विविध व्याधी विकारांवर उपलब्ध असलेल्या उपचारपद्धतींकडे एक धावती नजर टाकली तरी त्यांचे अधिष्ठान फार पूर्वीच्या काळी फक्त ‘देह’ हेच होते उदा. मसाज, सांधे व मऊ उती यांच्या मसाजावर अधिष्ठित चिनी उपचारपद्धत टय़ुइना (Tuina) इ. व आता त्या अधिकाधिक ‘मना’धिष्ठित होत चालल्या आहेत. उदा. डॉ. बारव पुष्पोपचार पद्धती इ. हे सहज लक्षात येते. वास्तविक अस्तित्वाचे दोन्ही आयाम ‘मन’ व ‘देह’ हे महत्त्वाचे आहेत, परस्परावलंबी आहेत व कोणत्याही व्याधी विकारात दोघांवर उपचार महत्त्वाचे असतात हे विसरून चालणार नाही. दीर्घकालिक हृदयविकाराने वा किडनीच्या विकाराने ग्रस्त व्यक्ती हताश होतात, निराश होतात व त्यांना मानसोपचारांची गरज लागते तर नैराश्यग्रस्त मनोरुग्णांना मसाज, व्यायाम इ.ची जोड दिल्यास त्यांची स्थिती सुधारते. आज ‘मनो’धिष्ठित उपचारपद्धती अधिक लोकप्रिय होत चालल्या असल्या तरी ‘देहा’वर उपचार विसरून चालणार नाही. सॉफ्टवेअर तर उत्तम हवेच; पण त्याच्या आविष्कृतीकरिता ‘हार्डवेअर’ ही तितकेच महत्त्वाचे व त्याचे आरोग्य सांभाळणे व बिघडल्यास ते दुरुस्त करणे हेही अति आवश्यक! जगभर व विशेष करून युरोप-अमेरिकेत लोकप्रिय असलेली एक हार्डवेअर थेरपी म्हणजे ‘ऑस्टिओपथी!’ एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकन फिजिशिअन्सपैकी सुमारे ५.५ टक्के फिजिशिअन्स हे ऑस्टिओपथिक फिजिशिअन आहेत हे लक्षात घेतले तर ऑस्टिओपथीची लोकप्रियता ध्यानात येण्यास वेळ लागणार नाही. काय आहे ही ऑस्टिओपथी?
इतिहास : डॉ. अॅन्ड्रय़ू टेलर स्टील (Dr. Andrew Still’’)
हा कान्सास प्रांतातील बाल्ड्विन शहराजवळ राहणारा ‘अमेरिकन सिव्हिल वॉर’मधील एक नेता. हाा ऑस्टिओपथीचा जनक. त्याने १० मे १८९२ रोजी मिसुरी प्रांतातील ‘कर्कस्व्हिले’ येथे अमेरिकन स्कूल ऑफ ऑस्टिओपथीची स्थापना केली. आज त्याच स्कूलची मोठी A. T. still University झाली आहे. ऑस्टिओपथीच्या शास्त्रशुद्ध शिक्षणाचा इतका व्यापक पाया व अभ्यासक्रम डॉ. टेलर यांनी तयार केला, की मिसुरी राज्याने त्यांच्या ऑस्टिओपथी स्कूलला, स्नातकांना इतर डॉक्टरांप्रमाणे ‘एम. डी.’ डिग्री देण्याचीही अनुमती दिली; पण आपले वैशिष्टय़ जपण्याकरिता डॉ. टेलरने ती नाकारून ‘डी. ओ.’ (डॉक्टर ऑफ ऑस्टिओपथी) अशी डिग्री देणे चालू केले. आज अमेरिकेत अन्य डॉक्टरांप्रमाणे औषधे वा आवश्यक तेव्हा शल्यक्रिया वापरणारे असे ‘ऑस्टिओपथी फिजिशिअन’ हे वेगळे असून ‘नॉनफिजिशिअन ऑस्टिओपाथ’ जे केवळ Osteopathic Manipulative Treatment (OMT) देतात असे वेगळे आहेत, त्यांचे अभ्यासक्रम वेगळे आहेत व विविध अमेरिकन राज्यात त्यांच्याकरिता वेगवेगळे वैद्यकीय कायदेकानू लागू आहेत. युरोप व कॉमनवेल्थ देशांत हे दुसऱ्या प्रकारचे उपचारक अधिक लोकप्रिय असून, त्यांची उपचारपद्धती ही कायद्याच्या दृष्टीने ‘पर्यायी’ उपचारपद्धती म्हणून गणली जाते, असे उपचारक स्वत:ला चेता-स्नायू- अस्थि विशेषज्ञ M. N. M. S. Specialis म्हणवून घेताना आढळतात.
