Touch therapy - Sparsh therapy
मानवी व्यवहारांमध्ये तसे पाहिल्यास स्पर्शाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘प्रेमळ आणि आश्वासक’ स्पर्शापासून ते घृणास्पद व किळसवाण्या स्पर्शापर्यंत, स्पर्शाच्या विविध छटा व्यक्त करणाऱ्या, आपल्या मायमराठीतील स्पर्शाची विविध विशेषणे, हे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे उपचारपद्धतीत स्पर्शाचा समावेश न होता तरच नवल. ‘स्पर्श’ ही मानवाची एक मूलभूत गरज आहे. यावर अनेक वैद्यकीय विश्वविद्यालयातून अनेक प्रकारे संशोधन झाले आहे, होत आहे. अनाथालयातील मुले, प्रेमळ स्पर्शाविना, कुपोषण (Marasmus प्रकार) बळी पडताना आढळतात; तर अतिदक्षता विभागातील रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांचा प्रेमळस्पर्श, त्यांना वारंवार लाभला, तर लवकर बरे होतात असे आढळून आले आहे.
तात्पर्य : ‘स्पर्शाला’ एक उपचारात्मक आयाम आहे. आज रेकीपासून ते भौतिकोपचारांपर्यंत अनेकविध उपचारपद्धतीत ‘स्पर्शाचा’ विविध पद्धतीने उपयोग होताना दिसतो. या स्पशरेपचारांचे एक ठसठशीत उदाहरण म्हणजे ‘मसाज!’ या ‘मसाजा’ला केवळ शारीरिक एवढाच आयाम नसतो तर त्याचे मानसिक व भावनिक आयामही तेवढेच प्रभावी असतात आणि ‘मसाजा’ला केवळ आधुनिक कालखंडातच महत्त्व प्राप्त झाले आहे असे नव्हे तर अगदी ऐतिहासिक आणि प्रागैतिहासिक कालखंडातही मसाज पद्धतीला महत्त्व असल्याचे आपल्या ध्यानी येते.
इतिहास : ‘मसाज’ ही खरे तर सर्वात जुनी उपचारपद्धती. शिकारीला धावताना पडल्यानंतर पाय मुरगळल्यास तो ठीक करावयास ‘मसाज’ वापरत असावेत असे दिसते. विविध कारणास्तव सांधे (आदि मानव) आखडल्यानंतरही ‘मसाज’ वापरला जात असावा असे दिसते. इ. स. पूर्वी पाचव्या शतकात 'एफएर' राजांच्या पत्नी, दररोज, मिऱ्ह (Myrrh) हे सुगंधी तेल, ऑलिव्ह तेलात मिसळून त्याने संपूर्ण शरीराला मसाज करत असल्याचे उल्लेख आहेत व त्यामुळे त्यांची कांती सतेज राहत असल्याचे म्हटले आहे. विविध उपचारांमध्येही ‘मसाज’ हे महत्त्वाचे अंग असल्याचे दिसते व म्हणूनच आधुनिक वैद्यकाचा प्रपितामह, हिपॉक्रेटिस (ख्रिस्तपूर्व ४६०) ही, डॉक्टरने मसाजकलेत प्रवीण असण्यासंबंधीने आग्रही दिसतो. (Phusician, expert in Rubbing Must!).
चीनमधील सुप्रसिद्ध पीत बादशहाच्या, पारंपरिक चीनी वैद्यकाच्या आद्य पुस्तकात, ''HUANGDI NEIJING' मध्येही त्वचा व स्नायूंच्या मसाजाविषयी व त्यांच्या उपयुक्ततेविषयी विविध उल्लेख असून, ‘मसाज’ हा चीनी पारंपरिक वैद्यकाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
भारतीय आयुर्वेद परंपरेतही मसाजाला विशेष स्थान असून अभ्यंगाच्या रुपाने त्याचा दैनंदिन स्वास्थ्यवृत्तात समावेश होताना दिसतो. आयुर्वेदात प्रकृतीनुसार मसाज तेलाची निवड करण्यावरभर देण्यात येतो तसेच विशिष्ट बिंदूवर दाब देऊन मसाज करण्याचे फायदेही (मर्मस्थळ मसाज) सांगितले आहेत. मध्ययुगापर्यंत उपचारपद्धतींचा अविर्भाज्य घटक असणारा हा ‘मसाज’ पुढे कॅथॉलिक चर्चच्या हस्तक्षेपामुळे मागे पडत गेला व पुढे पुढे तर आधुनिक वैद्यकातून तो जवळजवळ हद्दपार झाला. मात्र आधुनिक कालखंडामध्ये ‘मसाज’ पुन्हा उर्जितावस्थेत आला आहे व त्याकरिता आपण प्रो. पर हेन्रिक लिंग (Prof. Per Henrik Ling - १७७६ ते १८३९) या स्वीडीश जिम्नॅस्टचे आभार मानले पाहिजेत.
