विश्व गेमिंग कॉम्पुटरचं - World of Gaming Computer
विश्व गेमिंग कॉम्पुटरचं
फिफा, एनएफएस, वॉचडॉग्स, सीएस, प्रिन्स ऑफ पर्शिया... अशा गेम्सची नावं समोर आली की या गेम्सचे कट्टर चाहते डोळ्यासमोर येतात. मात्र गेम्सची मजा तेव्हाच येते, जेव्हा हे गेम्स अगदी सुरेख न अडखळता चालतात तेव्हा. त्यामुळे जितकं चांगलं हार्डवेअर असलेला पीसी किंवा लॅपटॉप असेल तितकीच मजा गेम खेळायलाही येते. आज मोठ्या प्रमाणावर गेमर्स डेस्कटॉप बरोबर लॅपटॉप्ससुद्धा वापरताना दिसत आहेत. सध्या तर गेमिंगच्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि त्यांना असणारी भरघोस बक्षिसं यामुळे गेमिंग हा एक पूर्ण वेळ करियरचा पर्याय म्हणून समोर येत आहे. त्यातही गेमिंग स्किल्स बरोबरच जिंकण्यासाठी तितक्याच चांगल्या हार्डवेअरची साथ असणं अत्यंत आवश्यक आहे. गेमिंग कॉम्प्युटर्सचे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. यासाठी गेमिंग कॉम्प्युटर्सच्या दुनियेचा घेतलेला हा आढावा...
गेमिंग कॉम्प्युटर म्हणजे नक्की काय ?
गेमिंग कॉम्प्युटर म्हणजे काय? यात काय फरक असतो? असे प्रश्न सामान्य ग्राहकांना पडतात. खरंतर गेमिंग कॉम्प्युटर हे मुळात साध्या कॉम्प्युटर्स प्रमाणेच असतात, फक्त त्याचं कॉन्फिग्रेशन वेगळं असतं. हल्ली बऱ्याच लोकांचा असा समज झालेला आहे की गेमिंग म्हटलं म्हणजे हाय बजेट आणि त्याचबरोबर त्याचा मेन्टेनन्सही आलाच; पण मार्केटमध्ये नजर टाकल्यास एक गोष्ट लक्षात येते की आपल्या गरजेप्रमाणे आणि आपल्या बजेटप्रमाणे कॉम्प्युटर उपलब्ध आहेत. गेमिंग क्षेत्रात असुस, एलियनवेअर, डेल या कंपनी आघाडीवर आहेत.
असेंबल्ड गेमिंग कॉम्प्युटर्स
साधारणतः नॉर्मल गेमर्स आपल्या बजेटप्रमाणे कॉम्प्युटर बनवून घेतात. यासाठी प्रत्येक कंपन्यांचे खास गेमिंगसाठी डिझाइन केलेले पार्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपापल्या गरजेप्रमाणे लोक ग्राफिक्स कार्ड, कॅबिनेट, प्रोसेसर्स, मदरबोर्ड घेतात.
एनविडीया, असुस ग्राफिक कार्ड्स
ग्राफिक्स कार्डमुळे गेम्स खेळण्याची मजा दुप्पट होते. ग्राफिक कार्ड्सना गेम अॅक्सिलेटर्स असंही म्हटलं जातं. एनविडीया, असुस या कंपन्यांचे ग्राफिक्स कार्ड्स मार्केटमध्ये प्रसिध्द आहेत. एक जीबीपासून आठ जीबीपर्यंत आणि ४ हजार ते अगदी एक लाख रुपये किंमतीची ग्राफिक कार्डस् सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक गेमर्स आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या ग्राफिक्स कार्डचा वापर करतात.
रॉग असुस मदरबोर्ड्स
आज केवळ मदरबोर्डमध्ये बदल करूनही कॉम्प्युटरमध्ये लक्षणीय बदल घडवून आणता येतो. गेमिंगसाठी रॉग असुसचे खास मदरबोर्ड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. गेमर्स मोठ्या प्रमाणावर या मदरबोर्ड्सचा वापर करताना दिसून येतात. अगदी २ते ५ हजारापर्यंत हे मदरबोर्ड्स आपल्याला मिळू शकतात. ओव्हरक्लॉकिंग सपोर्ट, थंडरबोल्ट फिचर, ६जीबीपीएस इतका अल्ट्राफास्ट डेटा ट्रान्सफर रेट, ५.१ ऑडियो सपोर्ट यांसारख्या भन्नाट फीचर्समुळे गेमर्स, गेम डिझायनर्स, एडिटर्स या मदरबोर्डचा वापर करतात.