‘स्नायू अस्थि व सांधे ‘यांचा सांगाडा व त्याचे आरोग्य राखणे हे ऑस्टिओपथीच्या तत्त्वानुसार अतिमहत्त्वाचे असते. त्यातील बिघाड हा चेतासंस्थेच्या ऊर्जेत व पर्यायाने सर्व शरीराच्या ऊर्जेत बिघाड घडवून आणतो व रोगनिर्मिती होते, असे हे शास्त्र मानते. या सांगाडय़ाच्या आरोग्यावर आतील अवयवांचेही आरोग्य अवलंबून असते व हीच मध्यवर्ती कल्पना मानून सन १९४० च्या दरम्यान एच. व्ही. हुवर व एम. डी. यंग या दोन ऑस्टिओपायनी ? व्हिसेरल ? ऑस्टिओपथी (Visceral osteopathy) म्हणजे अवयवाधिष्ठित ऑस्टिओपथी अशी नवीन शाखा निर्माण केली.
कवटीची हाडे व मणके यांच्या संरक्षणात मेंदू व मज्जारज्जू कालक्रमणा करतात. त्यांच्या (मेंदू व मज्जारज्जू) भोवती Meninges चे संरक्षक आवरण असते तर मस्तिष्कद्रवात (Cercbrospinalflnid) ते एक प्रकारे डुंबत असतात. या रचनेत काही बदल झाल्यास, मस्तिष्कद्रवाच्या प्रवाहात अडथळे आल्यास, या संपूर्ण रचनेच्या आतील दाबात काही फरक पडल्यास त्यामुळे चेतासंस्थेच्या (व पर्यायाने संपूर्ण शरीराच्या) कार्यात बिघाड होतो, हा बदल डोक्यावरून हात फिरवून वा पाठीच्या मणक्यांवरून हात फिरवून तज्ज्ञाला जाणवू शकतो व योग्य त्या ठिकाणी दाब देऊन तो हा बदल नाहिसा करून ही संपूर्ण रचना पूर्वस्थितीत आणू शकतो या गृहीत तत्त्वावर डॉ. विल्यम सुदरलँड (Dr. william Sutherland) याने Cranial Ostcopathy ही एक नवीन शाखा अस्तित्वात आणली. मुख्यत्वे खालच्या मणक्यांवर आधारित अशी Craniosaoral Theropy सुद्धा अस्तित्वात आहे. अर्थात व्हिसेरल, क्रॅनिअल वा क्रॅनिओर्सेक्रल या सर्व पद्धतींबाबत क्लासिकल ऑस्टिओपाय वा अन्य डॉक्टरांच्या मनात अजूनही प्रचंड शंका आहेत.
ऑस्टिओपथीचा परिणाम नेमका कसा होतो?