आधुनिक ‘मसाज’ - प्रो. लिंग यांनी आपल्या अनुभवांतून, मऊ उतींमधील म्हणजे स्नायू, स्नायूबंध व जोडउती यामधील समस्या शोधून, स्पर्श, दाब, मळणे, पिळणे, मुठीने हलके ठोसे देणे, बोटांच्या पेराने हलका दाब देणे इ. पद्धतींनी त्यावर उपचार सुरू केले. ‘आधुनिक मसाज पद्धती’चा हा पाया होय. पुढे ऑस्ट्रियातील मनोविश्लेषणतज्ज्ञ विल्हेम रीच (Wilham Reich - १८९७ ते १९५७) याने विविध नकारात्मक भावनांचा शरीरातील विविध मऊ उतींवर घातक परिणाम, त्या उती ताठरतात किंवा आखडण्यात होतो असा सिद्धान्त मांडला. याला ‘कवच’ सिद्धांत, 'Body Armouring असे म्हणतात. या उतींना मसाज केल्याने, त्या त्या नकारात्मक भावनांचेही आपोआप विरेचन होते असे रीचचे म्हणणे होते व त्यामुळे साहजिकच ‘मसाज’ या शारीर पद्धतीला एक मनोभावनात्मक आयाम मिळून ती एक ‘र्सवकष उपचारपद्धती’ झाली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील इझालेन संस्थेने (Esalen Institute) पुढे या दिशेने अधिक संशोधन केले व ‘मसाज’ पाश्चिमात्य देशातही लोकप्रिय झाला. अगदी अलिकडे, डॉ. कँडेस पर्ट या ख्यातनाम औषधोपचारतज्ज्ञ महिलेने, मन व शरीर यातील सीमारेषा अगदी अस्पष्ट असल्याचे मत मांडून, विविध नकारात्मक भावना, अनिच्छावर्ती मज्जासंस्थेच्या विविध भागात स्थित होतात व त्यामुळे विविध प्रकारचे रोग उद्भवतात व त्या भावनांच्या विरेचनाकरिता व त्या माध्यमातून र्सवकष आरोग्याकरिता आठवडय़ातून एकदा उत्तम मसाज करून घ्यावा असे सुचविले होते! आज मसाज थेरपी, आधुनिक रुग्णालये, स्पोर्टस् क्लब्स, ब्युटीपार्लर्स अशा विविध ठिकाणी उपयोगात आणलेली दिसते.
