येतात हे सिद्ध झाले आहे. हार्वर्ड विद्यापीठातील सुप्रसिद्ध प्रोफेसर डॉ. हर्बर्ट बेन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ध्यानावर केलेल्या संशोधनानुसार ध्यानयोगामुळे शरीरातील तणाव संप्रेरक ‘कॉर्टिझॉल’ची पातळी कमी होते तर मेंदूचा विद्युतलहरी (E.E.G.) हा जागृत शिथिलीकरणाची (Relaxation with Heightened Awareness) स्थिती, आल्फा तरंग, दर्शवितो. मोघीर येथील बिहार स्कूल ऑफ योगाने, स्वामी सत्येंद्र सरस्वतींच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेल्या योगनिद्रेचे शारीरिक शिथिलीकरण, वैचारिक केंद्रीकरण, संकल्प, प्रतिमातंत्र, व्हिज्युअलायझेशन असे कितीतरी भाग आहेत व त्यातून अनेक शारीरिक व मानसिक फायदे होतात असे दिसून आले आहे.
ऊर्जा वैद्यकाचा पाठपुरावा करणारी मंडळी पाठीच्या कण्यात स्थित मज्जारज्जूमधील चेताकेंद्रे व कुंडलिनी योगातील सात ज्ञात चक्रे व नाथपंथीय वर्णन करीत असलेली अनेक अज्ञात चक्रे यांची सांगड घालून, योगामुळेच शरीरातून ऊर्जेचे वहन अधिक चांगल्या तऱ्हेने होते (नाडीशुद्धी?) व त्यामुळे विविध रोगांचा परिहार होतो असा सिद्धान्त मांडतात. अर्थात याला अजून आधुनिक वैद्यकाने होकार दर्शविलेला नाही.
थोडक्यात योगामुळे शरीर व मनाचे आरोग्य सुधारते असे म्हणता येईल. योग हे प्रामुख्याने मनाच्या प्रशिक्षणाचे तंत्र असल्याने योगाचा सकारात्मक परिणाम हा प्रथम विचारांवर, त्या माध्यमातून मेंदूच्या कार्यावर व मेंदूच्या माध्यमातून शरीरातील अनिच्छावर्ती मज्जासंस्था, संप्रेरके (Endocrine Glands व हार्मोन्स) आणि प्रतिरक्षणाप्रणालीवर (Immune System) होतो असे दिसते. शरीर मनाच्या या अक्षाला Psycho Neuro Immuno Endocrine Axix (PNIE Axis) असे म्हणतात व योगाचे प्रमुख कार्य हा अक्ष बळकट करणे, त्याचे कार्य सुधारणे हे आहे असे दिसते. योगाची सर्वच अंगे ही शरीरमनाच्या स्वास्थ्याला उपयुक्त असली तरी त्यातील योगासने, प्राणायाम व ध्यान ही तात्काळ परिणाम साधणारी आहेत असे दिसते.
योग कशावर उपयुक्त? योगामुळे सर्वसाधारण शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते हे जरी खरे असले तरी काही विशिष्ट आजारात त्याची अधिक उपयुक्तता आढळून आली आहे. उदा. ताणतणाव, दीर्घकालीक दमणूक (Chronic fatique), डोकेदुखी (विशेषत: अर्धशिशी), नैराश्य, रक्ताभिसरणाच्या समस्या, दमा, ब्रॉन्कायटीस, संधीवात, पचनसमस्या (विशेषकरून Irritable Bowel syndrome), पाठदुखी, पाळीच्या समस्या, सांधे आखडणे इ. काही विशिष्ट आसनांचा काही विशिष्ट परिणाम साधला जात असला (उदा.अर्धमत्स्येंद्रासन व धनुरासनामुळे स्वादुपिंडाचे कार्य सुधारून मधुमेह नियंत्रण; मत्स्यासन व सर्वागासनामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारणे इ.), काही प्राणायामांमुळे श्वसनशुद्धी होऊन श्वसनक्षमता वाढत असली (उदा. भस्त्रिका, भ्रामरी इ.) तरी योगाचे परिणाम सर्वच शरीरावर व मनावर होत असल्याने, विशिष्ट रोगांवर विशिष्ट योग याला तसा अर्थ नाही व त्याला संशोधनाची जोडही नाही. मात्र विशिष्ट रोगांमध्ये योगाच्या विशिष्ट भागावर भर देणे वा विशिष्ट भाग वगळणे (उदा. हृदयविकारात बंध टाकणे, उच्चरक्तदाबात विपरित करणी वा शीर्षांसन टाळणे इ.) हे सयुक्तिक आहे. गर्भारपणातही तज्ज्ञांच्या सल्ल्याविना योगाभ्यास करू नये. पाठीच्या कण्याच्या विकारातही आधी ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घेऊन विकाराचे योग्य निदान करावे व नंतरच योगाभ्यासाकडे वळावे.
आजकाल योगाचे थोडेफार शिक्षण घेऊन ताबडतोब स्वत:ला योगोपचार तज्ज्ञ म्हणून घ्यावयाची अनेकांना घाई झालेली दिसते. अनेक ठिकाणी अशी छोटी-मोठी केंद्रे वा संस्थाही दिसतात. यामुळे फायद्याऐवजी तोटाच अधिक! याकरिताच स्वामी कुवलयानंदानी प्रशिक्षित डॉक्टरांनी योग शिकून योगोपचार करण्याविषयी सुचविले होते व तसा आग्रह धरला होता. वैयक्तिक योग शिक्षण, योग संशोधन आणि योगोपचार या संपूर्ण भिन्न गोष्टी असून त्यांची सैद्धान्तिक व क्रियात्मक बैठक भिन्न आहे हे ध्यानात ठेवणे आवश्यक!
how does yoga detoxify the body
what is detox yoga
detox yoga sequence
yoga poses to detox liver
yoga detox symptoms
detox yoga poses
yoga detox diet
yoga release toxins symptoms
detox yoga flow

No comments:
Post a Comment