अस्थि, स्नायू, सांधे- जोड उती’ यांचा प्रचंड सांगाडा हा चेतासंस्था वा शरीरांतर्गत अन्य अवयव संस्था यांच्या संरक्षणाकरिता, परस्परसंपर्काकरिता व बाह्यजगातील हालचालींकरिता आवश्यक आहे हे सहज मान्य होण्यासारखे आहे; पण जवळजवळ सर्वच व्याधी विकारांचे उगमस्थान या सांगाडय़ातच असते व तो ठीकठाक केल्यास संपूर्ण आरोग्यप्राप्ती होते व आता ज्ञात असलेल्या वैद्यकीय माहितीमुळे, पचनी पडणे थोडे कठीणच आहे. अर्थात ऑस्टिओपथीतील मुख्य Manipulation बरोबरीनेच आहार, व्यायाम, ढब सुधारणे, व्यावसायिक उपदेश (Ocupaticnal advise) इ.चा वापर केल्याने अनारोग्यकारक विविध घटकांचा परामर्श घेतला जाऊन, आरोग्यप्राप्ती तणावजन्य डोकेदुखी अशा विविध दुखण्यात ऑस्टिओपथीमुळे जे उत्तम परिणाम मिळतात त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर हे परिणाम या थेरपीमुळे कदाचित शरीरात निर्माण होणाऱ्या सूजनिवारक ‘इंटरल्युकिन्स’ या द्रव्यांमुळे (Antiintlammatary Interleukins) होत असावेत, असे दृष्टोत्पत्तीस आले आहे. डिसेंबर २००७ च्या ‘जर्नल’ ऑफ अमेरिकन ऑस्टिओपथिक असोसिएशन’मध्ये या संबंधीची सविस्तर माहिती आली आहे ती जिज्ञासुनी जरूर पाहावी.
आपली बिघडलेली स्थिती नीट करण्याची प्रत्येक शरीराची आपली अंतर्गत अशी क्षमता असते. शरीराची ही बरे होण्याची क्षमता ‘अस्थि, स्नायू, सांधे, जोड उती’ या यंत्रणेमार्फत पूर्वस्थितीत आणणे हे ‘ऑस्टिओपथी’ या उपचार पद्धतीचे मध्यवर्ती तत्त्व होय.
ऑस्टिओपथी कोठे उपयुक्त?
आज कंबरदुखीपासून ते फुप्फुसांच्या संक्रमणापर्यंत अनेक व्याधीविकारांवर ऑस्टिओपथीचे उपचार होत असले तरी प्रामुख्याने कंबरदुखी, पाठदुखी, तणावजन्य डोकेदुखी या विकारांवर ऑस्टिओपथी जास्तीत जास्त गुणकारी असते, असे म्हणता येईल. याव्यतिरिक्त खेळांमधील दुखापतींवर तसेच सांध्याच्या लवचिकतेकरिताही ऑस्टिओपथीचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे ऑस्टिओपथ सांगतात.
मुळात, आरोग्याचा शारीरिक आयाम ऑस्टिओपथी अधोरेखित करतो व त्यातच तिचे महत्त्व व ताकद लपलेले आहेत, असे नमूद करावेसे वाटते.
ऑस्टिओपथीची आठ प्रमुख तत्त्वे :
१) शरीर ही एक स्वयंपूर्ण यंत्रणा आहे.
२) शरीररचना व शरीराचे कार्य परस्परावलंबी असतात.
३) शरीराची स्वनियंत्रणाची अशी यंत्रणा असते.
४) शरीराची स्वसंरक्षणाची व स्वत:ला ‘बरे करण्याची’ क्षमता असते.
५) ही क्षमता ओलांडल्यास रोगनिर्मिती होते.
६) शरीरस्वास्थ्याकरिता शरीरांतर्गत द्रवांची (Body Fluids) हालचाल आवश्यक.
७) चेतासंस्था व ‘नसा’ (Nwrves) यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
८) रोगाचे देहिक घटक, रोगट स्थिती राहण्यास मदत करतात (व म्हणून त्यावर उपचार महत्त्वाचे!)
osteopathy
osteopathy vs chiropractic
osteopathy salary
does osteopathy work
osteopathic doctor
osteopathy degree
how to become an osteopath
osteopath near me
osteopathy vs physiotherapy

No comments:
Post a Comment