‘मसाज’ म्हणजे नेमके काय? -
अमेरिकेतील मिआमी विश्वविद्यालय व हावर्ड मेडिकल स्कूल या व अशा अनेक संस्थांत ‘मसाज’ या विषयावर बरेच संशोधन झाले आहे. मऊ उती उदा. स्नायू, स्नायूबंधने तसेच जोडउती यात निर्माण झालेला अनैसर्गिक ताण, काठिण्य हे मसाजामार्फत दिला जाणारा दाब तसेच, त्यामुळे चालना मिळालेल्या प्रतिक्षिप्त क्रिया याद्वारे दूर होतात व या उती शिथिल (Relax) होतात असे दिसून आले आहे. मसाज हा जसा शिथिलता साधतो तसेच तो काही वेळा उती उत्तेजितही करू शकतो व याचा खेळाडूंना उपयोग होऊ शकतो. या व्यतिरिक्त मसाज प्रक्रियेमुळे उतींमधील रक्तपुरवठा सुधारतो तसेच लसिका वहनाचे (Lymph drainage) कार्य अधिक वेगाने होऊन, स्नायू व अन्य मऊ उतींचे आरोग्य सुधारते व प्रतिकारक्षमतेतही वाढ होते असे आढळून आले आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे मसाज प्रक्रियेला केवळ शारीरिक आयाम नसून भावना विरेचनाचा मानसिक आयामही असतो व म्हणून योग्य मसाजानंतर माणसाला शारीरिक शिथिलतेचा व मानसिक शांतीचा अनुभव येतो. हावर्ड वैद्यकीय विद्यालयातील एका प्रयोगात, शल्यक्रियेपूर्वी रुग्णांना असा हळूवार, र्सवकष मसाज दिला, तर शल्यक्रियेनंतर त्यांना लागणाऱ्या वेदनाशामक औषधांचा डोस पुष्कळच कमी होतो व किमान तीन दिवस लवकर ते डिस्चार्ज मिळून घरी जाऊ शकतात असेही आढळून आले आहे! मसाज उपचारकांच्या मते, रुग्ण, मसाजामुळे, चार टप्प्यात बरा होतो- (१) वेदना शमन, तसेच ताण कमी होणे (२) आरोग्यप्राप्ती- स्नायू परत टय़ून्ड (Tuned) होतात, लसिकाग्रंथीचे व लसिकावहनाचे कार्य पूर्ववत होते, स्नायूंतील ताण/काठिण्य जाते. (३) ताकद वाढणे- दुखऱ्या उतींजवळील अन्य उतींची ताकद वाढते. याचा खेळाडूंना उपयोग होतो. (४) रोगप्रतिबंधन- बरे होण्याचा शेवटचा टप्पा व रोगप्रतिबंधनाचा पहिला टप्पा.
मसाजाचे फायदे-
मसाजाचे अनेकविध शारीरिक व मानसिक, भावनिक फायदे दिसून आले आहेत. न्यू जर्सी वैद्यकीय कॉलेजात, परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मसाजोपचार दिल्यास त्यांची नाहक चिंता, काळजी व भय कमी होतात, रक्तदाब उतरतो, श्वसन मंदावते व श्वेतपेशींच्या संख्येत व विशेषकरून Natural Killer Cell’’ या पेशींच्या कार्यक्षमतेत वाढत होते असे आढळून आले तर ओहायोमधील, कोलंबस येथील जेम्स कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिटय़ूटमधील कर्करोगग्रस्त रुग्णांवरील मसाजोपचारानंतर त्यांची दु:खं तसेच नाहक चिंता कमी झाल्याचे आढळून आले. नैराश्य कमी व्हायलाही त्यामुळे मदत होते असे दिसून आले आहे.
या व्यतिरिक्त मसाजाचे अनेकविध फायदे दिसून येतात. ते याप्रमाणे १) स्नायूंमधील ताण कमी होणे, काठिण्य दूर होणे, सांधे लवचिक होणे (२) विश्रांतीकारक (३) गर्भारपणातील अस्वस्थता कमी होणे (गर्भारपणात काही ठराविक काळातपर्यंतच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मसाजोपचार घेता येतात) (४) श्वसन सुधारते, रक्तदाब उतरतो (५) खेळाडूंना मदत (६) तणावजन्य डोकेदुखी नाहीशी होते. (७) ढब सुधारते. (८) प्रतिरक्षाप्रणाली अधिक ताकदवान होते. (९) ‘मन-शरीर’ एकसंधत्त्वाबद्दल भान येते.
मसाजाच्या विविध पद्धती - मसाजोपचारांच्या दीर्घपरंपरेमुळे, भौगोलिक वैविध्यांमुळे तसेच विविध पारंपरिक वैद्यकीय प्रणालींनी (उदा. भारतीय आयुर्वेद, चीनी पारंपरिक वैद्यक इ.) त्यात भर टाकल्याने, मसाजाच्या अनेकविध पद्धती जगभर प्रचलित आहेत. (त्यांची यादी तक्ता क्र. १ मध्ये दिली आहे.)
मसाज कोठे उपयुक्त? -
ताणतणाव, निद्रानाश, दुखरे स्नायू, आखडलेले स्नायू किंवा सांधे, रक्तप्रवाहातील शैथिल्य, नैराश्य, संग्रहणी (Irritabla Bavel sundrane), बद्धकोष्ठता, मासिकपाळीच्या दरम्यानचा त्रास, संधीवात अशा अनेकविध व्याधी विकारांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मसाजोपचार घेता येतात.
