Friday, November 14, 2014

कोणाचं काय आणि कोणाचं काय? रोहितच्या विश्वविक्रमाला सोफियाचं न्यूड फोटोशूट समर्पित

कोण आहे सोफिया हयात? :
ब्रिटीश अॅक्ट्रेस असलेली सोफिया हयात मॉडेलिंगही करते. बिग बॉसच्या सातव्या सिजनमध्ये देखील सोफिया दिसली आहे. बॉलिवूडमधील परदेशी नट्यांचं वाढतं प्रमाण पाहून तिलाही बॉलिवूडमध्ये एन्ट्रीची अपेक्षा असेल हे नव्यानं सांगायची गरज तशी नाहीच. न्यूड फोटोशूटच्या माध्यमातून आपली कारकिर्द निखारण्याचा तिचा प्रयत्न आहे. त्यामुळं आता रोहितच्या द्विशतकीचा खेळीच्या माध्यमातून ती आपलं फोटोशूट म्हणजे स्वत:ला प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्न असल्याचं दिसतं आहे.         

मॉडेल सोफिया हयातचं रोहीत शर्माला गिफ्ट! (फोटो ट्वीटर @sofiahayat)

  त्यामुळं क्रिकेटच्या इतिहास नवा अध्याय लिहिणाऱ्या रोहितच्या नावानं आपल्या 'तशा' कामगिरीलाही प्रसिद्धी मिळवण्याचा सोफियाचा हा केविलवाणा प्रयत्नच म्हणावा लागेल.

रोहितनं आपले धडाकेबाज दुसरं द्विशतक साकारण्याच्या तासभर आधीच सोफियानं आपले हे न्यूड फोटोज ट्विटरवर पोस्ट केले होते. पण त्याला नेटीझन्सना पाहिजे तसा प्रतिसाद मिळालाच नाही. त्यामुळं रोहित शर्मानं क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचल्याचं कळताच या बाईनं आपले हे फोटो रोहित शर्माला समर्पित केले आणि या 'विना कपड्यांच्या फोटोंना' रोहितच्या नावानं प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला. आपलं हे क्रिकेटप्रेम लोकांना खरं वाटावं म्हणून या बयानं रोहितसोबतचा एक जुना फोटोही जोडला आहे.

No comments:

Post a Comment

Mental Health Awareness in India

Mental Health Awareness in India Mental health is an essential aspect of overall well-being, but it remains a sensitive and often sti...