Saturday, November 15, 2014

‘लक्झरी होम’ संकल्पनेला नवा आयाम

गेल्या आठ-दहा वर्षांत 'लक्झरी होम' ही संकल्पना बहुतांश शहरांमध्ये रुजली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महानगरांमधल्या पोस्टाच्या विशिष्ट पिनकोडला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तुम्ही राहत असलेल्या भागाचा पिनकोड कोणता, यावरून तुमचं स्टेटस निश्चित होऊ लागलं आहे. म्हणूनच विकासकांनीही विशिष्ट पिनकोड असलेल्या भागातच लक्झरी विभागामधली घरं बांधाण्यास प्राधान्य दिलं असल्याचं दिसून येत आहे. परंतु या भागातल्या घरांच्या किमतींमध्ये खूप वाढ झाली आहे. तरी सधन लोक प्रभावी पत्ता मिळावा म्हणून अशी महागडी घरं घ्यायला तयार होतात.

कुठल्याही शहरातल्या विशिष्ट भागात अशी लक्झरी घरं बांधायला एक मर्यादा असते. एका काळानंतर अशा विशिष्ट पिनकोडच्या पत्त्याची घरं मिळत नाहीत. पण तरीही अशी घरं दोन प्रकारे उपलब्ध होऊ शकतात. एक तर त्या भागातल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास व्हायला हवा किंवा रिसेल मार्केटमधलं घर उपलब्ध व्हायला हवं. परंतु हाय-व्हॅल्यू लोकेशन्समधल्या रिसेल प्रॉपर्टीजच्या किमतींमध्ये घट होत आहे कारण त्यात नव्या लक्झरी अॅमेनिटीज नसतात.

लक्झरी होम म्हटलं की आज ऐसपैसपणा, मॉडर्न सिक्युरिटी, क्लब हाऊस, स्वीमिंग पूल, स्मार्ट होम फीचर्स हवी असतात आणि या सेवासुविधा रिसेल घरामध्ये मिळत नाहीत. म्हणूनच काही ठराविक भागांच्या पुढे जाऊन लक्झरी होम्स असलेल्या भागांचा विस्तार होण्याची गरज आहे. त्यासाठी नवी लोकेशन्स विकसित करावी लागतील. विकासकांना नव्या भागांमध्ये अल्ट्रा-मॉडर्न लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्टस उभे करावे लागतील. प्रॉपर्टी क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते, असे गृहप्रकल्प आतापर्यंत कधीच उभे राहिले नाहीत. त्याची मुख्य दोन कारणं आहेत. एक म्हणजे लक्झरी होमच्या ग्राहकांच्या गरजा आणि आवडीनिवडींना फार महत्त्व दिलं गेलं नाही. दुसरं कारण हे की, लक्झरी होम्स डेव्हलपर्सची पूर्णतः नव्या भागांमध्ये लक्झरी होम्स बांधण्याची क्षमता दुर्लक्षित करण्यात आली.

भारतातले अनेक सधन ग्राहक कुठल्याही चांगल्या ठिकाणी लक्झरी होम मिळत असेल तर ते घेतात. त्यात ते भौगोलिक सीमांचा विचार करत नाहीत. कारण विशिष्ट पिनकोड असलेल्या ठिकाणच्या प्रॉपर्टीला कधीही चांगला भाव मिळेल, अशी त्यांना खात्री असते. पण त्यामुळे अलिकडे विशिष्ट भागातल्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. एकतर अशा भागांमधल्या प्रॉपर्टीच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. त्याचबरोबर या भागांमधल्या वाहतूककोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. प्रदूषणाचं प्रमाणही वाढत आहे. परिणामी तिथल्या लोकांना लक्झरी लाइफ जगण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लक्झरी होम घेणाऱ्या ग्राहकांनी या गोष्टी लक्षात घेऊन आणि भविष्याचा विचार करूनच घर घेतलं पाहिजे.

नव्या ठिकाणी लक्झरी होम बांधणारे विकासक हे ग्राहकांना ऐसपैस घरं देत आहेत. त्या घरांमध्ये मॉडर्न अॅमेनिटीज देत आहे. त्यामुळे विविध आकार आणि अॅमेनिटीज असणारी घरं मार्केटमध्ये उपलब्ध होत आहेत. ज्यांना विशिष्ट पिनकोड असलेल्या ठिकाणी अडकून न पडणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच हे विकासक घरं आणि गृहप्रकल्पांचा आराखडा तयार करत आहेत. खरंतर हे विकासाच्या दिशेने टाकलेलं एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक लक्झरी लाइफस्टाइल मिळत आहे. ओपन स्पेस, लॅण्डस्केप गार्डन झोन्स, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि उत्तम शेजार मिळत आहे. विशिष्ट पिनकोड असलेल्या ठराविक ठिकाणी कितीही लक्झरी होम्समध्ये या सुविधा मिळत नाहीत.

अशी नव्याने लक्झरी होम डेस्टिनेशन्सला गृहप्रकल्प उभारणारे विकासक हे त्यांच्या प्रकल्पांना चांगली कनेक्टिविटी असेल याची काळजी घेतात. शहरातली व्यावसायिक व व्यापारी केंद्र आणि मार्केटला जोडणारं नव्या रस्त्यांचं जाळं असेल तरच ते आपले प्रकल्प उभे करतात. हायएण्ड टाऊनशीपमध्ये कनेक्टिविटी हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. महामार्ग, बाजारपेठा, हॉस्पिटल्स आणि मनोरंजनाची साधनं असतील तरच अशा टाऊनशिप्स उभ्या राहतात. म्हणूनच अशा टाऊनशिपमधल्या घरांच्या व्यवहारात आधुनिक सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांची भूमिका फार महत्त्वाची ठरत आहे.
यासंदर्भात बोलताना प्राइड ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अरविंद जैन यांनी नव्या युगातल्या लक्झरी प्रोजेक्ट्समुळे नव्या ठिकाणांच्या पिनकोडलाही हळूहळू प्रतिष्ठा मिळू लागली आहे, याकडे लक्ष वेधलं. जुन्या ठिकाणच्या दाटीवाटी, वाहतूककोंडी, धूळ, प्रदूषण असलेल्या पारंपरिक घरांना नव्या ठिकाणच्या ऐसपैस, मोकळी, हवेशीर, निसर्गाच्या सानिध्य आणि अत्याधुनिक सेवासुविधा असणारी घरं चांगला पर्याय उपलब्ध करून देत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...