मसाज कोणी घेऊ नये? - त्वचेची संक्रमणे असल्यास; सूज असल्यास, गर्भारपणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात, दीर्घ आजारात, तीव्र वेदना असल्यास, Thrembotis सारख्या विकारात, नुकतेच भोजन झाले असल्यास, रक्तस्रावाचे विकार असल्यास (Bleeding Disorders), अस्थिविरलता किंवा अस्थिभंग असल्यास मसाजोपचार घेता येत नाहीत हे पक्के ध्यानात ठेवावे.
भविष्यात काय ?
मूलभूत मानवी गरजांशी निगडित, नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत वापरण्यात येणारी व प्रदीर्घ परंपरा लाभलेली ही उपचारपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक वेगाने घोडदौड करील अशी स्पष्ट सुचिन्हे सध्या तरी दिसत आहेत. अर्थात यातही संशोधनास भरपूर वाव आहे. थोडक्यात प्यासामधील ‘सर जो तेरा टकराये या दिलमे डूबा जाये.. तेल मालिश.’ गाणाऱ्या जॉनी वॉकरला शास्त्रीय बैठक आहे हे निश्चित!
मसाजोपचारांच्या विविध पद्धती (संक्षिप्त यादी)
(१) मसाजाची चार मूळ तंत्रे : Efflevrage, Petrissage, Pressure, Percussion.
(२) फ्रेंच मसाज, स्वीडिश मसाज, अरेबिक मसाज, पारंपरिक चीनी वैद्यक मसाज.
(३) आयुर्वेदीय मसाज, अभ्यंग ‘मर्म’ उपचार
(४) तेलमर्दन : यात खोबरेल, तीळ, ऑलिव्ह, बदाम, मोहरी, जर्दाळू, व्हीट जर्म, पेकन, हॅजलनट, होली इ. तसेच विविध अॅरोमा तेलांचा वापर केला जातो.
(५) जलमर्दन- यात भिजविणाऱ्या (vichy shower) किंवा कोरडय़ा (Dry water massage Bed) दाबाखालील जलप्रवाहाचा वापर केला जातो.
(६) मसाजाकरिता विविध प्रकारची टेबले, खुच्र्या किंवा मॅट्स्चा वापर
(७) हात, बोटे, कोपर, ढोपर, तळहात, तळपाय यांचा मसाजाकरिता वापर.
(८) मसाज देण्याकरिता विविध यंत्रांचा वापर
(९) अन्मा (Anma)- पारंपरिक जपानी मसाज
(१०) थाई मसाज
(११)बॅलिनीज् मसाज (Balinese Massage) : यात हाताने हळूवार पद्धतीने किंवा गरम Balinese stones चा वापर केला जातो.
(१२) ऑस्ट्रेलियन बोवेन थेरपी
(१३) ब्रीमा (Breema)
(१४)चंपी (champissage)
(१५) इझालेन मसाज (Esalen Massage)- यात शरीराला हलके झोके दिले जातात तसेच सांध्यांचा व्यायाम दिला जातो.
(१६)Bare foot DeepTisse-यात Keralite,yumeiho, Lomi Lomi असे प्रकार आहेत.
(१७) Body Rock‘- यात दगडातून कोरलेल्या सर्पाकृती साधनाने मसाज दिला जातो.
(१८) Hiolt - पारंपरिक फिलिपिनीज् वैद्यकाचा ‘मसाज’ हा एक घटक आहे.
(१९) माथोमॅसॉलॉजी- यात स्वीडीश मसाज, रिफ्लेक्सॉलॉजी, क्रॅनिओसॅक्रल थेरपी एकत्रित केले जातात.
(२०) वात्सू (wastu)- यात हायड्रोथेरपी व शिआत्सू एकत्रित केले जातात.
Touch therapy
touch therapy techniques
touch therapy definition
healing touch therapy training
therapeutic touch vs reiki
touch therapy points
how to do healing touch
therapeutic touch benefits
how to do therapeutic touch

No comments:
Post a Comment