स्मार्टफोनचा चेहरामोहरा बदलणार Smartphone will changes revolutionery
गुगलने प्रोजेक्ट अरा नावाने यावर काम सुरू केलं आहे. याविषयी गुगलच्या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये सर्वात प्रथम माहिती देण्यात आली होती. त्याचा व्हिडीओ यू-ट्युबवर Google Developers या चॅनेलवर Google I/O 2014 - A 3D tablet, an OSCAR, and a little cash. Tango, Spotlight, Ara. ATAP या नावाने उपलब्ध आहे. यामध्ये २० व्या मिनिटापासून यासंदर्भातील माहिती सुरू होते. या प्रकल्पाचे प्रमुख पॉल एरेमेन्को याविषयी तांत्रिक माहिती उपस्थितांना देत आहेत. २० ठिकाणचे सुमारे दीडशे कर्मचारी या प्रकल्पात सहभागी असून त्यांना विविध कामे विभागून देण्यात आली आहेत. त्यामुळे हे काम लवकर होणार आहे. सोबतच ३ डी प्रिंटरच्या उपयोगाचाही विचार सुरू आहे. तर Phonebloks या चॅनेलवरील Phonebloks update - Ara Prototype या व्हिडीओमध्ये या प्रकल्पाची सद्यस्थिती देण्यात आली आहे. यावरून या प्रकल्पाविषयी, फोनविषयी अधिक सुस्पष्ट कल्पना येते. लहान मुलं ज्याप्रकारे छोटे छोटे ठोकळे जोडून खेळणं तयार करतात, त्याप्रमाणे हा खराखुरा फोन तयार होताना पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे. अशाप्रकारच्या कल्पनेचे उद्गाते Phonebloks ची टीम आहे. वर्षभरानंतर या टीमला काय वाटतं, हे त्यांनी Phonebloks - Our first year या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
वरील व्हिडिओतील तांत्रिक गोष्टींमुळे थोडा कंटाळा आला असेल तर The Verge या चॅनेलवरील Project Ara: building the modular smartphone | Report #89 या डॉक्युमेंटरीमध्ये आणखी सोप्या भाषेत हे समजावून सांगण्यात आलं आहे. तो व्हिडीओदेखील तुम्हाला पाहता येईल.
No comments:
Post a Comment