Saturday, November 15, 2014

पांगोंग लेकमध्ये चिनी घुसखोरी

lake तर लेक जवळून जाणा-या रस्त्यांवर छोटी तुकडी पाठवून घुसखोरी केली. मात्र इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) जवानांचा पवित्रा पाहून चिनी सैनिकांनी माघार घेतली.

लडाखमधील सर्वाधिक उंचीवरचा लेक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पांगोग लेकमध्ये नौकांद्वारे चिनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला. एकीकडे चिनी नौका भारताच्या हद्दीत प्रवेश करत असताना लेक जवळूनच जाणा-या रस्त्यावरुन स्वतःची तुकडी पाठवून पीएलएने भारताच्या भूप्रदेशात घुसखोरी केली. लेहपासून १६८ किमी अंतरावर पांगोंग लेकच्या उत्तरेकडील किना-याजवळच्या भूप्रदेशात चिनी सैन्याने घुसखोरी केली. आयटीबीपीच्या जवानांनी चिनी सैन्याच्या हालचाली पाहून तातडीने अतिरिक्त सैनिक घटनास्थळी पाठवले. आयटीबीपीच्या जवानांचा आक्रमक पवित्रा पाहून चिनी सैनिकांनी माघार घेतली. चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे त्यांच्या हद्दीत जाईपर्यंत आयटीबीपीने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. घुसखोरीच्या घटनेची दखल घेऊन आयटीबीपीने पांगोंग लेक परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी २२ ऑक्टोबर रोजी पांगोग लेक परिसरात जलमार्गे नौकांमधून

No comments:

Post a Comment

Mental Health Awareness in India

Mental Health Awareness in India Mental health is an essential aspect of overall well-being, but it remains a sensitive and often sti...