क्लासी कॅबिनेट्स
आज असे कितीतरी लोकं आहेत जे गुणवत्तेबरोबरच लुक्सवरही भर देताना दिसतात. अशा लोकांसाठी कुलर मास्टर कॅबिनेटस्चा सुंदर पर्याय आहे. ट्रान्सपरन्ट केसेस, एक्स्ट्रा कुलिंग सपोर्ट यासारखे कडक फीचर्स या कॅबिनेट्समध्ये आहेत. अगदी ३ हजारापासून ६० हजारापर्यंतच्या वेगवेगळ्या कॅबिनेटस् मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हल्ली गेमिंगसाठी ब्रॅन्डेड डेस्कटॉप्स पण उपलब्ध आहेत. त्यांना मार्केटमधील स्पर्धेमुळे पुरेशी मागणी नाही.
गेमिंग लॅपटॉप्स
हल्ली पोर्टेबिलिटीचा जमाना आहे. यामुळेच आज मोठ्या प्रमाणावर गेमर्स लॅपटॉप वापरताना दिसत आहेत. एरव्ही गेमिंगसाठी डेस्कटॉपला प्राधान्य देणारे हल्ली लॅपटॉपकडे वळत आहेत. याच कारण म्हणजे लॅपटॉपमध्ये येणारे भन्नाट फीचर्स. आज मार्केटमध्ये गेमिंग लॅपटॉप्सची रेंजच आलेली आहे. किमती महाग असल्या तरी आज लोक हे लॅपटॉप्स विकत घेताना दिसत आहेत. मुळात आताचे गेमर्स या लॅपटॉपच्या विविध फीचर्समुळे लॅपटॉप्सच्या प्रेमात आहेत.
एलियनवेअर लॅपटॉप्स गेमिंग सीरिज
एलियनवेअर लॅपटॉप्स नावाप्रमाणेच 'गेमिंग जायंट' मानले जातात. गेमर्सचं पहिलं प्राधान्य हे नेहमीच एलियनवेअर लॅपटॉप्सना मिळ्त आलेलं आहे. या लॅपटॉप्सना ३२जीबी रॅम सपोर्ट आहे. त्याचबरोबर अतिशय हाय क्वालिटी ग्राफिक्स हे एलियनवेअर लॅपटॉप्सचं अजून एक कडक फिचर. २४ तास जरी या लॅपटॉप्सवर गेम्स खेळले तरी लॅपटॉप्स तितकाच उत्तम परफोर्मन्स देतो. आज मार्केटमध्ये एलियनवेअर १३, एलियनवेअर १७,१८ यांना मागणी आहे.
एलियनवेअर १३ कॉन्फिग्रेशन
इंटेल कोर आय-५ प्रोसेसर, ३ एमबी कॅचे मेमरी विथ टर्बो बुस्ट, १६ जीबी डीडीआर ३ रॅम ८ जीबी ग्राफिक्स सपोर्ट २जीबी ऑन बोर्ड ग्राफिक्स
रॉग असुस गेमिंग लॅपटॉप्स
असुस कंपनीच्या लॅपटॉप्सच्या केवळ लुक्स आणि रंगावरच गेमर्स फिदा आहेत. या लॅपटॉप्सची स्वतःची वेगळी ओळख आहे. फक्त आकर्षक लुक्सच्या बाबतीतच नाही तर हे लॅपटॉप्स गेमिंगसाठीही उत्तम आहेत. रॉग असुसचे लॅपटॉप्स आणि गेमिंग मदरबोर्ड्स यासाठी प्रसिध्द आहेत. अतिशय उच्च दर्जाचे ग्राफिक्स आणि हाय क्वालिटी सपोर्ट या लॅपटॉप्सद्वारे मिळतो. एडिटर्स आणि गेमर्स काही प्रमाणात गेम डिझायनर्स ह्या लॅपटॉप्सचा वापर करताना दिसून येत आहेत.
रॉग असुस कॉन्फिग्रेशन
इंटेल आय७ फोर्थ जनरेशन प्रोसेसर २४ जीबी रॅम १५०० जीबी हार्डडिस्क थ्रीडी विजन सपोर्ट ४ जीबी इंटेल ग्राफिक्स ८ जीबी सपोर्ट
gaming computer
custom gaming computer
building a gaming computer
gaming computer reviews
gaming computer deals
gaming computer best buy
gaming computer amazon
gaming computer parts
gaming computer magazine
No comments:
Post a Comment