Saturday, November 15, 2014

चीनची चिटिंग, पाकला ट्रेनिंग

pak-chinaएकीकडे भारताला घट्ट मैत्रीचं आश्वासन द्यायचं आणि त्याचवेळी तिकडे प्रत्यक्ष सीमारेषेवर भारतीय हद्दीत घुसखोरी करायची, अशा कुरापती करणाऱ्या चीनचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनचे सैनिक पाकिस्तानी लष्कराला शस्त्रास्त्र वापराचं प्रशिक्षण देत असल्याची पक्की माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे भारतीय जवानांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेतच, पण संरक्षण आणि परराष्ट्र खात्यानं चीनला योग्य समज द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होतेय.

जम्मू-काश्मीरमधील राजुरी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलिकडे चिनी सैन्य पाकिस्तानी लष्कराला शस्त्रास्त्र वापराचे धडे देत असल्याचं सीमा सुरक्षा दलानं प्रत्यक्ष पाहिलंय. पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुख तळांवर हे प्रशिक्षण सुरू आहे. श्रीगंगानगर क्षेत्राच्या समोरील बाजूला पाक लष्कराच्या काही तुकड्यांनी रेंजर्सच्या निमलष्करी तळांचा ताबाही घेतलाय. इतकंच नव्हे तर, पंजाबच्या अबोहर आणि गुरुदासपूर क्षेत्रांजवळ पाकनं नवे वॉच टॉवरही उभारलेत. भारतीय सैन्य आणि युद्धसामग्रीवर हल्ला करण्याची रणनीती आखली जात असल्याचं पाक लष्कराच्या संभाषणातून स्पष्ट होतंय.

आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराची कमांडो पथकंही तैनात करण्यात आल्याचं बीएसफच्या गुप्तचर शाखेनं नमूद केलंय. ते भारतीय हद्दीत हल्ला करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवण्यासाठी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये दहशतवाद्यांच्या मोठा गट कट रचत असल्याची धक्कादायक माहितीही गुप्तचरांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, लष्कराला सावधानतेचे आदेश देण्यात आलेत.

No comments:

Post a Comment

Mental Health Awareness in India

Mental Health Awareness in India Mental health is an essential aspect of overall well-being, but it remains a sensitive and often sti...